top of page

 

वराह, ससे, बदक पालन

 

प्राणी हा शेतकऱ्याचा मित्र. त्यातून दुध आणि मांस देणारे प्राणी अतिरिक्त उत्पन्नही देतात. ह्या प्राण्यांची पैदास शेतीस पूरक अशा नैसर्गिक वातावरणात होत असल्याने फारसा वेगळा खर्च करावा लागत नाही. मात्र हि प्राणी पैदास अधिक व्यावसायिक तत्वावर करायची असेल तर मात्र लेखात नमूद केल्याप्रमाणे विशिष्ट घरटे, औषधे असा विशेष खर्च करणे आवश्यक असते. शेळी आणि कोंबडी ह्या दोन लोकप्रिय प्राण्यांविषयी आपण माहिती घेतली. आज आपण डुक्कर अर्थात वराह पालन, ससा आणि बदक ह्यांच्याविषयी माहिती घेऊ. वराह पालनडुक्कर चिखल आणि तत्सम वातावरणात राहतो हे शहरी तरुणांना माहित आहे. डुक्कर खरेच काही अखाद्य, उत्‍पाद, मांस, क्षतिग्रस्त खाद्य आणि कचरा यासारख्या गोष्टींचे खाद्य करतात. डुक्कराची वाढ वेगाने होते आणि खुओ अधिक असते. डुकराची मादी एका वेळी १० ते १२ पिले देते. डुकराचे वजन अधिक असल्याने डुक्करापासून मिळणारे मांस सुद्धा अधिक असते. त्यामुळेच कमी भांडवलात कमी जागेत होणारा हा व्यवसाय आहे. याशिवाय, डुकराची विष्ठा शेतात खत म्हणून उपयोगी होत असल्याने, शेतकर्यास सेंद्रिय खात मिळते ते वेगळेच, ज्यामुळे मातीचा कस राखला जातो.वराह पालन कमी जागा असलेल्या शेतकर्यासही करता येते. त्यामुळे लहान शेतकरी हा व्यवसाय करू शकतात. जातीस्वदेशी डुक्करांचा जास्त काळापर्यंत उत्पादनासाठी उपयोग केला जातो.यामध्ये घुंगरू, राणी या जाती आहेत. हे आकाराने लहान असतात. आता प्रगत जाती सुध्दा वापरण्यात येत आहेत. यामध्ये पांढरा योर्कशायर हि जात विशेष प्रसिद्ध आहे. डुकराची माता जास्त दुग्ध उत्‍पादन करणारी आणि ८ किंवा जास्त पिले असलेली असावी. दुग्ध वजन (५६ दिवशी) प्रती लिटर देणार्‍या मादीचे वजन १२० किलो असावे आणि युवा मादीचे वजन १५० किलो पेक्षा कमी नसावे, असा दंडक आहे. खाद्य मका, चारा, जव, बाजरी, गहूं आणि तांदूळ हे चांगल्या प्रतीचे असावेत. तेलाची खळ आणि मासे आणि मटन यातून प्रोटीन मिळते तर हिरव्या शेंगभाज्यांचा समावेश अतिरिक्त विटामिन देण्यात मदत करते. खोलीयोग्य वाढीसाठी योग्य आवासाची गरज असते ज्याने त्यांचे रोगराई, परजीवी नियंत्रण यापासून रक्षण होते. जमीन खडबडीत असावी आणि पाणीरहित साधारण नेहमीची असावी. नाली व्यवस्थि‍त असावी जेणे करुन पाणी बाहेर वाहू शकेल. चिखलडुक्कर चिखलात का लोळते हा प्रश्न आपल्या सर्वांना पडत असेल. याचे कारण डुकरांना घाम येणार्‍या ग्रंथी कमी असतात त्यामुळे उन्हाळ्यात आणि प्रजनन काळात डुकरांना विहार करण्यासाठी चिखलाची गरज भासते. त्यालहान शतकरी शेली पालन उत्तम प्रकारे करू शकतातमुळे वरः पैदासित कृत्रिमरित्या तयार केलेला चिखलाचा वापर केला जातो. ससे पालनआकाराप्रमाणेच सशांना अन्न आणि अल्प गुंतवणूक आणि जमिनीचा आकार कमी लागतो. दुसरे म्हणजे सशांना विशेष आहाराची गरज नसते व त्यांना मिळालेल्या साध्या आहारामुळेही त्यांच्या मटणातील प्रथिनांचे प्रमाण भरपूर वाढते. सहज उपलब्ध असलेला पाला, टाकून दिलेला भाजीपाला, घरात उपलब्ध असलेले धान्य इत्‍यादिंचा वापर करता येतो.त्यामुळे अल्प शेतकरी ससे पालन उत्तम प्रकारे करू शकतात. सशांचे मांस प्रथिन युक्त असते. इतर मांसाशी तुलना करता सशाच्या मटणात जास्त प्रथिने (21%) व कमी चरबी (फॅटस्‍) (8%) असते.ब्रॉयलर सशांचा वाढीचा वेग खूप जास्त आहे. साशांमध्ये वजनाप्रमाणे अधिक वजनाच्या, मध्यम आणि कमी वजनाच्या असे तीन प्रकार पडतात. ससा हा नाजूक प्रवृत्तीचा असल्याने रोग प्रतिबंधक काळजी घायवी लागत. तसेच त्यांना ठेवण्याची जागा जास्त गर्दीची नसावी. बदक पालन साधारणतः ज्या ठिकाणी कोंबद्यांचे उत्पादन कमी असते, तेथे बदक पालन केले जाते. त्यामुळे कोंबडीप्रिय महाराष्ट्रात बदक पालन तुलनेने फार कमी आहे. मात्र काही ठिकाणी बदकाच्या अंड्यांना आणि मांसाला विशेष मागणी आहे. एकंदरीत शेती संलग्न उद्योगांमध्ये प्राणी पालन ह्या उद्योगाला विशेष स्थान आहे. भारतात विविध समाजात मांसाहारी समाजाचे प्रमाण फार जास्त आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा विविध प्राण्यांची मागणी असते. त्यामुळे पूर्णवेळ एखादा किंवा अनेक प्राणी एकात्मिक पद्धतीने पालन करणे हा तरुणांसाठी उत्तम नवीनउद्योग बनू शकतो. या "रुचकर" उद्योगाकडे लक्ष देणे आवश्यक आहे!

 

मत्स्य शेती

 

माणूस त्याच्या उत्क्रांतीपासून स्वतःचे जीवन सुलभ करण्यासाठी धडपडत आलेला आहे. ेती हे तर सुरुवातीपासून त्याच्या जगण्याचे मध्यम आहे. शेतीची सुरुवात, निसर्गातून मिळणाऱ्या कंदमुळे आणि फळांवर जगण्यापेक्षा , आपण स्वतःच आन्धन्य निर्माण का करू नये, या विचारातून झाली असावी . माणूस समुद्री आणि गोड्या पाण्यातील माशांवर उपजीविका करू लागला , आणि बर्याच ठिकाणी ते त्याचे आवडते खाद्य बनले , यानंतर आपणच माशांची पैदास का करू नये हा विचार तयार झाला, आणि त्यातूनच सुरुवात झाली एका अत्यंत सुदर व्यवसायाची, मत्स्यशेतिचि . मत्स्यशेती म्हणजे कृत्रिमरीत्या नैसर्गिक वातावरणात केली गेलीली माशांची पैदास. मत्य्सशेतिचि संकल्पना माशांचे पुनरुत्जिवन कसे होते याचा अभ्यास करून त्यासदृश स्थिती निर्माण करून देण्यावर झाली आहे. उत्तम मत्स्यशेतिच हा कणा आहे. मत्स्यशेती करू पाहणार्याने अगोदर उत्तम माशांची पैदास कशी करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व्ययवसाय का ?मासे हा अनेकांच्या जेवणातील आवडीचा पदार्थ, नव्हे काही जणांच्या जेवणातील जीव कि प्राण. माशांची चव घेऊन खाणारे, त्यासाठी विविध जागा उलथून पालथून टाकणारे खवय्ये कमी नाहित. समुद्रात माशांची पैदास प्रचंड प्रमाणात होते मात्र खाण्याजोग्या माशांची संख्या कमी होत असल्याचे कोळी लोक आजकाल बोलत आहेत . जगभरातील मासेमारीमुळे आणि समुद्राच्या वाढत्या प्रदूषणामुळे माशांच्या संख्येत घट होत आहे. ्या तुलनेत खवय्ये वाढत आहेत . त्यामुळे जिभेचे चोचले पुरवताना व्यवसायाची एक नामी संधी चालून आली आहे .मत्स्यशेती सध्याची स्थिती मत्स्यशेतिचे दोन प्रकार पडतात १. गोड्या पाण्यातील २. निम खार्या पाण्यातील गोड्या पाण्यातील मत्स्यशेती गोड्या पाण्यातील मासे हे किनारपट्टी व्यतिरिक्त इतर भागात चवीने खाल्ले जातात . विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर भारतात त्यांना प्रचंड मागणी आहे. याव्यतिरिक्त गोव्यातील परदेशी पाहुण्यांनाही ते आकर्षित करू शकतात. कोकणातील माणसाला कदाचित प्रेम कमी असेल मात्र चवीत बदल म्हणूनही हा खाण्यासाठी पर्याय आहे. ्यामुळे ोड्या पाण्यातील माशांना भारतातच उत्तम मार्केट आहे . निर्यातीसाठी हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे हे ओघाने आलेच . भारतात तीन प्रकारचे मासे प्रामुख्याने घेतले जातात १. कोलंबी २. रोहू ३. कोटला याव्यतिरिक्त चौथा प्रकार लोकप्रिय होत आहे आणि ज्यात बर्याच संधी आहेत तो म्हणजे पेण रोहा भागात मिळणारा 'जीताडा हा मासा. यापैकी सर्वांच्या वाढीसाठी लागणारी यंत्रणा आणि कालावधी जवळजवळ सारखा०च आहे तसेच सर्व मासे एकत्र एकाच तळ्यात घेत येण्यासारखे; आहेत (पण हा सल्ला नाही ). आपण कोलंबी उत्पादनाची साधारण माहिती घेऊ: ोड्या पाण्यातील कोलंबीला जम्बो प्रोन्झ म्हणतात कारण हि आकाराने मोठी असते. तिचे शास्त्रीय नाव आहे 'माक्रोब्रेकिअम रोझेन्बेर्गि ". म्हणूनच हॉटेल मध्ये हिला अधिक मागणी आहे. एक कोलंबी ६०० ग्राम पर्यंत वजनदार होऊ शकते. १. हि कोलंबी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही आहे. २. काटक आहे आणि रोगाला सहजी बळी पडत नाही . ३. तलाव धरणे यात वाढवता येते. ४. अतिरिक्त पाणी, शेती आणि इतर कारणाने क्षारपड आणि नापीक झालेल्या जमिनीत तळे खोदून हे उत्पादन काढता येते. उत्पादनाची पद्धतीकोलंबीच्या उत्पादनाचा कालावधी साधारणत: ८ महिने असतो. यात थोडी अनियमितता हि असते . काही कोलंब्या लवकर मोठ्या होतात . मादी पेक्षा नर अधिक मोठा होतो. त्यामुळे सहा महिन्यानंतर सतत चाचपणी करणे गरजेचे असते. सर्वात मह्वाचे आहे ते म्हणजे उत्तम प्रतीचे बीज. ोलंबीचे बीज चांगले असेल तरच उत्पादन निरोगी आणि सुदृढ असेल. बीज विशिअस्थ वातावरणात आणि विशिष्ट ठिकाणी तयार केले जाते त्याला हेच्रिज म्हणतात. रत्नागिरी येथील सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्रात हि बीजे विकत मिळतात. तलाव आणि पाणी तलाव साधारणतः वीस गुंठे पासून पुढे कितीही जागेत करता येतो. यापेक्षा येईल मात्र मग उत्पादनाचा खर्च खूप जास्त होतो.तलावाला एका जागी उतार असावा. पाणी बदलण्यास आणि उत्पादन बाहेर काढण्यास मदत होते. तलावाच्या तळाशी चिकण मातीचा लेप लावावा. तसेच मृदेच्या सामू प्रमाणे चुन्याचा वापर केला जातो. मातीचा सामू ७ ते ७.५ असावा लागतो. पाणी हा अतिशय महत्वाचा घटक. त्यातील क्षाराचे प्रमाण मातीतील सामुचे प्रमाण हे पाहून शास्त्रीय परीक्षेनंतरच जागेची निवड करावी. तलावाची रचना माती सामू पाणी क्षार अशा तांत्रिक गोष्टींसाठी कृषी विद्यापीठातील आणि रत्नागिरी येथील सागरी जीव संशोधन केंद्रातील तज्ञ मदत करतात. खते आणि मत्स्य अन्न मत्स्यशेतितिल एक अतिशय चांगला घटक हा कि सेंद्रिय पदार्थ ज्यातून कल्शिअम , नत्र अधिक प्रमाणात मिळते त्याचा माशांना अन्न म्हणून उपयोग होतो. त्यामुळे पौष्टिक खतांची पिशवी पाण्यात ठेवली, पाण शेवाळ यांचा अन्न म्हणून वापर होतो. कोंबड्यांची विष्ट सुद्धा खत म्हणून वापरली जाते. शास्त्रशुद्ध उत्पादनासाठी उत्तम प्रकारचे अन्न वापरले जाते .भाताचा कोंडा , शेंगदाण्याची पेंड आणि सुकट साधारणतः अन्न म्हणून वापरले जातात. हे अन्न तयार मिळते. ते कणी च्या स्वरूपात असते. साधारण उत्पन्न आणि नफा तलावाचे क्षेत्र १ हेक्टर तलाव २संवर्धन कालावधी १०-१२ महिने बीज साठवणूक ५०,००० नग बीज जिवंत राहण्याचे प्रमाण ६०%सरासरी वजन ६० ग्राम अंदाजे उत्पन्न १८०० किलो विक्री दर रु २५०/- प्रती किलो उत्पन्न रु ४,५०,०००/- भांडवली खर्च तलाव बांधकाम रु २,००,०००/- मोटर शेड इतर रु १,००,०००/-एकूण रु ३,००,०००/- आवर्ती बीज ५०,००० ०* रु ०.८० प्रती नग रु ४०,०००खाद्य ३६०० किलो *रु ३० रु १,०८,०००पगार रु ५०,०००इतर रु ५०,००० एकूण रु २,४८,००० कर्जावरील व्याज रु ४५,००० साधारण नफा रु १,०७,००० केंद्र आणि राज्य शासनाच्या तळे बांधकाम आणि नविनिकर्नासाठी अनेक कर्ज स्वरूपातील योजना उपलब्ध आहेत . ्यात साधारण २०-२५ % अनुदानाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त केंद्र, मत्स्यखद्य उभारणी केंद्र यासाठीसुद्धा अनुदानाच्या योजना अहेत. कुठल्याही सरकारी बँकेत या योजनांची माहिती मिळू शकते. खार्या पाण्यातील मत्स्यशेती खार्या पाण्यात टायगर प्रोन्झ या समुद्री कोलंबीचे उत्पादन घेतले जाते. या उत्पादनात पाण्याच्या गुणधर्मात क्षाराचे प्रमाण अधिक असावे लागते. याव्यतिरिक्त काही ठराविक बाबी वगळता साधारण प्रक्रिया वर उल्लेखलेल्या प्रमाणेच आहे. फायदा असा कि या कोलंबीला उत्पादन कालावधी ५ महिने आहे त्यामुळे वर्षात दोन उत्पादने शक्य होतात. एक हेक्टर जागेत साधारण १,००,००० बीजे मावतात. त्यामुळे मिळणारा उत्पादन गोड्या पाण्यापेक्षा दुप्पट असते.मात्र गोड्या पाण्यातील कोलंबीच्या मानाने याचे वजन कमी असते . समुद्री उत्पाद विकास निर्यात प्राधिकरण (MPEDA) कडून यासाठी अनेक प्रकारचे अनुदान मिळते. मत्स्यशेती प्रशिक्षण : सागरी जीव संशोधन केंद्र , रत्नागिरी ०२३५२२३२९९५ अधिक माहितीसाठी संपर्क ; प्रबोधक हर्षद माने : ९९६७७०६१५०

 

औषधी वनस्पती लागवड 

 

 

औषधी वनस्पती आणि पिके हि महत्वाची पिकसंपत्ती आहे. औषधी गुणधर्म आणि आर्थिक उत्पन्न असे दोन्ही फायदे देणारी हि शेती आहे. 

 

शेती मालिकेमध्ये आपण फळबागा आणि भाजीपाला लागवड पहिली. या अनुषंगाने औषधी वनस्पतींची लागवड हा एक चांगला पर्याय तरुणांसमोर उपलब्ध आहे. औषधी वनस्पती लावण्यामध्ये अनेक फायदे आहेत. एक म्हणजे भातशेती आणि तत्सम पिकांना लागणारी प्रक्रिया आणि तेव्हढा  वेळ देण्याची आवश्यकता नाही. तसेच यासाठी विशिष्ट हंगामाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. आणि त्यातूनही औषधी वनस्पतींमध्ये खूप विविधता आहे. त्यामुळे तुमची आवड, वाट पाहण्याची क्षमता आणि तुमची गुंतवणुकीची आवश्यकता यानुसार तुम्हाला पिक घेत येईल आणि बदलता सुद्धा येईल. 

 

आजचा तरुण शेतीकडे वळत नाही हि शोकांतिका आहेच. शेतकऱ्यांची मुलेदेखील शेतीत राम नाही म्हणून शेतीपासून दूर जात आहेत. कित्येक शेतजमिनी पडून आहेत. अशा वेळेस, औषधी वनस्पतींची लागवड करण्याचा चांगला पर्याय तरुणा समोर आहे. 

 

शेतकरी आणि आयुर्वेद ही संकल्पना पुराणकाळातील ग्रंथात आढळते. मात्र औषधी वनस्पतींची लागवड देशात मोठय़ा प्रमाणावर होताना दिसत नाही. या लागवडीमधून शाश्वत उत्पन्न आहे. 

औषधी वनस्पतींची बाजारपेठे पाचशे ते हजार कोटी रुपयांची आहे आणि भविष्यात ती वाढणारच आहे. ती गरज भागवण्याची संधी भारताकडे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनीही या उद्योगाकडे लक्ष वळवायला हवे.  जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार औषधी वनस्पतीची मागणी प्रति वर्षी १४ अब्ज डॉलर आहे.  चीनमधून दरवर्षी २० हजार कोटी रुपयांच्या औषधी वनस्पतींची निर्यात होते. यातुलनेत आपल्या देशाची निर्यात केवळ ४५० कोटी आहे.

 

औषधी वनस्पतींचे प्रकार

 

चरकसंहिता, सुश्रुत संहिता, निघंटू इ. प्राचीन ग्रंथांमध्ये औषधी वनस्पतींचे गुणधर्म आणि त्यांच्या वापराबाबत माहिती दिलेली आहे. आपला देश वैविध्यपूर्ण हवामान व वनौषधी संपदेने समृद्ध आहे. आपल्या देशाची गणना जैवविविधतेने संपन्न अशा जगातील १२ निवडक देशांमध्ये केली जाते. गेल्या काही वर्षांत काही निवडक वनौषधींची मागणी वाढल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर तोड झाली आहे. काही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये सफेद मुसळी, गुग्गुळ, सर्पगंध यांसारख्या वनौषधी महत्त्वाच्या आहेत.

 

देशात सुमारे 2500 पेक्षा जास्त औषधी व सुगंधी वनस्पतींच्या प्रजाती वेगवेगळ्या हवामानात व विभागात नैसर्गिकरीत्या आढळतात. महाराष्ट्र राज्यातील जैव विविधता, हवामानातील विविधतेमुळे पश्‍चिम घाट, कोकण, सातपुडा पर्वतरांग प्रदेशात विविध प्रकारच्या औषधी वनस्पती नैसर्गिकरीत्या दिसून येतात. औषधी वनस्पती क्षेत्राच्या विकासासाठी या वनस्पतींच्या प्रजातीचा प्राधान्यक्रम ठरविला आहे. यादृष्टीने एकूण 80 औषधी वनस्पती प्रजातींची ओळख पटवून राज्यस्तरावर त्यांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. यामध्ये आवळा, अशोक, अश्‍वगंधा, बेल, गुडमार, गुग्गुळ, इसबगोल, कलिहारी, काळमेघ, कोकम, मुलेठी, सफेद मुसळी, पथ्थरचूर (कोलियस), पिंपळी, सर्पगंधा, सेन्ना, शतावरी, तुळस, वावडिंग या वनस्पतींचा समावेश आहे.

 

 

औषधी वनस्पतीच्या वाढीसाठी शासकीय योजना 

 

औषधी वनस्पती क्षेत्र विकासास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्रपुरस्कृत वनस्पतीचे संरक्षण विकास व शाश्‍वत व्यवस्थापन योजना आणि राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियान अशा दोन योजना महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळातर्फे राज्यात राबविण्यात येत आहेत.

 

राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियान -

 

 

औषधी वनस्पतींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन, वनस्पतीची लागवड, कापणी, संस्करण, साठवण, आवेष्टन इत्यादींच्या तंत्रामध्ये मूल्यवर्धित आणि औषधी वनस्पतींची बाजारपेठ विकसित करणे, ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत. या योजनेअंतर्गत विविध शासकीय विभाग व अशासकीय संस्था, सहकारी संस्था आणि अन्य हितसंबंधितदेखील पात्र आहेत. या योजनेमुळे औषधी वनस्पती लागवडीस प्रोत्साहन, पाठिंबा व आर्थिक साह्य देऊन औषधी वनस्पतींची लागवड शेती पद्धतीमध्ये आणून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. या योजनेमध्ये औषधी वनस्पतीची लागवड ही समूह पद्धतीने करावयाची असून, सर्व घटक योजनांचा लाभ देताना अस्तित्वात असलेले समूह व नवीन समूह विकसित करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.

 

औषधी वनस्पती लागवड
  • औषधी वनस्पतीची लागवड या घटक योजनेअंतर्गत समूह पद्धतीने औषधी वनस्पतींची लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीकरिता प्रजातीनिहाय प्रकल्प खर्चाच्या २० टक्के, ५० टक्के व ७५ टक्के एवढे वित्तीय साह्य देय आहे.

  • औषधी वनस्पती पिकांची लागवड प्राधान्याने समूह पद्धतीने करण्यात यावी याकडे शासनाचा ओढा आहे. समूहासाठी औषधी वनस्पती पिकांचे किमान दोन हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.

  •  

  • वैयक्तिक शेतकरी सदर घटक योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास त्याचे लागवडीसाठीचे प्रस्तावित क्षेत्र कमीत कमी ०.२० हेक्टतर असणे आवश्यक आहे.



औषधी वनस्पतींची रोपवाटिका -
औषधी वनस्पतींच्या नवीन लागवडीसाठी दर्जेदार लागवड साहित्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक व खासगी क्षेत्रात चार हेक्‍टर क्षेत्रावर (मोठी) व एक हेक्‍टर क्षेत्रावर (लहान) आदर्श रोपवाटिकांची स्थापना करणे व अशा रोपवाटिकांना अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यासाठी लागवड साहित्य तयार करणे, ही घटक योजना अभियानाअंतर्गत कार्यान्वित आहे.

 

 

औषधी वनस्पती रोपवाटिका स्थापन करण्याकरिता शासन निर्धारित करेल त्याच औषधी वनस्पती प्रजातीची रोपवाटिका स्थापन करावी लागेल. लाभार्थींच्या नावे जमीन असणे आवश्‍यक आहे. रोपवाटिका उत्पादनासाठी अनुदानाशिवाय आवश्‍यक इतर खर्च करण्यास रोपवाटिकाधारकाची तयारी असावी.

 

 

मोठ्या रोपवाटिकेसाठी प्रति वर्ष किमान 2 ते 3 लाख रोपे उत्पादन आणि छोट्या रोपवाटिकांना 60 ते 70 हजार रोपे निर्मिती करणे बंधनकारक असेल. सदरची रोपे प्रामुख्याने प्रमुख औषधी वनस्पती प्रजातींची व आवश्‍यकतेनुसार इतर औषधी वनस्पतींची रोपे तयार करणे आवश्‍यक आहे.

 

लागवडपश्‍चात व्यवस्थापन 


वाळवणी गृह 
औषधी वनस्पती काढणी केलेल्या कच्चा माल वाळविणे, उत्पादित मालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी मालाची स्वच्छता व प्रतवारी करणे हि कामे वाळवणी  गृहात केली जाते.  स्वयंसहायता गट/ सहकारी संस्था/ सार्वजनिक संस्था यांच्यासाठी या योजनेअंतर्गत 100 टक्के व कमाल पाच लाख रुपये अर्थसाह्य उपलब्ध होणार आहे. तसेच खासगी क्षेत्रासाठी सदरची योजना बॅंक कर्जाशी निगडित असून, वैयक्तिक लाभार्थीकरिता 50 टक्के व कमाल 2.50 लाख रुपये अर्थसाह्य देण्यात येते.

साठवण गृह 
साठवण गृह हे वाळवणी गृह व प्रक्रिया केंद्र यामध्ये दुवा साधण्याचे काम करणार आहे.
स्वयंसहायता गट/ सहकारी संस्था यांच्यासाठी 100 टक्के व कमाल पाच लाख रुपये अर्थसाह्य मिळते.

 

 

 

 

 

 

लागवडपश्चात व्यवस्थापन

वाळवणी गृह

  • वाळवणी गृह घटकअंतर्गत औषधी वनस्पती काढणी केलेल्या कच्चा माल वाळविणे, याशिवाय उत्पादित मालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी मालाची स्वच्छता व प्रतवारी करणे शक्यळ होणार आहे.

  • स्वयंसहायता गट/ सहकारी संस्था/ सार्वजनिक संस्था यांच्यासाठी या योजनेअंतर्गत १०० टक्के व कमाल पाच लाख रुपये अर्थसाह्य उपलब्ध होणार आहे. तसेच खासगी क्षेत्रासाठी सदरची योजना बॅंक कर्जाशी निगडित असून, वैयक्तिक लाभार्थीकरिता ५० टक्के व कमाल २.५० लाख रुपये अर्थसाह्य देण्यात येईल.

साठवण गृह

  • राज्यातील औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने साठवण गृह घटक योजना अत्यंत महत्त्वाची आहे. औषधी वनस्पतींच्या समूह क्षेत्रांमध्ये वाळवणी गृहांची, तसेच साठवण गृहांची योजना राबविली जाते. सदर साठवण गृह हे वाळवणी गृह व प्रक्रिया केंद्र यामध्ये दुवा साधण्याचे काम करणार आहे.

  • या योजनेअंतर्गत स्वयंसहायता गट/ सहकारी संस्था यांच्यासाठी १०० टक्के व कमाल पाच लाख रुपये अर्थसाह्य मिळते. 

 

एकंदरीत तुमच्या लक्षात आले असेल कि औषधी वनस्पतींची लागवड नैतिक, व्यापॉरि आणि आर्थिक दृष्टीने आवश्यक आणि लाभदायक आहे. तुमच्या जमिनीचे रुपांतर मुल्यवर्धित जमिनीत करण्यासाठी औषधी वनस्पती लागवड हा एक रामबाण उपाय आहे!

bottom of page