top of page

 

कृषी पणन व व्यवस्थापन : नोकरी आणि स्वयंरोजगार

 

 

 

शेतीकडे एक उद्योग म्हणून पाहिल्यास शेती अधिक फायदेशीर होऊ नाव उद्योजकांनी सिद्ध केले आहे. आपल्या पूर्वजांनी पारंपारिक पद्धतीने शेती केली आणि त्यातून वर्षानुवर्षे भारत सुजलाम सुफलाम राहिला आहे खरे, मात्र नवीन काळानुसार नवीन तंत्रज्ञानाची आणि संशोधनाची मदत घेऊन शेती करणे अधिक सयुक्तिक ठरणार आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी शेती विषयात उच्च शिक्षण घेणे आवश्यक आहे. हे उच्च शिक्षण म्हणजे दोन अथवा तीन वर्षाचे पदवीच. असावी असे नाही. काही अल्प मुदतीचे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. मार्केटिंग आणि विक्री हा कुठल्याही उद्योगाचा पाया. तुम्ही जे बनवता ते विकू शकला नाहीत तर कितीही उत्तम उत्पादनाची किंमत शून्य ठरते. शेतीमध्ये सुद्धा हेच तत्व लागू पडते. त्यामुळे उत्पादन आणि गुणवत्तेसोबतच, व्यवस्थापन मार्केटिंग, आणि विक्री याचेही उत्तम मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम अ) दीर्घ मुदतीच्या अभ्यासक्रमात शेती या विषयामध्ये बीएस्सी आणि एम एस्सी करता येते. याशिवाय मत्स्य, सहकार वगैरे विविध विषयांवर दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ब) अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमात शेती, फळे आणि भाज्या लागवड, फुलशेती अशा विविध विषयांमध्ये पदविका आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.क) याशिवाय शेती व्यवस्थापन या विषयावर व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ड) अनेक शासकीय आणि खासगी संस्था, व्यवसायाभिमुख अल्प मुदतीचे अभ्यासक्रमही चालवतात. आपल्या आवश्यकतेप्रमाणे विविध विषयांचा दीर्घ व अल्प मुदतीचा अभ्यास आपण करू शकतो. व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यास क्रमात व्यवस्थापनाची कौशल्ये आणि शेतीचे तांत्रिक ज्ञान यांचा उत्तम मिलाफ पाहायला मिळतो. प्रशिक्षण: यादृष्टीने कृषीमध्ये व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांना विशेष महत्त्व आहे. गरवारे व्यवसाय प्रशिक्षण, सांताक्रूझ गरवारे व्यवसाय प्रशिक्षण संस्थेत शेती व्यवस्थापनाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवला जातो. अधिक माहिती: गरवारे, मुंबई विद्यापीठ संकुल, कालिना, सांताक्रूझ, मुंबईवैकुंठ मेहता सहकार प्रशिक्षण संस्था , पुणे वैकुंठ मेहता सहकार प्रशिक्षण संस्थेत सहकार व्यवस्थापन या विषयावर पदविका अभ्यासक्रम तर शेती व्यवस्थापन या विषयावर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे. संपर्क: www.vamnicom.gov.in नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्‍नॉलॉजी (तळेगाव) : एक आठवडा ते दहा दिवसांचे विविध प्रकारचे निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. हरितगृह व्यवस्थापन, पीकनिहाय अभ्यासक्रम, उतिसंवर्धन, फ्लॉवर डेकोरेशन, ड्राय फ्लॉवर ऍण्ड प्लॅंट पार्ट, गोदाम व्यवस्थापन, कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापन, पीक संरक्षण व रोपवाटिका व्यवस्थापन, फळे - फुले व भाजीपाल्याचे विपणन आदी अनेक अभ्यासक्रम या संस्थेमार्फत शिकवले जातात. http://www.htcindia.org/ चौधरी चरणसिंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चरल मार्केटिंग (एनआयएएम) : कृषी पणनविषयक अल्प मुदत कालावधीचे विविध प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेत राबविण्यात येतात तसेच काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, ग्रेडिंग, पॅकिंग व शीतगृह व्यवस्थापन, कृषी व्यापार, बाजार व्यवस्थापन, कृषी व्यापारात माहिती तंत्रज्ञानाचा वापर, ई ट्रेडिंग आदी अनेक विषयांवर संस्थेमार्फत देशभर प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवले जातात. कृषी व संलग्न पदवीधरांसाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम (पीजीडीएबीएम) उपलब्ध आहे. अधिक माहिती: http://www.ccsniam.gov.in/ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चरल एक्‍स्टेन्शन मॅनेजमेंट, हैद्राबादकृषी व्यवसाय व्यवस्थापन व कृषी विस्तार व्यवस्थापन या विषयांतील पदव्युत्तर पदविका आणि कृषी विस्तार सेवा पदविका हे तीन अभ्यासक्रम राबविण्यात येतात. यापैकी कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम देशातील सर्वोत्तम कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम समजला जातो. ऍग्री क्‍लिनिक ऍण्ड ऍग्री बिझनेस हा दोन महिने कालावधीचा निवासी अभ्यासक्रम राबवला जातो. याशिवाय अल्प मुदतीचे अनेक निवासी प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेमार्फत वर्षभर राबविण्यात येतात. अधिक माहितीसाठी: http://www.manage.gov.in/ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅंटेशन मॅनेजमेंट (आयआयपीएम) : देशातील विविध पीक संघटना व पिकांसाठी कार्यरत असलेली शासकीय मंडळे - महामंडळे व विविध शासकीय विभागांच्या सहकार्यातून या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी केली जाते. कृषी व्यवसाय व पीक व्यवस्थापन या विषयांतील एमबीए समकक्ष पदव्युत्तर पदविका आणि टी टेस्टिंग ऍण्ड मार्केटिंग व चहा मळा व्यवस्थापनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांत पीक व्यवस्थापनाबरोबरच पणन व्यवस्थापनावरही भर देण्यात आला आहे. http://www.iipmb.edu.in/ डायरेक्‍टोरेट ऑफ मार्केटिंग ऍण्ड इन्स्पेक्‍शन (डीएमआय) : शेतीमालाची प्रतवारी, बाजार समिती व्यवस्थापन असे अनेक प्रशिक्षण कार्यक्रम डीएमआयमार्फत घेण्यात येतात. www.agmarknet.nic.inकृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास संस्था (अपेडा) : अपेडा ही संस्था केंद्र सरकारच्या व्यापार मंत्रालयांतर्गत काम करते. संस्थेमार्फत शेतकऱ्यांना निर्यातीबाबत मार्गदर्शन, गुणवत्ता, निकष, उर्वरित अंश आदीबाबत प्रशिक्षण व आर्थिक मदत देण्यात येते. संपर्क http://www.apeda.gov.in

 

अन्न प्रक्रिया उद्योग  

 

 

अन्न प्रक्रिया उद्योग आज आपण अशा उद्योगाकडे वळणार आहोत ज्याच्याकडे भारताने मागील दशकापासून विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे अजूनही या उद्योगाचा भारतात झालेला नाही. त्यामुळे ह्या उद्योगामध्ये प्रचंड वाव आहे. अन्नप्रक्रिया आपण मागील लेखांमध्ये फळ आणि शेती याविषयी माहिती घेतली. या पदार्थांवर प्रक्रिया करून विविध प्रकारचे पदार्थ निर्माण करता येतात. या पदार्थांना प्रचंड मागणी असतेच मात्र मूळ फळ किंवा शेतीपदार्थापेक्षा प्रक्रिया करून मुल्यवर्धन केलेल्या पदार्थांचे आर्थिक मूल्यही कैक पटीने वाढते. त्यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अन्नप्रक्रिया उद्योगअन्नप्रक्रिया म्हणजे अन्नपदार्थांवर प्रक्रिया करून विविध पदार्थांची निर्मिती करणे. या प्रक्रियेमध्ये विविध प्रकारचे पदार्थ निर्माण केले जातात. यामध्ये विविध प्रकारची पेये, चूर्ण आणि विविध प्रकारचे ठोस पदार्थ बनवता येतात. दुग्धव्यवसाय, प्रोसेस केलेले पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स. धान्यापासूनचे पदार्थ, मसाले, जाम, जेली, मीठ, पॅकेज फूड, इन्स्टंट फूड, लोणचे, मुरंबा, आंब्याचे विविध पदार्थ यांसारखे कितीतरी व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी उपलब्ध आहे. अजून यामध्ये फळे, भाज्या, चिकन, मटन, दूध, चॉकलेट्स, सोयाचे पदार्थ, मिनरल वॉटर उद्योग यांचाही समावेश होतो. या इंडस्ट्रीसाठी लागणारा कच्चा माल भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचबरोबर मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रसामग्री या सार्‍या गोष्टी आपल्यासाठी व्यवसायासाठी अनुकूल आहेत. आपणाला निर्यातीसाठी पण खूप संधी आहेत. अगदी लहान प्रमाणापासून सुरु करून कितीही मोठ्या प्रमाणापर्यंत हा उद्योग वाढवता . विविध प्रकारची उत्पादने एकत्र सुद्धा . उत्तम प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. विविध प्रकारच्या अन्नप्रक्रिया उद्योगांची आपण माहिती घेऊया:मसाले भारतीय मसाले प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. भारतीय मसाल्यांमध्ये जरी प्रसिद्ध ब्रान्ड असले तरीही इतर अनेक मसाल्यांना उत्तम मागणी आहे. त्यामुळे मसाल्यांची विक्री आणि निर्यात हा एक उत्तम व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे हळदीचा व्यवसाय सुद्धा खूप चांगला पर्याय आहे. फळेप्रक्रिया फळप्रक्रिया हा एक उत्तम व्यवसाय आहे. ज्यामध्ये कितीतरी प्रकारची उत्पादने शक्य आहेत. यामध्ये आंब्यापासून बनणारे आमरस, पाक, आंबेवडी तसेच सफरचंद, अननस, आंबा बनणारी शीतपेये प्रसिद्ध आहेत. स्वतःचा ब्रांड बनवून या व्यवसायात उत्तम व्यवसाय निर्माण करता येईल. दुग्धप्रक्रिया भारतासारख्या देशात जिथे एकीकडे दुभदुभत्याची मुबलकता आहे आणि दुसरीकडे काही ठिकाणी दुधाची वानवा आहे, अहसा ठिकाणी दुधाची भुकटी तसेच सुगंधी दुध, विविध माध्यमातून प्रक्रिया केलेले दुध आणि असे इतर अनेक प्रकारे व्यवसाय करता येईल. भारतातून खूप मोठ्या प्रमाणात निर्यात होते. शीत गृहे आणि गोदामे प्रक्रियेबरोबरच उत्पादनांचे साठवणूक केंद्र हा सुद्धा उत्तम व्यवसाय आहे. फळे, भाज्या आणि मासे यांच्या साठवणुकीसाठी शीतगृहांची आवश्यकता आहे. तसेच हि उत्पादने वाहून नेण्यासाठी शीत वाहतूकव्यवस्था हा सुद्धा एक उत्तम व्यवसाय आहे. अनुदाने :अन्न प्रक्रिया उद्योगासाठी अनेक प्रकारची अनुदाने आणि वित्त योजना उपलब्ध आहेत. यामध्ये मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग च्या अनेक योजना आहेत. नाबार्ड या बॅंकेतर्फे अनेक प्रकरच्या कर्जाच्या योजना आहेत. सिडबी बँकेच्या अनेक योजना आहेत. फूड प्रोसेसिंग पार्क उभा करण्यासाठी अनेकविध योजना शासनातर्फे राबवल्या जातात. त्यामुळे या व्यवसायात येनाय्साठी उत्तम वित्त उपलब्ध आहे. प्रशिक्षण:अन्नप्रक्रिया व्यवसायाचे प्रशिक्षण अनेक ठिकाणी उपलब्ध आहे:केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय फूड प्रोसेसिंग संस्थेतर्फे काही मोठे कोर्सेस राबवले जातात. यामध्ये बीएस्सी आणि एमएससी कोर्सेस उपलब्ध आहेत. असेच कोर्सेस मुंबई विद्यापीठतर्फे सुद्धा राबवले जातात. त्याचप्रमाणे दुग्धप्रक्रिया आणि मत्स्य या विषयात विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे ज्याला मोठा अभ्यास करायचा नाही पण लहान कोर्सेस करून व्यवसाय सुरु करायचा आहे, त्यांच्यासाठी अनेक लहान मुदतीचे कोर्सेस राबवले जातात. खादी आणि ग्रामीण व्यवसाय या केंद्र शासनाच्या संस्थेतर्फे अनेक लहान कोर्सेस राबवले जातात. यामध्ये मसाले, बेकरी असे अनेक विविध कोर्सेस उपलब्ध होतात. त्याच्र धर्तीवर एमएसएमइ- डीआय असे अनेक कोर्सेस राबवते. मिटकॉन हि पुण्यातील संस्थाही असे अनेक कोर्सेस राबवते. एकंदरीत अन्नप्रक्रिया हा एक अतिशय व्यापक आणि प्रचंड संधी उपलब्ध असणारा व्यवसाय आहे. यामध्ये लहान प्रमानापासून ते अगदी कोट्यावधीची उलाढाल असणारा व्यवसाय निर्माण करणे शक्य आहे. यासाठी केवळ या व्यावास्याची उत्तम माहिती घेऊन उतरणे शक्य आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला नक्की कोणते उत्पादन घाय्यचे आहे, ते ठरवून त्यामध्य उतरणे आवश्यक आहे. उत्तम प्रशिक्षण, शासनाची वित्त मदत आणि वाढीसाठी पुष्कळ वाव अशा सर्व बोटे तुपात असणार्या या व्यवसायाचा आपल्या तरुणांनी विचार करायलाच हवा.

 


 

 

वनोपजांचे व्यवसाय

 

 

 

"वन" हे पर्यावरणीय यंत्रणेतील अतिशय महत्वाचा घटक. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि विविध पक्षी, पशु आणि वृक्षसंपदेच्या रक्षणासाठी वनसंपदेच्या रक्षणाची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त वनवासी किंवा आदिवासी हि फार मोठी जमात, जो आपल्या ग्रामीण समाजाचा खूप मोठा भाग आहे, तो या वनांच्या सहवासात जगात असतो. त्यामुळे सामाजिक आणि पर्यावरणीय फायद्यासोबतच खूप मोठा आर्थिक आयामही आहे. आज आपण याच घटकाबद्दल बोलणार आहोत!वनामध्ये कित्येक स्वरूपाच्या वृक्षांचा आणि वेलींचा समावेश असतो. यात सागासारख्या मोठ्या झाडापासून ते औषधी वनस्पतीन्पर्यंत आणि लहान गवतांपर्यंत अनेक प्रकार आहेत. या व्यतिरिक्त कित्येक प्राणी आणि पक्षी आणि सध्या वाढत असलेले जंगलातील पर्यटन प्रकारचे व्यवसाय यातून निर्माण होतात. शहरातील कित्येक तरुण ग्रामीण आणि वनवासी आणि आदिवासींच्या मदतीने सुंदर असा व्यवसाय उभारू शकतात. वनशेती वनांमधून अनेक प्रकारचे वृक्ष दृष्टीस पडतात. मात्र आपण जाणीवपूर्वक वनांमध्ये शेती सुद्धा करू शकतो. वाणांची रचना अशी असते कि त्यात अनेक प्रकारचे वृक्ष असतात. त्यांच्या मुलांमुळे वनांमधील जमिनीतील पाण्याचे प्रमाण अधिक असते. सावली आणि उन योग्य प्रमाणात मिळते.त्यामुळे वनशेती हा अतिशय किफायतशीर व्यवसाय होऊ शकतो. वनांमध्ये अनेक प्रकारचे वृक्ष आढळतात. यातील समान वृक्षांची नोंद करून त्यांच्यापासून उत्पादने मिळवता येऊ शकतात. साग, बांबू:शहरातील इमारतींच्या आणि घरांच्या बांधणीसाठी तसेच फर्निचर मध्ये महत्वाचे असणारे हे दोन वृक्ष. यापैकी बांबू दोन प्रकारचे आढळतात. सागाचे लाकूड सर्वोत्तम मानले जाते. बांबू हा एक वेगळा व्यवसायच आहे. बांबूचे फर्निचर आणि इतर गोष्टी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बांबूच्या लागवडीतून तुम्ही उत्तम व्यवसायाची निर्मिती करू शकता. नारळ , सुपारी,कोकम नारळ सुपारी कोकम या झाडांमधून विविध उपज मिळते. सुपारीच्या लागवडीतून सुगंधी सुपार्यांचा व्यवसाय विकसित होऊ शकतो. नारळ हा कल्पवृक्ष आहच . अगदी कथ्यांपासून नारळाच्या पाण्यापर्यंत आणि करवंटीपर्यंत काहीही फुकट जात नाही. कोकम हे औषधी झाड आहे. कोकम सुद्धा अतिशय महत्वाचे झाड आहे. साधारण: कोकणात वाडीसारख्या प्रकारामध्ये हा व्यवसाय करता येतो. वनांमध्ये हा प्रकार अधिक वेगाने करता येण्यासारखा आहे. औषधी वनस्पतीऔषधी वनस्पतींबद्दल आपण सविस्तर पाहिलेले आहे. या वनस्पती वनांमध्ये विपुल प्रमाणात आढळतात. साधारणतः एकाच प्रकारच्या वनस्पतींची नोंद केल्यास शेती न करताच अनेक उत्तमोत्तम वनस्पती आपल्याला जंगलात मिळू शकतात. मात्र वर म्हटल्याप्रमाणे या वनस्पतींची जाणीवपूर्वक लागवड करता येणे शक्य आहे. यासाठी औषधी वनस्पतीमधील ठराविक प्रकार शोधून त्यांची लागवाद वनांमध्ये करावी. या वनांना संरक्षित देखील करता येते. रबर आणि डिंकनववी-दहावी च्या भूगोलाच्या पुस्तकात अनेकदा रबर, चिक, डिंक या वनस्पतींच्या उप्जांचा उल्लेख आला आहे. मात्र तेंव्हा नक्की हा किती मोठा व्यवसाय आहे याची आपल्याला कल्पना नसते. अगदी सहज मिळणाऱ्या या उपजान्मधून खुप मोठा व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो. मधुमक्षिका व तुतीची लागवड मधु मक्षिका पालन हा असाच एक पण दुर्लक्षित पण फायदेशीर व्यवसाय आहे. मध हे काही अतिशय उच्च प्रतीच्या वानोपाजांपैकी एक मानले जाते आणि त्याची मागणी पुष्कळ आहे. याच बरोबर तुतीची लागवड करून सुतनिर्मिती करता येते. हा सुद्धा फायदेशीर व्यवसाय आहे. वनपर्यटनयासार्वांव्यातीरिक वनपर्यटन हा खूप मोठा व्यवसाय वाढीस लागत आहे. शहरातील कित्येक लोकांना नेहमीच्या गजबजाटापासून दूर अशा जंगलांमध्ये वेळ घालवणे आवडते. एखाद दिवस पशुपक्षांच्या संगतीत, आणि झाडांच्या सावलीत घालवण्यासाठी आजची तरुणाई पैसे खर्च करू शकते. अशा वेळेस एखाद्या संरक्षित वनामध्ये वनखात्याच्या परवानगीने आणि त्यांच्या सर्व नियमांचे पालन करू वनपर्यटनाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. एक दिवसाच्या सुद्धा सहली आयोजित करता येतात. अधिक माहिती:तालुका वन अधिकारी प्रशिक्षणमिटकॉन, पुणे अधिक माहिती प्रबोधक वनोपज निर्मिती व मार्गदर्शन केंद्र ९९६७७०६१५०

 

bottom of page