



मर्चंट बँकिंग मध्ये करिअर
आपण केपिटल मार्केट मधील संधी पाहिल्या होत्या. त्यामध्ये मर्चंट बँकर हा एक प्रकार आपण पहिला होता. मर्चंट बँकर हा एक चांगला करिअर पर्याय आहे. यात पैसाही खूप चांगला आहे आणि करिअर विकासाचा मार्गही. मात्र तरीही यात अधिक प्रमाणात मराठी तरुण येत नाहीत. त्यामुळे या करिअरचा मार्ग काय आणि त्यामध्ये काय संधी आहेत याचा मागोवा आपण घेऊ.
मर्चंट बँकिंग म्हणजे काय?
मर्चंट बँकर हा सेबी नोंदणीकृत सल्लागार असतो. जेंव्हा एखादी कंपनी आपले शेअर्स भांडवली बाजारामध्ये पब्लिक इस्श्यू च्या माध्यमातून आण तेंव्हा, तिला सेबी(इस्श्यु ऑफ केपिटल) रेग्युलेशन्स या कायद्यान्वये सर्व कायदेशीर कारवाई करावी लागते. पब्लिक इस्श्यू मध्ये कंपनी जनतेकडे जात असल्याने, लोकान्ह्चा पैसा सुरक्षित राहावा यासाठी सेबी ने कडक निर्म्बंध घातले आहेत.
त्यामुळेच बेकायदेशीर कंपन्या भांडवली बाजारात उतरू नयेत यासाठी सेबीला अशा नोंदणीकृत सल्लागारांची आवश्यकता भासते जे या पब्लिक इस्श्यू मह्द्ये येणाऱ्या कंपन्यांवर लक्ष ठेऊ शकतील, आणि या कंपन्या भांडवली बाजारात येण्यास्ठी खरच प्रामाणिक आहेत का हे पडताळून पाहू शकतील. यासाठी सदर कायद्यान्वये सेबीने हे निर्देश दिले आहेत कि, कुठलाही पब्लिक इस्श्यू आणण्यासाठी कंपनीला "अ" केटेगरीच्या मर्चंट बँकरची नेमणूक करावी लागेल.
थोडक्यात भांडवली बाजारात पब्लिक इस्श्यू आणण्यासाठी मर्चंट बँकरची मदत घेणे कंपन्यांना आवश्यक आहे.
मर्चंट बँकर कोण असतो?
वर नमूद केल्याप्रमाणे मर्चंट बँकर सल्लागार असतो. मात्र ती कंपनीच असावी लागते. थोडक्यात एखादी व्यक्ती सोल प्रोप्रायटर म्हणून किंवा एखादी पार्टनरशिप फर्म मर्चंट बँकर असूच शकत नाही. दुसरे म्हणजे हा मर्चंट बँकर सेबी कडे नोंदणीकृत असावा लागतो.
मर्चंट बॅंकर नोंदणीकृत करण्यासाठी सुद्धा सेबीने कडक निर्बंध घातले आहेत. यामध्ये मर्चंट बँकर ची आर्थिक परिस्थिती भक्कम असण्यासाठी ठराविक किमान पेडअप शेअर केपिटल किंवा पेड अप आणि रिझर्व मिळून किमान नेटवर्थ असणे आवश्यक आहे. मर्चंट बँकर ला एक लाख फी सुद्धा भरावी लागते. थोडक्यात आर्थिक परिस्थिती भक्कम असल्याशिवाय मर्चंट बँकर म्हणून कंपनी नोंदणीकृत होऊ शकत नाही.
आर्थिक सक्षमतेप्रमाणे मर्चंट बँकर चे अ, बक आणि ड असे चार भाग पडतात. त्याप्रमाणे त्यांचे अधिकार आणि कार्येही बदलतात.
पब्लिक इस्श्यू साठी अ केटेगरी मर्चंट बँकर चीच आवश्यकता असते.
ब, क आणि ड मर्चंट बँकर मदतनीस म्हणून किंवा सहसल्लागार म्हणून काम पाहता येते. मर्चंट बँकर सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार म्हणून सुद्धा काम पाहू शकतो.
मर्चंट बँकरची कामे
१. आयपीओ- पब्लिक इस्श्यू
एखादी नवीन इस्स्यू आणत असेल तर तिला वर म्हटल्याप्रमाणे मर्चंट बँकर ची नेमणूक करणे अत्यावश्यक असते. आयपीओ साठी मर्चंट बँकर ची फी फार जास्त असते. आता लघु उद्योगांसाठी सुद्धा "एसएमई एक्सचेंज हे शेअर बाजारात वेगळे व्यासपीठ निर्माण झाल्याने इस्श्यूची संख्या वाढली आहे.
२. मर्जर्स- दोन कंपन्या जेंव्हा एकत्र येतात त्यावेळी उच्च न्यायालयामध्ये अर्ज करून आठ महिन्यांची एक लांबलचक कार्यवाही पूर्ण करावी लागते. जर एखादी कंपनी शेअर बाजारमध्ये नोंदणीकृत असेल तर त्या शेअर बाजाराची संमती असणेही आवश्यक आहे.
३. टेकओव्हर
टेकओव्हर हा सुद्धा मर्चंट बँकर चा एक महत्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे. जेंव्हा एखादी कंपनी उच्च न्यायालयाच्या मार्गाने न जाता, केवळ दुसर्या कंपनीचे अर्ध्याहून अधिक भांडवल विकत घेते, त्याला टेकओव्हर असे म्हणतात. जिचे भांडवल विकत घ्यायचे आहे, ती जर शेअर बाजार नोंदणीकृत कंपनी असेल तर सेबी ने टेकओव्हर साठी वेगळे नियम बनवले आहेत, त्यांचे पालन होणे आवश्यक असते. यासाठी सुद्धा मर्चंट बँकर ची मदत घेतली जाते.
४. बाय-बेक
जेंव्हा कंपनी आपले भांडवल काही प्रमाणात स्वतःच विकत घेते, त्याला बाय बेक असे म्हणतात. अधिक भांडवलाची आवश्यकता नसेल किंवा कंपनीच्या शेअरची किंमत फारच ढासळली तर कंपनी आपले शेअर्स विकत घेते. जर कंपनी शेअर बाजार नोंदणीकृत असेल, तर ती मर्चंट बँकर ची मदत घेते.
याव्यतिरिक्त कंपनी शेअर बाजारातून अ-नोंदणीकृत करणे आणि इतर तत्सम कामांसाठी मर्चंट बँकर ची मदत घेणे आवश्यक असते.
मर्चंट बँकिंग मध्ये करिअर कसे करावे?
मर्चंट बँकर्स ना आपल्या कामांसाठी कोणाची आवश्यकता असते हे पाहणे गरजेचे आहे. यामध्ये खालील व्यावसायिक मनुष्यबळाची त्याना आवश्यकता असते.
१) कंपनी सेक्रेटरी
२) चार्टर्ड अकौन्तन्त
३) एमबीए फायनान्स
४) एलएलबी (कोर्पोरेट कायदे)
कंपनी सेक्रेटरी हा बारावी नंतर पाच आणि पदवी नंतर दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. अधिक माहिती कंपनी सेक्रेटरी संस्था, मुंबई कार्यालय, जॉली मेकर चेंबर, नरिमन पोईंट, मुंबई
चार्टर्ड अकौन्तन्त हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम आहे. याम्ह्द्ये अधिक माहितीसाठी इंस्तीत्युत ऑफ चार्टर्ड अकौन्तन्त, कफ परेड, मुंबई शी संपर्क साधावा.
एमबीए देणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यापैकी उत्तम संस्थेमधून हा कोर्स करता येईल. फायनान्स विशेष प्राविण्याचे क्षेत्र असावे.
एलएलबी म्हणजे कायद्यातून पदवी घेऊन, सनद घेऊन व्यवसाय कायद्यांमध्ये प्राविण्य असावे. मास्टर्स (एलएलएम) केल्यास अधिक उत्तम.
याव्यतिरिक्त आयसीएफएआय, हैद्राबाद संस्थेचे मर्जर्स आणि एक्विझीशन, मर्चंट बँकिंग इ विषयत लहान कोर्सेस उपलब्ध आहेत. तसेच अनेक इतर व्यवस्थापन संस्थांनीही सुरु केले आहेत.
मराठी मुलांची संख्या या व्यवसायात कमी आहे. नोकरी साठी या क्षेत्रात संधी आहेत, स्पर्धाही आहे. मात्र एकदा संधी मिळाल्यास आणि आपले नैपुण्य सिद्ध केल्यास खूप चांगले करिअर इथे मिळू शकते. मर्चंट बँकिंग कडे वळणाऱ्या मुलांची सांख्य वाढली पाहिजे. आणि त्याहून मोठे स्वप्न पहायचे असेल तर स्वतःची मर्चंट बँकिंग कंपनी सुरु करण्याचे स्वप्न पाहावे.
तेंव्हा सुरु करा तुमचे ध्येय या श्रीमंत क्षेत्रात येण्यासाठी!
इन्व्हेस्टमेंट बँकर
प्रत्येक उद्योगाला उभे राहण्यासाठी आणि मोठे होण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. हे भांडवल शेअर्स किंवा लोन या दोन्ही प्रकारे उभे राहू शकते. उद्योग आणि गुंतवणूकदार म्हणून काम सल्लागानाचे महत्व त्यामुळेच वाढते. या सल्लागारांना म्हणतात इन्व्हेस्टमेन्ट बँकर. या मध्ये करिअर करण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे.
इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणजे काय?
इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणजे संस्थात्मक गुंतवणूक सल्लागार. मात्र हा सल्लागार उद्योगांना लागणाऱ्या मोठमोठ्या गुंतवणुका कंपन्यांमध्ये आणण्याचे काम करतो. तसेच मर्जर्स, टेकओव्हर्स मध्ये मोठमोठ्या उद्योगांसाठी वित्तीय सालाल्गर म्हणून काम करतो.
इन्व्हेस्टमेंट बँकर मर्चंट बँकर प्रमाणे सेबी मध्ये नोंदणीकृत होण्याची आवश्यकता नसते. मात्र मोठ मोठ्या कंपन्यांना वित्त विषयक सल्ले देण्यासाठी प्रशिक्षित, व्यावसायिक मनुष्यबळ असणे आवश्यक असते. त्यामुळे उत्तम बँकर होण्यासाठी चांगले भांडवल असणे आवश्यक आहे.
इन्व्हेस्टमेंट बँकर- उद्योग
उद्योगामध्ये येणारा पैसा हा इक्विटी म्हणजे समभाग किंवा लोन या पद्धतीने येऊ शकतो. एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूकदार तेंव्हाच पैसा गुंतवू शकतो जेंव्हा त्याला त्या पैशाची सुरक्षितता, आणि पाच ते सात वर्षांनी चांगल्या परताव्यासहित (रिटर्न्स) भांडवल परत मिळण्याची अपेक्षा असते. अर्थात उद्योजक आपल्या उद्योगाच्या व्यापातून गुंतवणूकदरांशी संबंध ठेऊ शकत नाही, तसेच आर्थिक ठोकताळे बांधून गुंतवणूकदारांना आपल्या उद्योगाची सद्यस्थिती आणि येणाऱ्या काळातील वाढीचे अंदाजपत्रक मांडण्याचे कौशल्यही त्याच्याकडे नसते. हे काम इन्व्हेस्टमेंट बँकर करतो.
त्यामुळे इन्व्हेस्टमेन्ट बँकर कडे पुढील गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
१) भांडवलाच्या गरजेसाठी आपल्याकडे आलेल्या उद्योगाचे संपूर्ण विश्लेषण करता येणे आवश्यक आहे. हे विश्लेषण उद्योगाची स्थिती, मागील वर्षांची आर्थिक अवस्था, आर्थिक ताळेबंद, एकंदरीत अशा प्रकारच्या उद्योगधंद्यांची स्थिती, त्यातुलनेत सदर उद्योजक किती योग्य आहे, या सर्वांचे विश्लेषण त्याला करता आले पाहिजे. त्यावरून उद्योगाची आर्थिक किंमत (नेटवर्थ) त्याला समजते. त्यावरून उद्योगाची सद्यस्थिती आणि येत्या काळातील वाढीचे अंदाज बांधून सदर उद्योगात गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास तयार होतील का? उद्योग त्यांना योग्य परतावा देऊ शकतो का? या प्रश्नांची उत्तरे त्याला मिळू शकतात.
२) भांडवलाच्या गरजेचे आकलन बँकर ला हवे. उद्योजक काय कतीही किंमत आणि गुंतवणुकीची अपेक्षा धरेल. मात्र सद्यस्थितीचे आकलन बँकर ला असणे आवश्यक आहे, आणि त्याने ते उद्योगाला करून दिले पाहिजे. बर्याचदा उद्योजक हवेत इमले बांधत असतो. त्याला जमिनीवर आणण्याचे काम इन्व्हेस्टमेंट बँकर करतो. उद्योगात कुठल्या पद्धतीची गुंतवणूक येऊ शकते, भारतीय किंवा परकीय गुंतवणूक येऊ शकते का? व्हेन्चर केपिटल योग्य राहील की, लोन? या प्रश्नांची उत्तरे शोधून काढता आली पाहिजेत.
इन्व्हेस्टमेंट बँकर ला कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते?
१) उद्योगाचे विश्लेषण आणि किंमत ठरवण्याच्या (व्हेल्युएशन) पद्धती.
२) गुंतवणूक आणि आर्थिक व्यवस्थापन
३) समभाग संशोधन (इक्विटी रिसर्च)
४) बिझनेस प्लान बनवणे
५) बँका, वित्तीय संस्था, व्हेन्चर केपिटल, एंजल इन्व्हेस्टर्स यांच्याशी चांगले संबंध.
इक्व्विटी सिंडीकेशन
जेंव्हा एखाद्या बिझनेस मध्ये समभाग पद्धतीने गुंतवणूक आणली जाते, त्याला इक्व्विटी सिंडीकेशन असे म्हणतात.साधारणतः, व्हेन्चर केपिटल, आणि जोखीम पत्करू इच्छिणारे श्रीमंत खासगी वैयक्तिक गुंतवणूकदार (एंजल इन्व्हेस्टर्स) किंवा संस्थात्मक गुंतवणूकदार (प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स) अशा प्रकारची गुंतवणूक करू इच्छितात.
हे गुंतवणूकदार फार चोखंदळ असतात, त्यामुळेच त्यांना खुश करणे आणि गुंतवणुकीस राजी करणे अतिशय कठीण काम आहे. येथेच इन्व्हेस्टमेंट बँकर च्या गुणांची कसोटी लागते. कारण या गुंतवणुकीसाठी काहीही तारण ठेवावे लागत नाही. उद्योगाच्या आणि उद्योजकाच्या गुंतवणूकदार हि गुंतवणूक करतो.
ही गुंतवणूक करण्यासाठी, उद्योगाला फार मोठी तयारी करावी लागते. गुंतवणूकदाराला राजी करण्यासाठी, आपला उद्योग, आपली उद्योग कल्पना कशी चांगली आणि वेगळी आहे, आपला उद्योग का भरभराटीस जाईल, त्यामध्ये काय विशेष आहे, आत्तापर्यंतच्या आपल्या नफ्याचे, ताळेबंदाचे उत्तम सादरीकरण, पुढील वर्षातील भरभराटीची गणिते मांडणे आवश्यक असते. हे काम इन्व्हेस्टमेंट बँकर करतो.
मात्र दुसरीकडे, इन्व्हेस्टमेंट बँकरचे व्हेन्चर केपिटल आणि गुंताव्नुक्दारंशी चांगले संबंध असणे आवश्यक असते. त्यामुळे, या बँकर कडून आलेल्या गुंतवणुकीच्या संधींचा विचार गुंतवणूकदार प्राधान्याने करतील.
प्रतिष्ठित, मोठ्या, उद्योगात जम बसलेल्या कंपन्यांमध्ये समभाग गुंतवणूक आणणे तुलनेने सोप्पे असते. मात्र अशा गुंतवणुकी मध्ये उद्योगाचे मूल्यमापन (व्हेल्युएशन) फार महत्वाचे आणि जोखमीचे असते.
लोन सिंडीकेशन
जेंव्हा उद्योगाला कर्जाऊ स्वरूपात भांडवल उभे करायचे असते, तेंव्हा लोन सिंडीकेशन म्हणतात. लोन तुलनेत सोप्पे असते कारण यात कर्जाच्या एवढेच तारण ठेवावे लागते. मात्र तरीही उद्योगाचे सर्व ताळेबंद, भावी योजना यांची मांडणी करून बँकेला किंवा वित्तीय संस्थेला द्यावीच लागते. त्यात फक्त व्हेल्युएशन चा प्रश्न उद्भवत नाही.
या व्यतिरिक्त, मर्जर्स आणि एक्विझिशन (दोन कंपन्या एकत्र येणे), टेकओव्हर (एखाद्या कंपनीने दुसर्या कंपनीचे अर्ध्याहून अधिक समभाग खरेदी करणे) ह्या मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट बँकर फार मोठी भूमिका बजावतात.
आर्थिक नफा
वर उल्लेखलेली सरव कामे फार मोठ्या आर्थिक उलाढालीची आहे. त्यामुळे ही कामे केल्याबद्दल इन्व्हेस्टमेंट बँकर ला मिळणारी फी सुद्धा तशीच मोठी असते. इन्व्हेस्टमेंट बनकर कडे किती चांगले व्यावसायिक मनुष्यबळ आहे, आणि गुंताव्नुक्दारांशी किती चांगले संबंधआहेत , यावर ते काम किती लवकर यशस्वी होईल हे अवलंबून असते. त्यामुळे या व्यवसायात खूप मोठा नफा आहे. आणि शिवाय मर्चंट बँकर सारखी कुठे नोंदणी करण्याची आवश्यकताही नसते.
लहान सल्लागार पासून सुरुवात
मात्र इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून विराजमान होण्यासाठी मोठ्या भांडवलानेच सुरुवात करावी हे आवश्यक नाही. इन्व्हेस्टमेंट बँकिंग विश्वात लहान सल्लागार म्हणूनही तुम्ही पाय ठेऊ शकता. लहान उद्योग नि नवीन उद्योग सुरु करणार्यांच्या भांडवलाची समस्या मोठी असते. अशा उद्योग आणि उद्योजकांची गरज भागवण्यासाठी मोठे बँकर्स येत नाहीत, कारण त्यात भांडवल कमी असते आणि म्हणून त्याचे कमिशन सुद्धा कमी असते.
ही उणीव लहान सल्लागार भरून काढू शकतो. त्यामुळे, बँकिंग, कॉमर्स आणि वित्त व गुंतवणुकीचे ज्ञान असणारी व्यक्ती स्वयंरोजगार करू शकते.
शिक्षण:
वर उल्लेख्लेल्याप्रमाणे, खालील व्यावसायिक मनुष्यबळाची इन्व्हेस्टमेंट बंकर्स ना आवश्यकता असते:-
१) सीए - व्हेल्युएशन
२) सीएस
३) एलएलबी
५) एमबीए- फायनान्स
याव्यतिरिक्त कॉमर्स मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी केलेली व्यक्ती सुद्धा, या क्षेत्रात प्रवेश करू शकते. गुंतवणूकदरांशी चांगले संबंध असल्यास अधिक उत्तम.
त्यामुळे या क्षेत्रात फार मोठ्या संधी वाट बघत आहेत. आणि जोपर्यंत उद्योगाला पैशाची आवश्यकता आहे, तोपर्यंत या उद्योगाला मरण नाही!
कायद्यातील संधी
कायद्याचे अभ्यासक कायद्याची परिभाषा सांगताना म्हणतात, कि समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून काही तत्वे आणि नियम समाजाने एकमताने मान्य केले आहेत, ते म्हणजे कायदा. प्राचीन काळापासून जेंव्हा माणूस समाज म्हणून एकत्र कायद्याची निर्मिती केली असावी. जोपर्यंत माणूस समाज म्हणून एकत्र तोपर्यंत कायद्याचे अस्तित्व आहेशहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात, पण रोजगार म्हणून विचार करणार असाल , तर शहाण्या विद्यार्थ्याने कायद्याच्या विद्यालयाची पायरी नक्कीच चढावी!. पुढील सोमवारचा लेख "कायद्यातील रोजगार संधी"त्यामुळे कायद्यातील करिअरला मरण नाही. आज याच अमर करिअरची माहिती घेऊया. कायद्याचे प्रकार:कायद्यातील अभ्यासात अनेक प्रकार पडतात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला त्यातून एखादे क्षेत्र निवडायचे असते. त्यासाठी कायद्याचे प्रकार आपण पाहू:फौजदारी कायदा:माणूस म्हटला कि गुन्हा येतोच. सर्वच माणसे चांगली नसतात. त्यात गुन्हेगारी प्रवूर्त्तीचे लोक असतात. काही गुन्हेगार सराईत असतात, त्यांचे मन किंवा वृत्ती गुन्हेगाराची असते, काही परिस्थितीजन्य गुन्हा करतात काही एखाद्या लालसेने गुन्हा करून जातात. या गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम ज्या कायद्यान्वये होते तो फौजदारी कायदा. भारतीय फौजदारी कायद्यात भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया असे दोन कायदे येतात. याव्यतिरिक्त विशिष्ट गुन्ह्यांसाठी अनेक कायदे आहेत. नागरी कायदा:फौजदारी व्यतिरिक्त अनेक गुन्हे नागरी कायदा म्हणजे (सिव्हिल) या प्रकारात मोडतात, उदाहरणार्थ प्रोपर्टी विषयक गोष्टी. यातही अर्थात खूप पैसा आहे. संविधान कायदासंविधान कायद्यातील तज्ज्ञ म्हणून खूप प्रतिष्टीत करिअर आहे. संविधानातील तरतुदींचे विश्लेषण करण्याची जेंव्हा पाली येते तेंव्हा ह्या तज्ज्ञांची गरज भासते. कामगार कायदाभारतात विविध कामगार कायदे आहेत. सर्व कायदे कडक आहेत. त्यामुळे कारखाने आस्थापनांना या कायद्यांचे पालन करणे अनिर्वार्य आहे. त्यामुळे कामगार कायदेतज्ज्ञांची गरज भासते. व्यवसाय कायदेतज्ज्ञ व्यवसाय व व्यापाराशी संबंधित अनेक कायदे भारत आहेत. उदाहरणार्थ कंपनी कायदा, तसेच दोन कंपन्या एकत्र आणायच्या असतील तर त्या हाय कोर्ट च्या परवानगीने एकत्र आणाव्या लागतात. कंपन्यांमधील भांडणे सोडवण्यासाठी या व्यवसाय कायदा तज्ज्ञांची गरज असते. खूप प्रतिष्ठेचे, पैसा मिळवून देणारे आणि आव्हानात्मक करिअर आहे. बँकिंग कायदे भारतात बँकिंग वेगाने विकसित होत आहे आणि त्याचे कायदे अतिशय क्लिष्ट आहेत. यासाठीच या कायद्यांच्या ताज्न्द्यांची मागणी वाढणार आहे. करिअर पर्यायकायद्यातील अभ्यासानंतर चार पद्धतीचे करिअर पर्याय असतात:१. वकील- जज २. खासगी नोकरी३. प्रशासकीय सेवा ४. शासकीय नोकरी ५. प्राध्यापक वकील:कायदा म्हटला कि डोळ्यासमोर वकील उभे राहतात. भांडणातून उद्भवणारे वाद जेंव्हा न्यायालयापर्यंत पोचतात तेंव्हा त्यांना कायद्याच्या चौकटीत बांधून न्यायाधीशासमोर वादविवाद करण्याची जबाबदारी वकिलांची असते. थोडक्यात जेंव्हा, दोन माणसे हसतात तेंव्हा वकील हसतो. वकिलीमध्ये खूप पैसा आहे, आणि हि सर्व तुमच्या बौद्धिक क्षमतेवर आधारित असते. वकील जेन्वढा यशस्वी तेव्हडे त्याच्याकडील काम अधिक आणि पैसा अधिक! याचे कारण जेंव्हा माणूस कायदेशीर कचाट्यात अडकतो तेंव्हा काही करून त्यातून त्याला बाहेर पडायचे असते, किंवा त्याच्या जिंकण्याने त्याला खूप आर्थिक फायदा मिळणार असतो, तेन्ह्वा अधिक पैसे खर्च करून चांगला वकील करण्याची लोकांची मनोवृत्ती असते. त्यामुळे वकिली क्षेत्रात मोठे व्हायचे असेल तर तुमच्या विशेष प्राविण्याच्या क्षेत्रावर तुमची हुकुमत हवी. यश आपसूक तुमच्या मागे येते. कायद्यातील पदवीनंतर बर कौन्सिल ची परीक्षा उत्तीर्ण होऊन सनद घ्यावी लागते. २. खासगी नोकरीअनेक कंपन्यांना कायदेतज्ज्ञांची गरज भासते. काही ठिकाणी वकिलांनाही नोकरीच्या संधी मिळतात. अनेक वकिलांच्या फर्म्स न सुद्धा हि गरज असते. तसेच व्यवसाय कायद्यातील सल्लागार कंपन्यांना मोठ्या प्रमाणात वकिलांची गरज असते. मात्र या नोकर्यांमध्ये प्रचंड आव्हान आणि काम असते. ३. प्रशासकीय सेवा युपीएससी आणि एम्पिएससी तर्फे न्यायिक सेवांसाठी परीक्षा घेतलि जाते. तिला सिव्हिल जज (ज्युनिअर डिव्हिजन) आणि मेजिस्ट्रेट (प्रथम दर्जा) असे म्हणतात. या परीक्षेसाठी एलएलएम परीक्षा ५५% उत्तीर्ण होणे आवश्यक असते. ४. शासकीय नोकरीविविध शासकीय संस्था, शासकीय बँक आणि मंडळे, पोलिस, बीएमसी यांना लिगल ऑफिसर्स ची गरज असते. कायद्यातील पदवीधरांना स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर किंवा कधी कधी थेट भरतीद्वारे शासकीय नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. ५. प्राध्यापक कायद्यातील पदव्युत्तर पदवीनंतर (५५%) नेट-सेट ची परीक्षा दिल्यानंतर प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात/विद्यापीठात नोकरी मिळू शकते. शिक्षण कायद्यातील पदवी:१२ वि नंतर पाच वर्षांचा किंवा पदवीनंतर तीन वर्षांचा कोर्स असतो. अनेक कायद्याच्या महाविद्यालयात हे दोन्ही कोर्सेस उपलब्ध असतात. संपर्क: शासकीय महाविद्यालय, चर्चगेट न्यू लो कोलेज, माटुंगाएलएलएम:मुंबई विद्यापीठ, कालिना, सांताक्रूझ अतिशय प्रतिष्ठित, गरजेच्या अशा या करिअर मध्ये या, आणि भविष्यात कायद्याच बोला!