top of page

 

जागतिक बँकेतील  करिअर

 

जागतिक बँकेत काम करायला मिळावे हि अर्थशास्त्र विषयातील अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. आज पाहूया जागतिक बँकेतील  करिअर कसे सुरु करावे. 

 

जागतिक बँकेतील नोकरी हि अनेक देशातील लोकांची इच्छा असते. या नोकरीमध्ये जगातील अर्थव्यवस्था आणि राजकीय व्यवस्थांमध्ये काम करता येते, जगातील अनेक देशांच्या विविध विकासाच्या कामात काम करण्याची संधी मिळते, आणि त्यातही विकसनशील आणि अविकसित देशांसाठी काम करण्याची संधी मिळते. 

 

जागतिक बँक     

दुसर्या महायुद्धानंतर युरोपीय देश  आणि अमेरिका  यांच्यात बृटेनवूड्स येथे एक मोठी परिषद झाली. या परिषदेत एकत्रित प्रयत्नातून विकास करण्याच्या प्रयत्नांचा पुनरुच्चार करण्यात आला. या परिषदेत तीन जागतिक संस्थांची स्थापना करण्यात आली, युनो, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जगातील विकासाच्या कामांना वित्त्पुराव्था करण्याचे काम देण्यात आले, तर जागतिक बँकला विकसनशील अनिअविकसित देशातील राहणीमान सुधारण्याच्या आणि दरिद्र निर्मूलनाच्या कामाची जबाबदारी देण्यात आली. 

 

जागतिक बँकेतील नोकरीच्या संधी 

युनो प्रमाणेच जागतिक बँकेमध्ये सुद्धा विविध पातळ्यांवर नोकरीच्या संधी उपलब्ध होतात . 

 

 यंग प्रोफेशनल्स प्रोग्राम 

तरुणांना जागतिक बँकेच्या  खेचण्यासाठी यंग प्रोफेशनल्स प्रोग्राम जागतिक बँक चालवते. मागील मागील ५० वर्षांपासून अशा पद्धतीने जागतिक तरुण नेतृत्व जागतिक बँक तयार करत आहे. या कार्यक्रमाचा  हेतू तरुण रक्ताला जगातील असमतोलाची जाणीव  करून देणे,आणि  असमतोल कमी करण्याचे आव्हान देणे हा आहे. 

 

अर्थशास्त्र, व्यवस्थापन, वित्त, संवाद अशा विविध क्षेत्रात जागतिक बँक तरुणांची भरती करते.  

 

सध्या १७०० हून अधिक तरुण जागतिक बँकेत कार्यरत आहेत. 

 

पात्रता: 

अ) सदस्य राष्ट्राचा नागरिक 

ब) ३२ वर्षे वयोमर्यादा 

क) पीएचडी किंवा पदव्युत्तर पदवी 

ड) इंग्रजी भाषेत प्रभुत्त्व 

इ) ३ वर्षांचा अनुभव 

 

जागतिक बँकेच्या वापरातील भाषा- अरेबिक, चायनीज, फ्रेंच,  पोर्तुगीज किंवा स्पेनिश या भाषेत प्रभुत्व असल्यास प्राधान्य प्राधान्य. 

 

या पदांसाठी दरवर्षी हजारो अर्ज बँकेकडे येत असतात. यावर्षीचे अर्ज जून जुलै मध्ये घेतले गेले. निवड झालेल्यांचे काम सप्टेंबर २०१६ मध्ये सुरु होईल. 

 

संपर्क: http://web.worldbank.org/

 

एनालिस्ट प्रोग्राम  

 

व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या तरुणांस्ठी जागतिक बँकेच्या विविध  सन्स्थन्मध्यॆ काम करण्याचा अनुभव या कार्यक्रमात मिळतो. अतिशय बुद्धिमान आणि सांस्कृतिक वैविध्यपूर्ण वातावरणात काम करण्याची संधी मिळते. 

 

पात्रता:पदव्युत्तर पदवी 

 

इन्टर्न्शिप 

पदवी कलेल्या आणि पदव्युत्तर पदवीस किंवा पीएचडिस प्रवेश घेतलेल्या तरुणांना इंटरन म्हणून काम करता येते. 

 

वर्षातून दोन वेळा अ) उन्हाळी (जून ते सप्टेंबर)आणि ब) हिवाळी (जानेवारी ते मार्च)मध्ये जागतिक बँक अर्ज स्वीकारते . 

 

डोनर फंडिंग स्टाफ  

 

डोनर फंडिंग स्टफिंग प्रोग्राम मध्ये विविध डोनर देशांसाठी जागतिक बँक आपले अधिकारी देते. या अधिकार्यांचा पगार सदर देश देतो. 

 

या अंतर्गत दोन प्रकारचे अधिकारी नियुक्त होतात,. 

अ) ज्युनिअर प्रोफेशनल ऑफिसर 

पात्रता: १) पदव्युत्तर पदवी

           २) २ वर्षांचा अनुभव   

           ३) ३२ वर्षे वयोमर्यादा 

ब) मिड करिअर प्रोफेशनल 

 

पात्रता: १) पदव्युत्तर पदवी

           २) २ वर्षांचा अनुभव

 

जागतिक बँकेतील करिअर म्हणजे आंतर्राष्टीर्य पातळीवर एक प्रतिष्ठित काम करण्याची संधी. आपल्या महाराष्ट्रातून अधिकाधिक तरुण जागतिक पातळीवर कार्यरत व्हावेत यासाठी हा अट्टाहास !!!!

युनो मधील करिअर

 

आंतरराष्ट्रीय करिअर मध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांमधील करिअर हा एक पप्रतिष्ठित मार्ग आहे. आज जाणून घेऊया युनायटेड नेशन्स या संस्थांमध्ये असणार्या करिअर संधींविषयी!जागतिक पातळीवर अनेक देश मिळून विविध करार करीत असतात. यातील काही करारान्वये संघटनांची स्थापना केली गेली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, सलोखा, विधी, वित्त अशा विषयांसाठी या संघटना कार्यरत आहेत. यापैकी एक अतिशय मोठी संघटना म्हणजे युनायटेड नेशन्स. या संघटनेच्या विविध ६ विविध शाखा आहेत. या शाखा, कायदा,कामगार अशा विषयांमध्येही युएन कार्यरत आहे. युनायटेड नेशन्स, सारख्या संस्थेमध्ये कार्याची संधी मिळणे हे एक फार मोठे मोठे भाग्य आहे. विशेषतः महाराष्ट्र्तील्न तरुणांनी हि स्वप्ने पाहायला हवीत. युनायटेड नेशन्स युनायटेड नेशन्स संघटनेची स्तपणा १९४५ साली दुसर्या महायुद्धानंतर झाली य़ापुढे देशांतर्गत तंटे सोडवण्यासाठी युद्धाचा वापर केला जाऊ नये, विशेषतः महायुद्धासारखी इतकी भयंकर युद्धे काहीच होऊ नयेत यासाठी युएन ची स्थापना झाली. अर्थात त्यामध्ये युएन पूर्णतः यशस्वी झाली असे नाही. याचबरोबर आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. अर्थशास्त्र आणि सामाजिक विषयांसाठी एक शाखा कार्यरत आहे. युनायटेड नेशन्स चा कारभार सचिवालयातुन चालतो जे जिनिव्हा शहरात आहे. सध्या १९३ देश युएनचे सदस्य आहेत. युद्ध रोखण्यासाठी आणि जागतिक सलोख्यासाठी युएन सिक्युरिटी जनरल हि शाखा कार्यरत आहे. हि युएन ची शक्तिशाली शाखा आहे. या शाखेचे ५ स्थायी आणि १० अस्थायी असे १५ सदस्य असतात. भारत हा अस्थायी सदस्य आहे आणि स्थायी सदस्य होण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. दर सप्टेंबर मध्ये मुख्यालयात न्यू योर्क यथे सदस्य एकत्र येतात. युनायटेड नेशन्स मधील करिअर युएनला विविध कार्यासाठी विविध मनुष्यबळाची आवश्यकता असते. तसेच तरुणांना आकर्षित करण्यासाठी इंटरनशिप सुद्धा युएन देते. युएन मध्ये काम करताना आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर विविध देशांमध्ये काम करण्याची संधी मिळते. गरिबी निर्मुलन पासून ते मानवी हक्कांपर्यंत विविध प्रश्नांवर काम करता येते. शिवाय युनोचे कर्मचारी विविध देशांमधून येतात. त्यामुळे तुमचा दृष्टीकोन व्यापक बनतो. ज्याला सामाजिक कार्याची आवड आहे त्याला प्रचंड मानसिक समाधान देण्याची क्षमता युएन करिअर संधी मध्ये आहे. सध्या युएन मध्ये ४१००० कर्मचारी आहेत.त्यापैकी ३१% फक्त मुख्यालयात काम करतात. इतर ७०% विविध देशांमध्ये कार्यरत आहेत. सध्या एकूण कर्मचार्यांमध्ये ३३% महिला आणि ६६% पुरुष आहेत. अर्थात त्यामुळे महिला कर्मचारी युनो मध्ये याव्यात यासाठी जास्त उत्सुक आहे. कार्याची विविधता तुम्ही खालील विभागांमध्ये कार्यरत असू शकता १) राजकारण शांतता आणि संरक्षण २) व्यवस्थापन ३) अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र ४) माहिती तंत्रज्ञान आणि संवाद ५) कायदा ६) सार्वजनिक माहिती ७) सार्वजनिक आरोग्य पगार युनो मधील पगार फार चांगला असतोच. आंतरराष्ट्रीय असल्याने डॉलर्स मध्ये मिळतो. मात्र सर्वात उत्तम हे कि हा पगार आयकरातून पूर्णतः सूट आहे. या शिवाय विविध देशांमध्ये जाण्याची संधी, विमा सुरक्षा, इतर सामाजिक आणि आर्थिक लाभ आणि प्रतिष्ठा मुबलक प्रमाणात आहेत. निवृत्तीवेतन मिळते ते वेगळेच. मनुष्यबळाचे प्रकार अ) स्टाफ युनोला काम करण्यासाठी पूर्णवेळ स्तफ्फ ची आवश्यकता असते. यातही अनेक प्रकार आहेत. १) व्यावसायिक आणि उच्च पदे (पी आणि डी)-पदव्युत्तर पदवी/ प्रथम श्रेणीतील पदवी आणि २ ते १५ वर्षांचा अनुभव. २) सामान्य सेवा आणि संबंधित (जी, टीसी, एस, पिया आणि एलटी) ३) राष्ट्रीय व्यावसायिक अधिकारी (एनओ)राष्ट्रीय पातळीवर विविध अधिकार्यांची नेमणूक स्थानिक पातळीवर केली जाते. १ ते ७ वर्षांचा अनुभव आवश्यक असतो. ४) फिल्ड ऑफिसर्स- ६ ते १२ वर्षांचा अनुभव आवश्यक असतो आणि ५) उच्चपदस्थ नेमणुका आ) सामान्य सेवा क्लेरिकल आणि प्रशासनिक, सचिवालय स्वरूपातील हि कामे असतात. नियुक्तांसाठी युनो ग्लोबल जनरल सर्विस टेस्ट हि परीक्षा घेते. भाषा, गणितीय आणि प्रासंगिक समयोसुचकता या विषयावर हि परीक्षा अवलंबून असते. याशिवाय इतर विविध विषयांसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. एडीटोरीअल आणि डेस्कटॉप पब्लिशिंग अकौन्टींग असिस्टंट कोम्पिटीटिव्ह परीक्षा सांख्यिकी असिस्टंट कोम्पिटीटिव्ह परीक्षासिक्युरिटी ऑफिसर्स ट्रेड आणि क्राफ्ट याचबरोबर विविध भाषा शिकवण्यासाठी भाषा प्रशिक्षकांची आवश्यकता असते. यासाठी विशेष परीक्षा घेतली जाते. यंग प्रोफेशनल प्रोग्राम यंग प्रोफेशनल प्रोग्राम हा सदस्य राष्ट्रांमधील शिक्षित तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि आंतर्राष्टीर्य कामकाजात खेचण्यासाठी बनवला आहे. दर वर्षी यासाठी परीक्षा घेतली जाते. असोसिएट एक्स्पर्ट प्रोग्राम युनो आणि २२ सदस्य राष्ट्रांमध्ये झालेल्या करारान्वये युनो विविध विषयातील एक्स्पर्ट यासादास्या राष्ट्रांना पुरवते. यासाठी अशा व्यावसायिकांना युनो नोकरी बहाल करते. सल्लागार याच बरोबर अनुभवी सल्लागारांची आवश्यकता असते. तुम्हाला व्यावसायिक सल्लागार म्हणून युनो साठी काम करण्याची इच्छा असल्यास युनो वेळोवेळी टेंडर्स काढीत असते. तुम्हाला युनो सोबत काम कराय्चेब असल्यास काम करायचे असल्यास, वोलेन्तिअर आणि इंटर्नशिप असे दोन पर्याय उपलब्ध असतात. अधिक माहिती युनोच्या वेबसाईटवर त्यांच्या गरजा सातत्याने येत असतात. त्यासाठी careers.un.org हि वेबसाईट सातत्याने पहावी. तेंव्हा जगाच्या कल्याणार्थ काम करण्याची इच्छा असल्यास, युनो चे विस्तीर्ण क्षेत्र तुमची वाट पाहत आहे. युनो च्या जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे " जगाचे कल्याण सांभाळत तुमचे करिअर घडवा!"

 

bottom of page