



फुलशेती: करिअरची सुवासिक संधी
आपण फळ फळावळ आणि बागायती शेतीविषयी माहिती घेतली. असेच किंबहुना अधिक नफादायक क्षेत्र आहे फुलशेतीचे. कारण तुम्ही यात एका विशिष्ठ फुलामध्ये नैपुण्य मिळवता.आज जाणून घेऊ फुलशेती संबंधी!
भारतात अनेक ठिकाणी फुलशेती आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. काश्मीर गुलाबासाठी प्रसिद्ध आहेच. मात्र महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी उत्तमोत्तम फुले होऊ शकतात! त्यामुळे तुमच्याकडे गुंत्यात जरी जमीन असेल तरी तुम्ही फुलशेती करू शकता. आणि ती दिसायलाही सुंदर दिसते.!
फुलशेती
विविध फुलांची केलेली शेती म्हणजे फुलशेती. मात्र एकाच ठिकाणी अनेक फुले लावण्यापेक्षा एखादेच आणि जास्त जागा असेल तर दोन तीन शेती एकत्र लाऊ शकता.
महाराष्ट्र फुलशेतीमध्ये अव्वल आहे. महाराष्ट्रात सुमारे ४००० हेक्टर जमीन फुल्शेतीखाली आहे.
गुलाब, अष्टर, लिली, झेंडू, क्रीसेन्थेमम ह्या महाराष्ट्रातील काही उत्तम प्रजाती आहेत. महाराष्ट्रात ३०% गुलाबाची आणि २७ % झेंडूची लागवड केली जाते.
महाराष्ट्रात मोठ्या निर्यातक्षम इंडस्ट्री सुद्धा आहेत. विशेषतः पुणे-नाशिक भागात ह्याची संख्या अधिक आहे.
महाराष्ट्रात कमी आणि अधिक तंत्रज्ञान वापरणारे आणि परंपरागत फुले घेणारे असे दोन प्रकार आहेत. अधिक तंत्रज्ञान वापरणात्या निर्यातक्षम कंपन्या सामान्यतः तळेगाव लोणावळा परिसरात आढळतात.
ग्रीन हाउस तंत्रज्ञान
नियंत्रित वातावरणात शेती व्हावी यासःती ग्रीन हाउस तंत्रज्ञानाने शेती केली जाते. फुलशेती करण्यासाठी ग्रीन हाउस तंत्रज्ञान अधिक कार्यक्षम आहे.
फुलशेतीसाठी विविध योजना
राष्ट्रीय होर्टीकल्चर मिशन
फळ आणि फुल शेतीला प्राधान्य देण्यासठी राष्ट्रीय होर्तीकाल्चार मिशन हि अतिशय चांगली योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेन्त्रागत विविध फळ आणि फुलांच्या रोपांवर अनुदान,लागवडीच्या खर्चावर आणि लागणाऱ्या मनुष्यबळाच्या बिदागीवर अनुदान देण्यात येते.
याचप्रमाणे नर्सरी, संशोधन केंद्र आणि बियाणे विकास केंद्र ह्यांच्या विकासासाठी सुद्धा अनुदान दिले जाते.
अधिक माहिती
तालुका कृषी अधिकारी
अपेडा च्या योजना
या व्यतिरिक्त अपेडा हि शेती उत्पादन विकासासाठी असणारी शासकीय संस्था विविध योजना देते.
अपेडाच्या योजना शेती उत्पादन, वाहतूक आणि मार्केटिंग तसेच निर्यात वाढीसाठी आहेत. यामध्ये मार्केटिंग डेव्हलपमेंट स्कीम लोकप्रिय आहे.
अधिक माहिती:
अपेडा
अन्किंग कॉम्प्लेक्स इल्दिंग २ सेक्टर १९/ए, वाशी
लेंडस्केपिंग
याशिवाय घरगुती आणि ऑफिस मध्ये विविध बागेतील सजावटी सुद्धा उत्तम्व्यावासाय आहे. यासाठी तुम्हाला शेतीचे थोडक्यात ज्ञान विशेषतः शोभिवंत फुलांची आणि त्यांच्या लागवडीची माहिती असणे आवश्यक असते.
यासाठी एक उत्तम कोर्स मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागातर्फे केला जातो.
अधिक माहिती
बहि:शाल विभाग
मुंबई विद्यापीठ
कालिना सांताक्रूझ
फुलांच्या सुवासात आणि रंगीबेरंगी दुनियेत असणे आवडत असेल तर फुलांच्या व्यवसायात उत्तम संधी उपलब्ध आहे.
कुक्कुटपालन
शेतीला जोडधन्द्यान्विषयी आपण माहिती घेत आहोत . मागील लेखात आपण शेळीपालनाविषयी माहिती घेतली होती. बोकड-शेळी प्रमाणेच खाण्यासाठी सर्वाधिक वापरला जाणारा प्राणी म्हणजे कोंबडी. आज आपण माहिती घेऊया कुक्कुटपालनाविषयी. शेतकरी म्हटला कि काही गोष्टी आपसूक आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. उदा बैलांची जोडी, गायी, एखादा कुत्रा, तसेच कोंबड्यांचे खुराडे. याचाच अर्थ कोंबड्या या शेतीच्या नैसर्गिक वातावरणात वाढणाऱ्या आहेत. मात्र म्हणूनच कोंबड्यांची शास्त्रोक्त पैदास करून शेतीला जोडउत्पन्न घेत येतेच शिवाय कुक्कुटपालन हा स्वयंसमर्थ असा उद्योग सुद्धा आहे. कुठलाही ग्रामीण व्यवसाय करीत असाल तर कोंबड्या पालन हा उद्योग त्याच्यासमवेत तुम्ही करू शकता. उत्पन्न:कोंबड्यांपासून मांस मिळते आणि तय्न्च्या अंड्यांना सुद्धा बाजारात चांगली मागणी असते. भारतात कुक्कुट-संशोधनात बहुपयोगी अशा कोंबड्यांच्या विविध जाती विकसित केलेल्या आहेत यामध्ये गिरिराणी किंवा ग्रामप्रिया, कृषिब्रो, गिरिराज आणि वनराज या जाती प्रामुख्याने नमूद करता येतील. वनराज कोंबड्या एका वर्षात साधारणपणे १४० ते १५० अंडी देतात. गिरिराज कोंबड्या वर्षाला १८० अंडी देतात.पक्षीपालन कोंबड्या नाजूक प्रवृत्तीच्या असतात आणि सांभाळणे अधिक जोखमीचे काम असते. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घायवी लागते. कुक्कुट पालन केंद्रकुक्कुट पालन केंद्राचे तापमान उबदार असावे मात्र फार अधिक तापमान कोंबड्यांना सहन होत नाही. हवा चांगली खेळती ठेवावी. पक्ष्यांची विष्ठा नियमितपणे साफ करावी. घरट्यात योग्य प्रकाश असावा. औषधेकोंबड्यांना लसीकरण आणि खाद्यातून औषधे देणे आवश्यक असते. यासाठी योग्य डॉक्टरचा सल्ला घ्यावा. जवळच्या पशुवैद्यकीय केंद्राशी किंवा कृषी वा पशुवैद्यकविज्ञान विभागाशी नियमित संपर्कात राहावे. कोंबड्यांवर ताण येणार नाही यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी प्रत्येक कोंबडीला योग्य जागा मिळेल, गर्दी होणार नाही, पिंजर्यातील अमोनियाचे प्रमाण वाढणार नाही याची काळजी घायवी लागते. गावठी कोंबड्यांच्या पालनासाठी अधिक काळजी करणे आवश्यक आहे. पिल्लांना सुरुवातीचे दिवस जपणे आवश्यक असते. गावठी कोंबडी बॉयलर कोंबडी पेक्षा अधिक भाव देते. कुक्कुटपालनासाठी शासनाच्या योजना कुक्कुत्पालानासाठी शासनाने विशेष योजना सुरु केल्या आहेत. नाबार्ड संस्थेमार्फत कुक्कुत्पालानासाठी कर्ज आणि वेंचर फंड स्वरूपातही मदत केली जाते. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर शासकीय बँकांच्या कुक्कुटपालनासाठी विशेष कर्जाच्या योजना आहेत.याशिवाय कुक्कुट खाद्य निर्मिती केंद्र/युनिट उभारणीयोजना , कुक्कुट उत्पादन विपणन व्यवस्था केंद्र स्थापित करणे योजना, कुक्कुट उत्पादन निर्यात सहाय्य केंद्र उभारणी योजना आणि कुक्कुट उत्पादनांच्या किरकोळ विक्रीसाठी दुकाने उभारणी योजना या योजना पशुसंवर्धन विभागातर्फे राबविल्या जातात. संपर्क: अ) नाबार्ड कार्यालय ब) स्टेट बँक ऑफ इंडिया कार्यालय क) बँक ऑफ इंडिया कार्यालय ड) जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय कुक्कुटपालन प्रशिक्षण अ) सेन्ट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ओर्गनायझेशन आरे कॉलनी, गोरेगाव पूर्व ०२२-२९२७२४९७ ब) मिटकॉन इंस्टीट्युट शिवाजी नगर, पुणे कुक्कुट पालन हा अतिशय नफ्याचा व्यवसाय आहे . आजच्या तरुणांनी अगदी शहरी भागातील देखील, पुढे येउन हा व्यवसाय सुरु करण्यास हरकत नाही. गावाला जाण्याची तयारी असलेल्या व्हीआरएस घेतलेल्यांनी अथवा रिटायर्ड झालेल्यांनी सुद्धा ह्या व्यवसायाचा नक्की विचार करावा.
शेळीपालन
आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे शेतीवरील उत्पन्नावर राहण्यापेक्षा कृषीसंलग्न व्यवसाय करणे अधिक इष्ट आहे. यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन, दुभ-दुभते या मुख्य जोड-व्यवसायांचा समावेश होतो. आज आपण माहिती घेऊ, शेळीपालनाविषयी!शेळीपालन शेळी हा गावात वरचेवर आढळणारा प्राणी आहे. यावरून शेळी माणसाळलेला प्राणी आहे. अर्थात शेळी करताना योग्य जातीची निवड, योग्य देखभाल आणि संगोपन आवश्यक आहे. शेळीला गरीबाची गाय’ असे म्हटले जाते, उगाच नाही. कोरड्या जमिनीवर, किंवा चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या जमिनी ज्या इतर जनावरांसाठी चांगल्या नसतील तिथे शेळीपालन करता येते. फार थोडी गुंतवणूक करून करता येणारे शेळीपालन, किरकोळ आणि लहान शेतकर्यांसाठी एक फायदेशीर उद्योग आहे.साधारणपणे एका शेळीपासून मिळणारे दूध ४ जणांच्या कुटुंबाला पुरेसे होते. गाई - म्हर्शीच्या तुलनेत शेळीला खाद्य कमी लागते, अगदी टाकाऊ अन्न, भाजीपाला, झाडांची पाने तो खाऊ शकते. योग्य संगोपनात, उत्तम चारा आणि खाद्य दिल्यास शेळी १४ महिन्यांतून दोनदा पिले देते. बोकड ६ महिन्यामध्ये विक्रीसाठी तयार होतो. शेळी इतर प्राण्यांच्या मानाने फार काटक आहे. तिला रोगराई कमी होते. महाराष्ट्रात उस्मानाबादी,संगमनेरी,सुरती या शेळ्यांच्या आढळणाऱ्या प्रमुख जाती आहेत. तुमच्या शेळी पालनाचा प्रमुख उद्देश मांसोत्पादन किंवा दुध-दुभते आहे यावर जातीची निवड अवलंबून असते. शेळी म्हणजे प्राण्यांमधील कल्पवृक्षच! शेळीचे मांस खाण्यासाठी वापरले जातेच, इतर अवयवही उपयुक्त आहेत! शिंगे व खुरांपासून डिंकासारखे पदार्थ मिळतात, लहान आतड्यापासून शस्त्रक्रियेत टाके घालण्यासाठी वापरला जाणारा दोरा, हाडांपासून खत मिळते आणि कातडीपासून उच्च प्रतीचे चामडे मिळते. याशिवाय, काश्मिरी जातीच्या शेळ्यांकडून "पश्मिना' नावाची मऊसूत लोकर आणि अंगोरा जातीच्या शेळ्यांपासून "मोहेर' नावाची लोकर मिळते.शेळीपालन कसे करावे?शेळ्यांचे शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आहार, भरपूर व्यायाम आणि काटेकोर सांभाळ महत्वाचा आहे. संगोपनासाठीची जागा मोकळी, हवेशीर, उबदार आणि कोरडी असणे आवश्यक आहे. पशूतज्ज्ञांच्याकडून वरचेवर तपासणी करून घ्यावी.स्वतःचा चारा तयार केल्यास व्यवसाय अधिक फायदेशीर ठरेल. चारा उत्पादन फायदेशीर, कमी खर्चातील आणि अधिक मागणी कमी पुरवठा असणारे आहे. डोंगराळ व ओसाड जमिनीवरही येऊ शकेल. जातींची निवड राज्यातील शेळ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली जात आहे. कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. ही जात सुद्धा मांसउत्पादनासाठी चांगली आहे. याशिवाय महाराष्ट्राबाहेर बारबेदी, जमनापारी (उत्तरप्रदेश) मलबारी, मेहसाना व झालावाडी (गुजरात), बीटल (पंजाब), सिरोही, अजमेरी, कच्छी (राजस्थान) या जाती आहेत. कल्याणमध्ये दर मंगळवारी व शनिवारी भरणाऱ्या बाजारात मराठवाड्यातून येणाऱ्या जातीवंत उस्मानाबादी जातीच्या शेळ्या उपलब्ध असतात. शेळीपालनासाठी योग्य नर निवडणे आवश्यक असते. पिल्लांची गुणवत्ता या नरावर अवलंबून असते. यासाठी कृषी विद्यापीठे तुमची मदत करू शकतात. गोठा शेळ्यांना फार खर्चिक गोठ्याची आवश्यकता नसते. असलेले साहित्य अथवा कमी खर्चाचे साहित्य वापरून छपराचे गोठे बांधल्यास ते ५ ते ६ वर्षे टिकतात. याकरिता सहजरित्या उपलब्ध होणारे साहित्य जसे बांबू, लोखंडी पाईप इ. तसेच छपरासाठी गवत वापरले जाऊ शकते. साधारणतः ५० शेळ्यांचा एक कळप असतो, २५-३० शेळ्यांसाठी १ नर असे प्रमाण असते. रोगप्रतिबंध शेळ्यांमध्ये रोगाचे प्रमाण कमी असते तरीही, रोगप्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक ठरते. शेळ्यांची वरचेवर तपासणी करावी लागते. विशेषतः गाभण शेळ्याना पशुतज्ज्ञांकडून योग्य कालावधीत आंत्रविषार लसीकरण करून घेणे आवश्यक ठरते. खाद्यशेळीला मिळणाऱ्या खाद्यावर तिचे वजन आणि अर्थात मांस आणि दुध अवलंबून असते. शेळीच्या खाद्यात दिवसाकाठी ३ ते ४ किलो हिरवा चारा व दीड ते दोन किलो वाळलेली वैरण द्यावे लागते. त्यांना दिवसातून ३ - ४ वेळा खाद्य देणे आवश्यक आहे. शेळ्यांना प्रथिनयुक्त द्विदल जातींचे हिरवे ओले, दूध देणाऱ्या शेळ्यांना आंबोण उदा. मका, ज्वारी, बाजरी, ओट, नाचणी इ चा वापर करावा. प्रशिक्षण शेळीपालन करण्यासाठी माहिती कृषी विद्यापीठ दापोली आणि राहुरी येथे उपलब्ध आहे. संपर्क:कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली. संपर्क - ०२३५८-२८०५५८ संगमनेरी शेळीसुधार योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.संपर्क - ०२४२६-२४३३६२, २४३४५५ शेतीबरोबर, शेली पालनाचा जोडधंदा अधिक उत्पन्न देतोच. मात्र शेली पालन स्वतंत्र व्यवसाय म्हणूनही फायदेशीर आहे. विशेश्तः मुंबईजवळ कल्याण परिसरातील गावांमध्ये याचा विकास अधिक प्रमाणात होऊ शकतो.