
" मला असा तरुण हवा आहे, ज्याचे शरीर आणि मन लोखंडाच्या कांबीसारखे असेल...."
- स्वामी विवेकानंद
येणाऱ्या काळात भारत विश्वाचे नेतृत्व करेल.
अशा विश्वविजेत्या भारताचे नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्राला आणि मराठी तरुणांना सक्षम करण्यासाठी प्रबोधक प्रयत्नशील आहे...
यासाठी काय करावे लागेल?
अधिकाधिक मराठी तरुण प्रशासकीय सेवा आणि शासकीय नोकऱ्यांद्वारे केंद्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणांमध्ये शिरावा
१
२
अधिकाधिक मराठी तरुण केंद्रीय आणि
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम शैक्षणिक
संस्थांमध्ये जावा
अधिकाधिक मराठी तरुण उद्योजक व्हावा आणि त्याच्या उद्योगाचे साम्राज्यात रूपांतर व्हावे...
३
४
अधिकाधिक मराठी तरुण सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य, कला. विज्ञान या क्षेत्रांमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर चमकावा

अधिकाधिक मराठी तरुण आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकऱ्या, उद्योग आणि सांस्कृतिक क्षेत्रांत जावा
५
प्रबोधक ध्येय
२०४०
सक्षम
महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाशी 'प्रबोधक' जोडलेले असेल. लहान मुले, महिला, शिक्षण, तरुण, करियर, उद्योग, आरोग्य, पाणी, वीज, शेती, प्रशासन, आपत्ती निवारण - महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी- जिल्हा, तालुका आणि ग्रामपातळीवर 'प्रबोधक' सज्ज असतील...
महाराष्ट्र
प्रबोधक उपक्रम
१. कोकणच्या शेतीचा विकास, फळे, भाजीपाला, मसाला पिके, भातशेती, फुले, रेशीम इ.- प्रशिक्षण, मार्गदर्शन, वित्त आणि विपणन सुविधा, नाबार्डच्या योजना, केंद्र आणि राज्यशासन योजना आणि पायाभूत सुविधा, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, निधी कंपन्या, मायक्रो फायनान्स इ.
२. कोकणातील उद्योगांचा विकास: लघु उद्योजकांना प्रोत्साहन, मार्गदर्शन, वित्त आणि इतर सुविधांची मदत, सिडबी आणि बँकांच्या इतर योजना, उद्योगांसाठीच्या अनुदान योजना
३. संस्थात्मक सुविधा: शेती, फलोत्पादन, दूध उत्पादन आणि डेअरी, पर्यटन आणि हॉटेल्स-रिसॉर्ट्स विकास, भाजीपाला, फळप्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया उद्योग प्रकल्प, मत्स्य प्रक्रिया प्रकल्प, फूड पार्क, कोल्ड स्टोरेज, गोदामे, क्लस्टर, औद्योगिक वसाहती इ. साठी मदत आणि सहाय्य
४. तरुणांसाठी, करियर मार्गदर्शन, उत्तम शाळा आणि कॉलेजेस, अद्ययावत तंत्रज्ञान, इंग्रजी, परदेशी भाषा आणि तांत्रिक-अतांत्रिक स्किल डेव्हलपमेंट, स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा मार्गदर्शन, कोकणच्या विद्यापीठासाठी आणि कोकणातील शिक्षणाच्या विकासाठी प्रयत्न
५ अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्र ,हॉस्पिटल्स आणि सुपर स्पेशियालिटी हॉस्पिटल्स साठी प्रयत्न, कोकणात एम्स आणण्यासाठी प्रयत्न
६. विविध केंद्र आणि राज्य संस्था, मंडळे, केंद्र आणि राज्याच्या प्रशासनासाठी आणि नागरिकांसाठीच्या योजना कोकणात याव्यात यासाठी प्रयत्न
७. जलसंधारण, हरित आणि अपारंपरिक ऊर्जा निर्मिती, शुद्ध पाणी इ. साठी प्रयत्न
८. महिला, बाल, वृद्ध आणि सर्व समाजघटकांच्या सामाजिक प्रगतीसाठी आणि प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रयत्न
९. कोकणच्या सांस्कृतिक विकासासाठी, कला, क्रीडा क्षेत्रात कोकण आणि कोकणातील तरुण विकसित व्हावा यासाठी प्रयत्न
१०.कोकणात आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत विकसित व्हाव्यात यासाठी शासनाकडे प्रयत्न
कोकण विकास उपक्रम
प्रबोधक कोकण मित्र अर्ज



शासकीय नोकऱ्या आणि स्पर्धा परीक्षांची माहिती थेट तुमच्या
व्हॉट्स एपवर मिळवा.

ग्रामीण महाराष्ट्राचा
मार्गदर्शक


प्रबोधक व्हिडीओज
प्रबोधक मुंबई गौरव गीत
गीतकार: जयेश मेस्त्री संगीत: हर्षद माने
गायक: मयूर सुकाळे आणि दीपाली कामत
पथनाट्य: मराठी शाळा
इंग्रजी काळाची गरज आहे मान्य,
पण त्यासाठी इंग्रजी शाळेतच शिकणे
गरजेचे नाही!
पथनाट्य: संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!
बिदर,कारवार, निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!