



फूड टेक्नोलॉजी
अन्न हि माणसाची मुलभूत गरज आहे, लोकसंख्येच्या वाढीनुसार हि गरज दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. मात्र, गेल्या दोन दशकापासून अन्नप्रक्रिया हे एक फार मोठे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे या क्षेत्राचा आवाका दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.
त्यामुळेच अन्न तंत्रज्ञान या नावाने एक शिक्षणशाखाच अस्तित्वात आली असून, त्यामुळे या क्षेत्रात अद्ययावत प्रशिक्षण घेऊन नोकरी आणि व्यवसायाच्या प्रचंड संधी उपलब्ध होऊ शकतात.
अन्न प्रक्रिया या क्षेत्राची व्याप्तीच फार मोठी आहे. अगदी हळद तांदूळ यांच्यावरील प्रक्रियेपासून, दुधावरील प्रक्रिया,क्रीम, पनीर, दैनंदिन वापरातील कुरकुरे आणि शीतपेये, ज्यूस आणि अशा असंख्य प्रक्रिया यामध्ये समाविष्ट होतात.
फूड टेक्निशियन म्हणून कार्य करताना प्रक्रिया, टेस्टर, कोल्ड स्टोरेज, पेकेजिंग टेक्नोलॉजी, इंस्युलेशन आणि रेफ्रिजरेशन, ट्रान्स्पोर्ट असे अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत.
प्रशिक्षण
बीटेक (फूड टेक्नोलॉजी)
इन्स्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई
ictmumbai.edu.in ०२२-३३६१११११
डिवायपाटील विद्यापीठ- बायोटेक्नोलोजी आणि बायोइन्फोर्मेटिक्स
नवी मुंबई ०२२-३९४८६०४९/५३/५१, ०२२-२७५६१९००
नेशनल इन्स्टीट्युट ऑफ फूड टेक्नोलॉजी इंटरेप्र्युन्युर एंड मेनेजमेंट
१३०-२२८१२१०२/११०१
कॉलेज ऑफ एग्रिकल्चर टेक्नोलॉजी,परभणी
डीपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, अमरावती विद्यापीठ
सेन्ट्रल फूड टेक्नोलॉजिकल रिसर्च इन्स्टीट्युट, नागपूर
डीपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, उत्तर महाराष्ट्र, जळगाव, विद्यापीठ
डीपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, औरंगाबाद
डीपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
लक्ष्मीनारायण इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर
litnagpur.org ०७१२-२५६११०७
एमस्सी (फूड टेक्नोलॉजी)
सेन्ट्रल फूड टेक्नोलॉजिकल रिसर्च इन्स्टीट्युट
अर्हता: कृषी/अभियांत्रिकी/विज्ञान शाखेतील पदवी बीएस्सी(ओनर्स)
चाळणी परीक्षा : जून
अल्पकालीन कोर्सेस
या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे शोर्ट टर्म कोर्सेस उपलब्ध आहेत.
मिटकॉन, शिवाजीनगर, पुणे
नेशनल इन्स्टीट्युट ऑफ फूड टेक्नोलॉजी इंटरेप्र्युन्युर एंड मेनेजमेंट
१३०-२२८१२१०२/११०१
फिशरीज
महाराष्ट्राला ७०० किमी चा विस्तीर्ण किनारा लाभला आहे. आणि या विस्तीर्ण पसरलेल्या सागरात कित्येक संसाधने लपली असतात. यातीलच एक म्हणजे मत्स्यरत्न. मत्स्यप्रेमींना मासे हे सर्वात महत्वाचे रत्न आहे. आणि मासे खाणार्यांची संख्या जगभरात अधिक आहे. अर्थात, मत्स्य विज्ञान अर्थात फिशरीज या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत.
प्रशिक्षण
बीएस्सी (मत्स्य विज्ञान)
कोकण कृषी विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फिशरीज, रत्नागिरी
कॉलेज ऑफ फिशरीज, मेंगलोर, कर्नाटक
डिप्लोमा इन फिशरी सायन्स
सेन्ट्रल इन्स्टीट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, वर्सोवा, मुंबई
एम.एससी, पीएचडी
कोकण कृषी विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फिशरीज, रत्नागिरी
सेन्ट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टीट्यूट, कोचीन
सेन्ट्रल इन्स्टीट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, वर्सोवा, मुंबई
कोकण कृषी विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फिशरीज, रत्नागिरी
अल्पकालीन कोर्सेस
गव्हर्नमेंट ट्रेनिंग सेंटर, अलिबाग
सेन्ट्रल इन्स्टीट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, वर्सोवा, मुंबई
डेअरी तंत्रज्ञान
दुध हि जगातील सर्वाधिक सेवन केल्या जाणार्या गोष्टीतील एक आहे. भारतासारख्या अतिविशाल लोकसंख्येच्या देशातील दुधाची आवश्यकता आपण समजू शकतो. सकाळी दुध चहा, कॉफी किंवा इतर पद्धतीने प्यायले जातेच. पण याशिवाय, सुगंधी दुध, लस्सी, ताक अशा विविध पदार्थांमध्ये दुधाचे रूपांतरण केले जाते. दुधापासून पनीर, चीझ असे पदार्थ बनवले जाऊ शकतात.
त्यामुळे डेअरी तंत्रज्ञान हे एक प्रगल्भ क्षेत्र निर्माण झाले आहे. डेअरी तंत्रज्ञान हा जरी फूड टेक्नोलॉजी चाच भाग असला तरी दुग्ध तंत्रज्ञानाचा आपण वेगळा विचार करावा इतके हे क्षेत्र विकसित आहे.
भारताचा दुग्ध उत्पादनात पहिला क्रमांक आहे. आणि हे क्षेत्र विकसित होणार आहे. अगदी सहकारी तत्वावरील व्यवसायातून अमूल सारख्या मोठ्या कंपन्या निर्माण झाल्या आहेत, हे आपणा सर्वांच्या डोळ्यासमोरचे उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणे आहेतच, पण डेअरी तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि व्यवसायाच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत.
ग्रामीण भागात विशेषतः या क्षेत्रातून प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी फार
प्रशिक्षण
डिप्लोमा इन डेअरी टेक्नोलोजी (२ वर्षे)
डेअरी सायन्स इन्स्टीट्युट, अरे मिल्क कॉलनी, मुंबई
प्रवेश पात्रता: बारावी विज्ञान
०२२-२९२७२५२२ ०२२-२६८५८७३१
डेअरी फार्म मेनेजमेंट आणि एनिमल हसबंडरी (२ वर्षे)
दापचरी, डहाणू, ठाणे
पदवी
बीटेक (डेअरी टेक्नोलॉजी ४ वर्षे
कॉलेज ऑफ डेअरी टेक्नोलॉजी, उदगीर
०३२८५-२५४७५४ www.cdtudgir.in
कॉलेज ऑफ डेअरी टेक्नोलॉजी, वरुड, पुसद
०७२३३-२४८६९६ www.cdtpusad.in
सेठ एमसी कॉलेज ऑफ डेअरी सायन्स, आणंद, गुजरात
डेअरी सायन्स कॉलेज, नेशनल डेअरी रिसर्च इन्स्टीट्युट, कर्नल
ndri.res.in ०१८४२२५२८००
नेशनल डेअरी रिसर्च इन्स्टीट्युट बेंगलोर
बीएस्सी(डेअरी टेक्नोलॉजि)
शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, उस्मानाबाद
०२४७३२६२१४२ www.mohekarcollege.org
एमएससी/ एम टेक ,पीएचडी
सेठ एमसी कॉलेज ऑफ डेअरी सायन्स, आणंद, गुजरात
०२६९२ २६१०३० www.aau.in
डेअरी सायन्स कॉलेज, नेशनल डेअरी रिसर्च इन्स्टीट्युट, कर्नल
नेशनल डेअरी रिसर्च इन्स्टीट्युट बेंगलोर
पदव्युत्तर पदविका
नेशनल डेअरी रिसर्च इन्स्टीट्युट बेंगलोर
अल्पकालीन कोर्सेस
नेशनल डेअरी डेव्ह्लपमेंट बोर्ड
आणंद, गुजरात
डेअरी व्यवस्थापन, बारा आठवडे
मिटकॉन, पुणे
८ आठवडे ०२०-६६२८९५०२