top of page

 

आंतरराष्ट्रीय व्यापार 

 

 

 

आंतरराष्ट्रीय व्यापार "विश्वविजयी बनवू भारत" या मालिकेमध्ये आपण आज सुरुवात करूया अशा क्षेत्रापासून ज्या क्षेत्रामध्ये भारतीयांना आर्थिक विकास करण्याची अनन्वित संधी आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारताला स्वतःचे स्थान निर्माण करायचे असल्यास आणि ते वाढवायचे असल्यास, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशा तिन्ही क्षेत्रामध्ये भारताला अग्रेसर असणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध, एखाद्या देशाची प्रतिमा जगभरामध्ये निर्माण करण्यासाठी अतिशय महत्वाचे असतात. एखादा देश आर्थिक दृष्ट्या जेव्हडा बलशाली असेल, राजकीय आणि संस्थात्मक पातळीवर त्याचे स्थान तेवढेच मोठे होते. अमेरिकेकडे पाहून याची सत्यता पटते. एखादा देश आर्थिकदृष्ट्या जेवढा बलशाली असतो, इतर देशांवर त्याचा तेवढाच प्रभाव असतो, आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये त्याची आर्थिक मदत जास्त असते आणि त्यामुळे अर्थातच त्याच्या शब्दाला अधिक वजन प्राप्त होते. आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांमध्ये विकास करण्यासाठी आवश्यक असतात आंतरराष्ट्रीय व्यापार. एखाद्या देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार जेवढा विकसित असेल, तेवढेच त्याच्याकडे जास्त साधने उपलब्ध होतात. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदेडेव्हिड रिकार्डो या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञाने "तुलनात्मक फायद्याची" थेअरी मांडली. हि थेअरी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अध्दार आहे. तो म्हणतो, कि एखादा देश सर्वच उत्पादन करू शकत नाही. अशा वेळेस, प्रत्येक देशाने त्याच वस्तूचे उत्पादन करावे, किंवा अधिक उत्पादन करावे, जे तो अधिक सक्षमरित्या, कमीत कमी खर्चामध्ये बनवू शकतो. त्यामुळे जगभरात आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्था विकसित झाली आहे. त्यामुळे प्रत्येक देश आपल्या इथे उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून एखादी व अधिक वस्तू आणि सेवांचे उत्पादन करतो आणि त्या बाहेच्या देशांना विकतो. त्यातून मिळणाऱ्या पैशातून तो अशा वस्तू आयात करतो ज्याचे उत्पादन त्याला करता येणे शक्य नाही किंवा ज्याचा उत्पादन खर्च आयातीपेक्षा अधिक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा दुसरा फायदा म्हणजे आंतरराष्ट्रीय गंगाजळी. आयात करण्यासाठी या गंगाजळीचा उपयोग होतो. जसे, १९९३ साली भारताचा आंतरराष्ट्रीय चलनाचा साठा अगदी तळाशी आला होता, म्हणून आपण अधिक निर्यातीवर लक्षदिले. हे पहिले देशाविषयी. आता वैयक्तिक व्यापार्यांना होणारा फायदा पाहू. जेंव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यापारात उतरता, तेंव्हा तुम्हाला देशी विक्रीपेक्षा विक्री किंमत आणि नफा अधिक मिळत असतो. आणि म्हणूनच तुम्ही निर्यात करता. दुसरे म्हणजे, तुम्ही देशाला परकीय गंगाजळी मिळवून देता, म्हणून देश सुद्धा तुमच्याकडे आदराने पाहतो, शासन अशा निर्यातदारांना अनेक सुविधा आणि सवलती देत असते. सर्वात महत्वाचे म्हणजे निर्यातीमध्ये तुमची आर्थिक पात अधिक मजबूत होते, कारण जर तुमचे बाजारातील स्थान मजबूत असेल तर आयातदाराबरोबर तुम्ही तुमच्यासाठी फायदेशीर अशा पेय्मेंट टर्म्स ठरवू शकता. निर्यातीसाठी तुम्ही कच्चा माल वापरात असाल तर तुम्हाला त्यावरील कर सुद्धा माफ होतो. थोडक्यात तुम्ही जर निर्यातदार असाल तर तुम्हाला तोट्यापेक्षा फायद्याच्या संधी अधिक असतात. फक्त आवश्यकता असते उत्तम संपर्काची आणि तुमच्या मालाच्या उत्तम गुणवत्तेची. निर्यातक्षेत्रामध्ये संधी१) निर्यातदार तुम्ही वस्तू वा सेवेची निर्यात करू शकता. यामध्ये दोन प्रकार आहेत. अ) उत्पादक निर्यातदार - जर तुम्ही स्वतःच निर्यातदार असाल तर तुम्हाला निर्यात करता येईल. ब) विक्रेता निर्यातदार- तुम्ही दुसर्याची वस्तू वा सेवा सुद्धा विकू शकता. आंतरर्ष्टीर्य बाजारात दोघांचीही पत अधिक आहे. फक्त तुमच्या उत्पादनावर तुम्हाला अधिक नफा मिळत असतो. विक्रेता निर्यातदार असेल तर नफा कमी असतो मात्र उत्पादनाचा खर्चही येत नाही. जर तुम्ही केवळ विक्रेता असाल, किंवा अजूनपर्यंत उद्योगात आले नसाल आणि येण्याचा विचार असेल तर विक्रेता निर्यातदार म्हणून तुम्हाला संधी आहे. यासाठी तुमचा एखादा विशिष्ट प्रदेश निवडा उदा आशिया, आफ्रिका इ. त्या प्रदेशात काय सर्वाधिक विकले जाते ते पहा. उदा आफ्रिकेत भारताचा तांदूळ, कपडे आणि मसाले प्रसिद्ध आहेत. इथे एखादा उत्पादक , आणि तिकडचा एखादा आयातदार शोधा, आणि तुमचा व्यवसाय सुरु करा. २) सल्लागार १) एक्स्पोर्ट सल्लागार- हि वयक्ति एक्स्पोर्ट साठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी मदत करीत असते. यामध्ये आयातदार शोधण्यापासून ते त्याच्याशी संपर्क साधणे, दोन्हीकडील कायदेशीर बाबींची पूर्तता करणे, फायनान्स आणि प्रत्यक्ष लोडिंग पर्यंत सर्व बाबी सल्लागार पाहतो. सल्लागार होण्यासाठी अंतर्रास्थ्रीय व्यापार किंवा एक्पोर्टवरील एखादा कोर्स करा, एक दोन वर्षे अनुभव घ्या आणि स्वतःची सल्लागार कंपनी सुरु करा. २) सीएचए एजंट हा थोडासा निष्णात सल्लगार असतो यासाठी तुम्हाला सीएचए एजंट म्हणून नोंदणीकृत होणे आवश्यक असते. कुठलाही निर्यात या शिवाय होऊ शकत नाही. हा एजंट डीजीएफटी म्हणजे आंतरराष्ट्रीय निबंधकाकडे नोंदणीकृत असतो. सीएचए एजंट होण्यासाठी कोर्स गरवारे, कलिना, सांताक्रूझ३) आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार यापेक्षा अधिक मोठा सल्लागार म्हणजे उद्योग सल्लागार. इथे तुम्ही स्वतः कागदपात्रांची पूर्तता करणे वगैरे बाबी करीत नाहीत. तुम्ही एखाद्या कंपनीला तिने आपला एक्स्पोर्ट कसा वाढवावा, उत्पादनात काय बदल करावे, पेकेजिंग कसे असावे आणि महत्वाचे म्हणजे उद्योग स्त्रेतार्जी कशी असावी, या बाबींचे मार्गदर्शन करतो. यासाठी तुम्ही एखाद्या व्यवस्थापन शाळेतील किंवा सर्वात उत्तम म्हणजे शासनाच्या इंडिअन इंस्तीत्युत ऑफ फोरेन ट्रेड अर्थात आयआयएफटी मधून आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयावर कोर्स करू शकता. काही कोर्सेसपद्व्युत्तर कोर्सेस १) आयआयएफटी, दिल्ली आणि कोलकाता येथे केम्पास आहेत २) वेलिंगकर, माटुंगा ३) सिम्बोइसिस, पुणे डिप्लोमा कोर्सेस १) वेलिंगकर, माटुंगा २) मुंबई विद्यापीठ, कालिना त्यामुळे फोरेन ट्रेड तुम्हाला व्यापारासाठी खूप मोठ्या संधी निर्माण करून देते. तुम्ही तुमचा व्यवसाय अक्षरशः आकाशाला भिडवू शकता. याम्ह्द्ये वाडीच्या काहीही मर्यादा नाहीत. दुसरे म्हणजे शिक्षण सद्धा अट नाही. तुम्हाला नोकरी करायची असेल तय या विषयात पदव्युत्तर पदविका संपादन करा. व्यवसाय करायचा असेल तर, डिप्लोमा कोर्स करून या व्यवसायात उतरा. देशविदेशात नाव कमवा आणि विश्वविजयी व्हा!

 

 

 

आंतरराष्ट्रीय सल्लागार

 

 

विश्वविजयी व्हा  मालिकेत आपण मागील भागात आंतरराष्ट्रीय व्यापाराची माहिती घेतली. स्वतःचा एक्स्पोर्ट इम्पोर्ट व्यवसाय  शकता तसेच एखाद्या  आंतरराष्ट्रीय व्यापार डीपार्टमेंट मध्ये उच्चपदावर जाऊ शकता. आज आपण अजून एक आंतराष्ट्रीय स्तरावरील स्वयंरोजगाराचे क्षेत्र पाहणार आहोत . " आंतरराष्ट्रीय सल्लागार!

 

सल्लागार हे प्रतिष्ठेचे आणि  नामांकित क्षेत्र आहे. सल्लागार हा उद्योगाचा महत्वाचा भाग असतो. तुमचे सल्लाक्षेत्र जितके क्लिष्ट तितकीच तुमच्या सल्ल्याची आर्थिक किंमत अधिक असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सल्लागारांचे मानधनसुद्धा अधिक असतेच. त्यामुळे सल्लागार होणे हा अतिशय प्रतिष्ठेचा आणि आर्थिक सुबत्तेचा मार्ग आहे. 

 

आता आपण पाहूया अशा काही संधी जिथे आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही सल्लागार म्हणून कार्यरत होऊ शकता. 

 

बिग ४ 

कॉमर्स क्षेत्रात असणार्या व्यक्तींना बिग ४ हे नामाभिधान नवीन नाही. व्यवस्थापन, कर, ऑडिट अशा विविध क्षेत्रात सल्लागार असणार्या ४ आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपन्यांना बिग ४ असे म्हंटले जाते. अर्न्स्ट एंड यंग, प्राइसवॉटरहाउसकुपर,  केपीएमजी आणि  डेलोइट, अशा  कंपन्या आहेत. त्यांची जगभरात विविध देशांमध्ये केंद्रे आहेत. 

 

या कंपन्यांना लागणारे मनुष्यबळ सुद्धा तेवढेच उच्चशिक्षित हवे. त्यामुळे अशा कंपन्यामध्ये  म्हणजे तुमचा सीव्ही तगडा असणे गरजेचे आहे. 

 

आता या कंपन्यांना काय मनुष्यबळ लागते ते  आपण पाहू-  

१)कर सल्लागार 

तुम्ही कर- डायरेक्ट आणि इंडायरेक्ट या विषयात प्रशिक्षित असलात तर कर सल्लागार म्हणून तुमची नेमणूक होऊ शकते. यासठी तुम्ही सिए किंवा एमकॉम असणे आवश्यक आहे. सिए सुद्धा शक्यतो पहिल्याच प्रयत्नात आणि एमकॉम पहिल्या दर्जाने उत्तीर्ण असणे उत्तम. तुम्हाला या विषयातील चांगला अनुभव असेल, विशेषतः आंतरराष्ट्रीय कंपन्यातील अनुभव असेल तर तुम्हाला चांगली संधी आहे. 

 

२) ट्रान्स्फर प्रायजिंग 

जेंव्हा बाहेरून एखादी सेवा भारतामध्ये येते, त्यावेळी कर आकारणीमध्ये हा  उभा राहतो. त्यामुळे हे अतिशय प्रतिष्ठेचे क्षेत्र आहे.तुम्ही या विषयात  मिळवले असेल तर तुम्हाला  आहे. यासाठी सीए किंवा सीएस असणे आणि या विषयात अनुभव असणे उत्तम आहे. 

 

३) ऑडीट 

सीए असणे आवश्यक आहे, विशेषतः पहिल्याच प्रयत्नात  परीक्षा उत्तीर्ण असल्यास अधिक उत्तम. 

 

४) रिस्क 

 उद्योग म्हटले  धोका आलाच. या धोक्याचे परिमाण मोजून कार्य करणे अधिक उत्तम. त्यामुळेच धोका व्यवस्थापन या क्षेत्राला खूप प्रतिष्ठा आहे. 

 

या क्षेत्रात येण्यासाठी रिस्क मेनेजमेंट या विषयातील पदव्युत्तर कोर्स किंवा सर्टीफाईड रिस्क मेनेजर हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कोर्स करावा. 

 

५) अर्थशास्त्र 

अर्थशास्त्र हे एक  प्रतिष्ठेचे क्षेत्र आहे. तुम्ही लंडन  इकोनोमिक्स किंवा  ऑक्सफर्ड वगैरे मधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली असेल तर या क्षेत्रात तुमचे पायघड्या अंथरून स्वागत केले जाते. भारतात दिल्ली स्कूल ऑफ इकोनोमिक्स, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, गोरेगाव-मुंबईमधील इंदिरा गांधी इंस्तीतुत ऑफ देव्ह्लपमेंट  आणि पुण्यातील गोखले अधिक प्रतिष्ठेचे मानले जातात.

 

६) स्ट्रेटेजी 

व्यवस्थापन हे एक  व्यापक क्षेत्र आहे. या विषयात पदव्युत्तर पदविका किंवा एमबीए करावे.आयआयएम मधून करता आले तर अतिशय उत्तम. त्यासाठी तुम्हाला "कॉमन एन्ट्रनस एक्झामिनेशन"  हि परीक्षा द्यावी लागते. महारष्ट्र मध्ये जमनालाल बजाज संस्था नामांकित आहे. सप्लाय चेन किंवा ऑपरेशन या विषयात एमबीए केल्यास ऑपरेशन या विषयात संधी मिळू शकते. 

 

७) बिग डेटा व्यवस्थापन 

तुम्ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील असाल, तर बिग डेटा किंवा बिझनेस एनालिटीक्स हे एक क्षेत्र  खुले झाले आहे. या क्षेत्रात येनाय्साठी इंडिअन स्टेटिस्टीकल इंस्तीत्युत मधून किंवा तत्सम चांगल्या संस्थेतून बिग डेटा व्यवस्थापनाचा कोर्स करावा.   

 

८) कम्प्लायंस

भारतामध्ये विविध व्यापारी कायदे आहेत. या कायद्यानुसार विविध बाबी, विविध फॉर्मस, नोंदणी इ कंपन्यांना  कराव्या लागतात. या सर्व गोष्टींची जबाबदारी कम्प्लायांस सल्लागार उचलतो. 

 कंपनी सेक्रेटरी हा कोर्स करून तुम्ही या क्षेत्रात प्रवेश करता. हे क्षेत्र फार मोठे आहे. त्यामुळे विविध विषयात तुम्ही प्राविण्य शकता, उदा. परकीय चलन, बौद्धिक संपदा, कंपनी कायदा, सेबी, भांडवली बाजाराचे कायदे इ. 

 

भारतातील कंपनी सेक्रेटरी कोर्स केल्यावर तुम्ही  दोन वर्षे अनुभव घेऊन, लंडन मधील चार्टर्ड सेक्रेटरी हि पदवी घेऊ शकता. यासाठी तुम्हाला भारतात राहून केवळ एक पेपर देऊन हा कोर्स पूर्ण करता येतो. हा कोर्स केल्यावर तुम्हाला ८० देशात कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करण्याची परवानगी मिळते. 

 

तर असे आहे बिग ४ चे विश्व! तुम्ही जितके अधिक उच्चशिक्षित आणि तेही चांगल्या गुणांनी असाल तितके हे क्षेत्र तुम्हाला आनंदाने बोलावते.         

 

 नंतर तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. आणि विश्वविजयाकडे तुमचे पाउल पुढे जाते. पुढील लेखात आपण माहिती घेऊ याच क्षेत्रातील इतर संधींची!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

भारतात कोर्स करून परदेशी नोकरीच्या संधी

 

१) माहिती तंत्रज्ञान 

 

माहिती तंत्रज्ञान हे एक असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये परदेशगमनाची संधी मिळण्याची शक्यता फार अधिक असते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपण सॉफ्टवेअर क्षेत्राचा विचार करणार आहोत. यामध्ये दोन प्रकारच्या कंपन्या असतात. गरजेप्रमाणे सॉफ्टवेअर बनवून देणाऱ्या इन्फोसिस, टीसीएस सारख्या कंपन्या, आणि माहिती तंत्रज्ञान, सायबर अशा क्षेत्रात सल्लागार असणार्या एक्सेन्चर सारख्या कंपन्या. अशा कंपन्यांमध्ये तुम्हाला नोकरी मिळाली, तर तुम्हाला पुढे परदेशवारीचे योग पत्रिकेत संभवतात. 

यासाठी, तुम्ही इञ्जिनिअरिङ्ग करीत असाल तर बीई (आयटी) करून तुम्हाला पुढे एमटेक किंवा एमइ अथवा एमबीए करता येईल. अन्यथा बीएससी आयटी केले असेल तर एमसीए कोर्स करावा लागेल. त्यानंतर तुम्ही  एमबीए करू शकता. 

 

तुम्हाला एक्झीक्युटीव्ह एमबीए चा पर्याय सुद्धा खुला राहतो, ज्यामध्ये तीन चार वर्षांच्या अनुभवानंतर तुम्ही एमबीए करू शकता. सध्या एमबीए मध्ये तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते. एक्झीक्युटीव्ह एमबीए मध्ये तुम्ही थेट प्रवेश घेऊ शकता. अर्थात त्याची फी जास्त असते.  

 

त्याचबरोबर तुम्हाला परदेशी भाषा येणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानातील लोकांमध्ये जर्मन भाषा शिकण्याचे प्रमाण अधिक आहे. 

 

२) अर्थशास्त्र 

अर्थशास्त्र हे त्यानंतरचे असे क्षेत्र आहे, ज्यायोगे तुम्ही बाहेर जाऊ शकता. मात्र यासाठी तुम्हाला अर्थशास्त्र विषयातील पीएचडी किंवा किमान एमए, उत्तम संस्थेतून आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

 

भारतामध्ये, दिल्ली स्कूल ऑफ इकोनोमिक्स, चेन्नई स्कूल ऑफ इकोनोमिक्स, पुण्याचे गोखले इंस्तित्युत, तसेच गोरेगाव चे इंदिरा गांधी डेव्हलपमेन्ट इंस्तीतुत ह्या संस्था प्रतिष्ठीत मानल्या गेल्या आहेत. 

 

अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी नंतर भारतात संशोधन आणि अध्यापन विषयात काम सुरु करावे. अध्यापनासाठी तुम्हाला सेट किंवा नेट उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

 

त्यानंतर तुम्हाला परदेशात विद्यापीठात शिकवण्याची किंवा मोठ्या संस्थांमध्ये जसे वर्ल्ड बँक, आयएमएफ इ. इथे संशोधनाची संधी मिळते. तुमचे रिसर्च पेपर्स पब्लिश झाले असतील तर अधिक उत्तम!

 

३) कायदा

भारत हा बौद्धिक संपदेने संपन्न तरुणांचा देश आहे. त्यामुळे, भारतातील कायदा तज्ज्ञांना जगभरात मान आहे. 

 

कायद्यामध्ये तुम्ही भारतातून एलएलबी करून, विशेषतः चांगल्या विद्यापीठातून (उदा मुंबई, नेशनल लो स्कूल, बंगलोर इ.) नंतर एलएल एम आणि पीएचडी साठी प्रवेश घ्यावा. उत्तम लो फर्म्स मध्ये विदेशी कायदे, भारतीय व्यापारी कायदे, आंतरराष्ट्रीय व्यापारी कायदे, आंतरराष्ट्रीय कायदा, युरोपिअन युनिअन कायदे अशा क्षेत्रातील अनुभव मिळाल्यास उत्तम. इंग्लंड विद्यापीठाने दूरस्थ पद्धतीने एलएलएम कोर्स सुरु केला आहे. हा कोर्स सुद्धा उत्तम आहे. त्याची फी अर्थात लाखांच्या घरात आहे. 

 

तुम्हाला परदेशी लो फर्म्स मध्ये, भारतातील लो फर्म्स ज्या बाहेरही कार्यरत आहेत, त्यामध्ये, तसेच बाहेरील कंपन्यांमध्ये काम करता येईल. बाहेर वकिली करायची असल्यास मात्र तिथे राहून शिक्षण घ्यावे लागेल, ते आपण नंतरच्या लेखात पाहणार आहोत. 

 

विशेषतः सायबर कायदा, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार आणि बौद्धिक संपदा यामध्ये खूप जास्त मागणी आहे. 

 

४) तत्वज्ञान 

भारतीय तत्वज्ञानाची थोरवी जगाने मान्य केली आहे. त्यामुळे भारतीयांना या क्षेत्रात खूप जास्त मागणी आहेच. 

भारतीय विद्यापीठातून तुम्ही तत्वज्ञान विषयात एमए आणि पीएचडी केले असेल, आणि त्यातूनही तुम्हाला बाहेरील धर्म, तत्वज्ञान यात आवड आणि अभ्यास असेल, तर परदेशी जाउन शिकवण्याचे क्षेत्र तुम्हाला खुले होते. 

यासाठी तुम्हाला भारतातच उत्तम कोर्सेस करणे आवश्यक आहे. मुंबई विद्यापीठ असे चांगले कोर्सेस तुम्हाला देते. पुणे आणि भारतातील इतर विद्यापीठातही हे कोर्सेस उपलब्ध आहेत. 

 

५) संस्कृत 

संस्कृत भाषेविषयी परदेशात फार उत्सुकता आहे. तुम्ही संस्कृत मध्ये पीएचडी केली असल्यास तुम्हाला बाहेर शिकवण्यासाठी बोलावणे येऊ शकते.  

 

यासाठी तुम्हाला भारतातून उत्तम संस्थेतून पीएचडी केले पाहिजे. मुंबई विद्यापीठ, भारतीय विद्याभवन (मरीन लाईन्स), कविकालिदास विद्यापीठ, नागपूर, राष्ट्रीय संस्कृत संस्थान, दिल्ली येथे चौकशी करावी. 

 

६) व्यवस्थापन 

भारतातील व्यवस्थापन तज्ज्ञांना बाहेर उत्तम मागणी आहे. विविध व्यवस्थापन क्षेत्रातील सल्लागार कंपन्या, तसेच कंपन्या यामध्ये ह्या संधी उपलब्ध होतात. 

मात्र यासाठी सर्वोत्तम संस्थेतून एमबीए आणि जमल्यास पीएचडी केले पाहिजे. आयआयएम, आयआयटी, आयएसबी, जेबीआयएमएस (मुंबई) या काही सर्वोत्तम संस्था आहेत. 

 

७) तांत्रिक 

तुम्ही इञ्जिनिअरिङ्ग करीत असल्यास तुम्हाला तांत्रिक क्षेत्रात संधी उपलब्ध होते. यासाठी तुम्ही एमटेक किंवा एमइ करणे आवश्यक आहे. नवीन क्षेत्रांमध्ये नेनोटेक्नोलॉजि, बायोमेडिकल, बायोतेक्नोलोजी, रोबोटिक्स हि क्षेत्रे आहेत, ज्यात अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात. उत्तम संस्थेतून जसे आयआयटी, शिक्षण घेतले पाहिजे.

 

चार्टर्ड फायनान्शिअल एडवायजर सीएफए हि एक नामांकित डिग्री आहे. भारतातील आयसीएफएआय आणि अमेरिकेतील सीएफए इंस्तीत्युत हा कोर्स देते. पैकी परदेशात जाण्यासाठी अमेरिकेचा कोर्स करणे आवश्यक आहे. कारण त्याला जागतिक मान्यता आहे. या कोर्सबद्दल अप[अन मागील एका अंकात सविस्तर माहिती घेतली आहे. तुमच्या सोयीसाठी आपण पुन्हा एकदा घेऊ. आंतरराष्ट्रीय सीएफए कोर्स सीएफ़ए हा तीन पायर्यांचा (लेव्हल्स) कोर्स आहे. या तिन्ही परीक्षा एकामागून एक अशा घेतल्या जातात. एका वेळेस एका परीक्षेसाठी अर्ज भरता येतो. लेवल १ ची परीक्षा जुन मध्ये होते तर लेवल २ आणि लेवल ३ या परीक्षा जुने मध्ये होतात. यामुळे हा कोर्स तीन वर्षात पूर्ण करता येऊ शकतो. (अर्थात कोर्स ची काठीण्यापातळी जात आहे.) या कोर्स मध्ये तुम्हाला आर्थिक विश्लेषणासाठी आवश्यक अशा सर्व घटकांचे ज्ञान जाते. सद्यस्थिती १४५ देशांमध्ये या कोर्स चे सव्वा लाख सदस्य विखुरलेले आहेत. अभ्यासक्रम:लेवल १हि परीक्षा एकूण २४० वस्तुनिष्ठ प्रश्नांची (तीन पर्याय) असून १२० प्रश्न सकाळच्या सत्रात तर १२० प्रश्न दुपारच्या सत्रात विचारले जातात. प्रत्येक सत्र ३ तासांचे असते. लेवल २१२० प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला ३ गुण (पोईंट) असतात. हि परीक्षाही सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात विभागली असून यातील प्रश्न केस पद्धतीचे असतात आणि प्रत्येक केस वर ६ प्रश्न येतात. अशा २० केसेस विचारल्या जातात. यामध्ये अभ्यासण्यात येणारे विषय:१. एथिक्स आणि प्रोफेशनल२. संख्याशास्र३. अर्थशास्त्र ४. फायनान्शिअल रिपोर्टिंग ५. कोर्पोरेट फायनान्स६. इक्विटी गुंतवणूक ७. फिक्स्ड इन्कम गुंतवणूक ८. डेरीव्हेटीव्ज९. इतर गुंतवणूक १०. पोर्टफ़ोलिओ व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन लेवल ३या परीक्षेतील प्रश्न दीर्घ उत्तराचे असतात. अभ्यासक्रम:१. एथिक्स आणि प्रोफेशनल स्टेन्डर्ड२. बिहेविअरल फायनान्स आणि व्यक्ती ग संस्थात्मक गुंतवणूकदार३. केपिटल मार्केट ४. असेट एलोकेशन५. इक्विटी व फिक्स्ड इन्कम गुंतवणूक ६. इतर गुंतवणूक, डेरीव्हेटीव्ह आणि धोका व्यवस्थापन ७. पोर्टफ़ोलिओ आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक कोण परिक्षा देऊ शकते?किमान पदवी किंवा चार वर्षांचा अनुभव (गुंतवणूक क्षेत्रात नसला तरी चालेल). भारतातील परीक्षा केंद्रे: भारतात बंगलोर, कोलकाता , मुंबई, नवी दिल्ली, पुणे आणि अहमदाबाद येथे चार सेन्टर्स आहेत. येथे अधिक केंद्रे सुरु होणार आहेत. फीया कोर्स साठी ४५० अमेरिकन डॉलर्स हि प्रवेश फी आहे आणि याव्यतिरिक्त प्रत्येक लेवल ला परीक्षा फी अमेरिकन डॉलर्स मध्ये द्यावी लागते. कोर्स साठी प्रवेश ऑनलाईन घायचा असून फी सुद्धा ऑनलाईन भरायची असते. अधिक माहितीसाठी:: www.cfainstitute.orgचार्टर्ड सेक्रेटरी भारतातील कंपनी सेक्रेटरी कोर्स केलेल्या आणि दोन वर्षांचा अनुभव असलेल्या कंपनी सेक्रेटरी साठी लंडनचा चार्टर्ड सेक्रेटरी हा कोर्स करू शकतो. यासाठी त्याला केवळ तीन पेपर्स देण्याची आवश्यकता असते. - कॉर्पोरेट गव्हर्नन्स- कॉर्पोरेट सेक्रेटरिअल प्रेक्टीस - चार्टर्ड सेक्रेटरी केस स्टडीज भारतातील कंपनी सेक्रेटरी मेंबरला आयसीएसआय कडे एप्लिकेशन फॉर्म रु १५०० च्या डिमांड ड्राफ्ट लागतो. नंतर लंडनमधून त्यांची फी भरण्यासाठी तुम्हाला सांगितले जाते. हि फी साधारणतः रु ९०,०००/- आहे. या व्यतिरिक्त पहिल्या दोन पेपर्स साठी प्रत्येकी १५,०००/- आणि ते पास झाल्यावर तिसरा पेपर रु २२,०००/- फी भरून देता येतो.या कोर्सचे स्टडी मटेरीअल ओन्लाइन उपलब्ध होते. कोर्सची नोंदणी वर्षातून दोन वेळा म्हणजे एप्रिल आणि ऑक्टोबर मध्ये करता येते. उधील लेखात आपण अजून अशा काही कोर्सेस ची माहिती घेऊ.

bottom of page