top of page

 

तांत्रिक शिक्षण

 

दहावी नंतर करिअरची इतकी क्षेत्रे खुली होतात कि कुठे जाऊ आणि कुठे नको असे होते. खूप कमी विद्यार्थ्यांनी फार अगोदरच ठरवलेले असते कि आपल्याला कुठे जायचे आहे. बाकींची धावपळ सुरु होते. त्यात, मळलेल्या वाटेने जाण्याचा विचार अनेक जण करतात.यात एक फार मोठे क्षेत्र दुर्लक्षित होते आहे ते म्हणजे तांत्रिक. वास्तविक हे एक क्षेत्र असे आहे जे फार लवकर शिक्षण पूर्ण करून रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी विद्यार्थ्याला सिद्ध करते. मात्र माहितीची अनुपलब्धता आणि तांत्रिक संधींबद्दल असलेलेल अज्ञान यामुळे या स्खेत्रात पडणार्यांची संख्या केवळ कमी नाही दिवसेंदिवस रोडावते आहे. तांत्रिक शिक्षण का?पारंपारिक शिक्षणाला तांत्रिक शिक्षणाचा पर्याय अनेक फायदे देऊन जातो. सर्वात पहिले म्हणजे हे क्षेत्र ज्यांना नेहमीच्या वाटेचा अभ्यास न करता काही प्रात्यक्षिक आणि व्यावहारिक शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी फार मोठ्या संधी देते. बर्याच लोकांचा समज असतो कि तांत्रिक शिक्षण म्हणजे फक्त वायरिंग आणि प्लम्बिङ्ग. तांत्रिक शिक्षणात ज्या ज्या क्षेत्रात इंजिनीरिंग पदवी उपलब्ध आहे असे सर्व घटक येतात, म्हणजे ओटोमोबाइल, इलेक्ट्रोनिक्स, टेलीकम्युनिकेशन अशा क्षेत्रात शिरण्याचा हा राजमार्ग आहे. एवढेच नाही पायपिंग , इंस्त्रुमेंतेशन, सोफ्टवेअर, हार्डवेअर आणि नेट्वर्किंग अशा क्षेत्रात शिरण्यासाठी सुद्धा तांत्रिक शिक्षण महत्वाचे आहे. होम अप्लायस इलेक्ट्रोनिक्स हा केवळ एक भाग आहे. कित्येकदा तर बारावी सायन्स करून प्रवेश परीक्षा देऊन आयआयटी किंवा इतर अभियांत्रिकी पदवी ला प्रवेश घेण्याचा काळ मुलांचा दिसून येतो. हा म्हणजे पाठीमागून घास घेण्याचा प्रकार आहे. यापेक्षा डिप्लोमा करून इञ्जिनिअरिङ्ग करणे केंव्हाही उत्तम. डिप्लोमा किंवा आयटीआय करून नोकरीच्या कित्येक संधी उपलब्ध होतातच. एवढेच नाही तर पर्यटन, ब्युटीशिअन, ऑफिस मेंटेननस अशा व्होकेशनल क्षेत्रात सुद्धा शिरण्यासाठी तांत्रिक शिक्षणाचा उपयोग होतो. अर्थात तुम्हाला व्यावहारिक क्षेत्रात काम करायचे असेल तर तांत्रिक शिक्षण तुम्ही निवडू शकता. आपण तीन भागात तांत्रिक शिक्षणाचे विभाजन करू शकतो:-१ अप्रेन्तिन्शीप सर्तीफिकेट किंवा ट्रेड सर्टीफिकेट , २. आयटीआय आणि ३. डिप्लोमा. इञ्जिनिअरिङ्ग पदवी हे व्यावसायिक कोर्स आहे. डिप्लोमा घेतल्यानंतर इञ्जिनिअरिङ्ग ला प्रवेश मिळू शकतो. अप्रेन्तिन्शीप सेर्तीफिकेत घेऊन मुंबई पोर्ट ट्रस्ट, माझगाव डॉक, कारखाने अशा अनेक आस्थापनामध्ये नोकरीच्या संधी उघडतात. आय टी आय, तांत्रिक प्रशिक्षण संस्था यात हे सर्तीफिकेट कोर्सेस उपलब्ध असतात. सहा महिने ते चार वर्ष अशा कालावधीचे कोर्सेस उपलब्ध असतात. संपर्क:रिजनल डीरेक्टरेट ऑफ अप्रेन्तिन्शीप ट्रेनिंगव्ही एन पुरव मार्ग, चुनाभट्टी, सायन पश्चिम.आयटीआयट्रेड सर्टीफिकेटच्या वरची पायरी म्हणजे आयटीआय.आय टी आय मध्ये एक वर्ष दोन वर्ष आणि तीन वर्ष अशा प्रकारचे कोर्सेस उपलबद्ध असतात. आयटीआय महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. इथे विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. डीझेल मेकानिक, वेल्डर, कार्पेंटर, प्लंबर हे इञ्जिनेअरिङ्ग विभागात तर कोम्प्युतर, टेलरिंग, स्टेनो आणि हेअर व स्किन केअर हे इतर विभागात एका वर्षाचे अभ्यासक्रम उपलब्ध होतील.दोन वर्षासाठी, ड्राफ्टमन (सिव्हिल, मेकानिकल, इलेक्ट्रोनिक्स, इन्स्तृमेंतल, इलेक्त्रिशन, फिटर, टर्नर,वायरमन, रबर इ. कोर्सेस उपलब्ध आहेत.तीन वर्षांसाठी टूल व डाय मेकिंग आणि मशीन टूल मेंटेनन्स इ. कोर्सेस उपलब्ध होतात. त्यामुळे मुले आणि मुलींसाठी आयटीआय फार चांगली संधी आहे. मुंबई- ठाणे मधील आयटीआय:१ खार रोड (पश्चिम)२. कल्याण ३. बदलापूर रोड पश्चिम ४. कोकण भवन बेलापूर५. भिवंडी ६. ठाणे७. बोरीवली८. दादर पश्चीम९. डोंगरी तलसरी ठाणे१०. विद्याविहार पश्चिम११. जव्हार ठाणे१२. उल्हासनगर, १३. कल्याण१४. कोरेगाव ठाणे१५. लोअर परेल, मुंबई१६. मोखाडा ठाणे१७. मिठागर रोड,मुलुंड पूर्व १८. एमआयडीसी कुडवली, मुरबाड, ठाणे१९. शहापूर, ठाणे२०. विक्रमगड, ठाणे२१. वाडा, ठाणे. इ. नोकरी/व्यवसायआयटीआय नंतर शाशकीय आस्थापनांमध्ये जसे माझगाव डॉक्स, कोचीन डॉक्स, संरक्षण उत्पादन (डीआरडीओ), इस्रो, रेल्वे, कारखाने, वर्कशोप्स येथे वर्षभर खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतात. मात्र, बर्याचदा आपल्याला त्याची माहितीच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे हजारोंनी जागा आणि नोकरीच्या संधी मराठी मुले घेऊ शकत नसल्याचे दिसून येते. अनेक खासगी कंपन्या, फेक्टरी, कारखाने यांच्यामध्ये सुद्धा आय टीआय साठी अनेक संधी असतात.या व्यतिरिक्त वायरमन, हेअर स्किन टेक्निशन हे स्वयंरोजगार सुद्ध सुरू करू शकतात ज्याला प्रचंड मागणी आहे.डिप्लोमाडिप्लोमा हा अधिक प्रतिष्टीत असा कोर्स आहे. दहावी नंतर डिप्लोमा केला तर अभियांत्रिकी पदवीस प्रवेश मिळणे सोपे जाते. प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही आणि एक वर्षही कमी होते. डिप्लोमा नंतर नोकरीच्या संधी सुद्धा उपलब्ध होतात.त्यामुळे दहावी नंतर चांगले मार्ग मिळालेल्या आणि तांत्रिक विषयात अभ्यास करू इच्छीनार्यांनी बेधडक डिप्लोमाला प्रवेश घ्यावा. कमी गुण असतील किंवा लगेच नोकरीहवी असेल तर आयटीआय करता येईल. इञ्जिनिअरिङ्ग चेच लक्ष्य असेल तर उगाच बारावी सायन्स करण्यापेक्षा डिप्लोमाला प्रवेश घ्यावा. देशातील पायाभूत सुविधा आणि विद्युत ला असलेली मागणी पाहता तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्यांना भवितव्य उज्ज्वल आहे. काळजी नसावी! हर्षद माने। प्रबोधक prabodhakhm@gmail.com

 

Coming Soon

Coming Soon

 

 

 

bottom of page