



हॉस्पिटल व्यवस्थापन
येणाऱ्या काळात महाराष्ट्राकडे वैद्यकीय पर्यटनाचा देश म्हणून पहिएल जाते आहे. कोकण अन देशावरील काही सुंदर निसर्गसंपन्न ठिकाणे आहेत. मागील बजेट मध्ये देशभर राष्ट्रीय आरोग्य विज्ञान संस्थान (एम्स) ची निर्मिती करण्यात येणार आहे असे अर्थमंत्र्यांनी विधान केले होते. त्यामुळे अनेक स्पेशियालिटी आणि सुपर स्पेशियालिटी हॉस्पिटल्स निर्माण होत आहेत. येत्या काळात त्यामुळेच हॉस्पिटल व्यवस्थापन या क्षेत्राला प्रचंड मान्यता येणार आहे.
कोर्सेस
डिप्लोमा इन हॉस्पिटल मेनेजमेंट
टाटा इन्स्टीट्युट ऑफ सोशल सायन्सेस, देवनार मुंबई
पुणे विद्यापीठ
छत्रपति शाहू इन्स्टीट्युट ऑफ बिझनेस एण्ड रिसर्च, कोल्हापूर
मास्टर इन हॉस्पिटल एडमिनिस्ट्रेशन
एम्स, नवी दिल्ली
मास्टर ऑफ बिझनेस एण्ड हेल्थ केअर एडमिनिस्ट्रेशन
स्कूल ऑफ बिजनेस मेनेजमेंट, दिल्ली विद्यापीठ,दिल्ली
दूरस्थ शिक्षण
इन्स्टीट्युट ऑफ सोशल सायन्सेस एण्ड रिसर्च, वेल्लोर
बायोमेडिकल इंजिनिअरिंग
इंजिनिअरिंग हे तसे लोकप्रिय आणि प्रतिष्ठेचे क्षेत्र. प्रवेश मिळण्यास थोडा कठीण, प्रचंड अभ्यास आणि खर्चिकही. मात्र एकदा का डिग्री मिळाली कि आयुष्य सेट. असे काहीसे गणित इंजिनिअर चेआहे. आणि थोडे अपवाद वगळता यात काही अतिशयोक्तिपूर्ण नाही. या इंजिनिअरिंग मध्ये ठराविक पाच विषय सर्वश्रुत आहेत. स्थापत्य म्हणजे सिव्हिल, इलेक्ट्रोनिकस, मागील एखाद दशकात लोकप्रिय झालेला टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल आणि मेकानिकल. मात्र याव्यतिरिक्त काही वेगळी क्षेत्रे उदयास येत आहेत. त्यांना येणाऱ्या काही वर्षात फार स्कोप निर्माण होणार आहे. कारण माणसाचे जसे जीवन बदलते तशा त्याच्या गरजा बदलणार आणि त्या भागवणार्या क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होणार.
अशाच एका नवीन इंजिनिअरिंग क्षेत्राविषयी जाणून घेऊया-बायोमेडिकल
बायो-मेडिकल इंजिनीअरिंग आहे काय?
शब्दात प्रतीत होते त्याप्रमाणे इंजिनिअरिंग चा बायोलॉजि अर्थात शरीरशास्त्र आणि मेडिकल अर्थात औषधशास्त्र यात होणारा वापर म्हणजे बायो-मेडिकल इंजिनिअरिंग. हेल्थ केअर क्षेत्र अधिक वेगाने विकसित होत आहे. सध्या दवाखान्यांचे हॉस्पिटल्स, त्याचे स्पेशिअलिटी हॉस्पिटल्स आणि त्याचे आता सुपर स्पेशिअलिटी हॉस्पिटल्स असे हे क्षेत्र अधिकाधिक प्रगत आणि विशेष प्राविण्याचे होत आहे. त्याच बरोबर विविध आजारांसाठी लढण्यासाठी लागणारी यंत्रे वाढत आहेत, अधिक क्लिष्ट होत आहेत आणि अधिक सखोल होत आहेत .
यासाठी विशेष प्राविण्य असणार्या तंत्रज्ञांची आवश्यकता आहे. यातूनच बायो-मेडिकल या क्षेत्राचा जन्म झाला आहे.
बायो-मेडिकलचा वापर कुठे ?
आरोग्य क्षेत्रामध्ये रोगाचे निदान, उपचार आणि निर्मुलन तिन्ही बाबतीत बायो- मेडिकल वापरात येते. त्यामुळे इलेक्ट्रिकल, मेकानिकल आणि मेडिकल यांचा संगम या क्षेत्रात होतो.
या विषयातील अभ्यासक्रम बघितल्यावर सुद्धा याची जाणीव होते. यामध्ये मेडिसिन, मायक्रोप्रोसेसर्स, इंस्त्रूमेंटेशन, डिजिटल सर्किट, मायक्रोसिस्टीम अशा जवळपास सर्वच क्षेत्रांचा अभ्यास केला जातो.
बायो मेडिकल मधील उपक्षेत्रे
टिश्यु इंजिनीअरिंग
जेनेटिक इंजिनीअरिंग
फार्मास्युटीकल इंजिनीअरिंग
शिक्षण
मागच्या पाच-सात वर्षांमध्ये महारष्ट्रातील कॉलेजेस नि बायो मेडिकल अभियांत्रिकी पदवी सुरु केली आहे.
महाराष्ट्रातील हा कोर्स देणारी काही नामवंत कॉलेजेस
१. विद्यालंकार कॉलेज, वडाळा
२. डी. वाय. पाटील कॉलेज, नवी मुंबई
३. द्वारकादास संघवी कॉलेज, विले पार्ले
४. भारती विद्यापीठ, पुणे
५ डॉ. भाऊसाहेब नांदुरकर कॉलेज, यवतमाळ
६. . थाडोमाल सहानी कॉलेज, बांद्रे
बायो मेडिकल नंतर पुढे नोकरीच्या संधी
बायोमेडिकल केल्यानंतर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये मेडिसिन आणि हॉस्पिटल मध्ये लागणारी विविधे यंत्रे बनवणार्या मल्टी नेशनल कंपन्यामध्ये नोकरी मिळू शकते. यामध्ये मुख्यत्वेकरून विक्री आणि सेवा इंजिनिअर आणि स्पेशालीस्ट म्हणून नोकरी मिळते. सध्या वेगवेगळी स्पेशिअलिटी आणि सुपर स्पेशिअलिटी हॉस्पिटल्स आहेत, अनेक बनत आहेत त्यामध्ये तुम्हाला बायोमेडिकल इंजिनिअर म्हणून नोकरीच्या संधी मिळू शकतात. उत्पादन कंपन्यांमध्ये संशोधक इंजिनिअर अधिकारी म्हणून नोकरी मिळू शकते.
या सर्व विषयांमध्ये तुम्ही स्वयंरोजगाराचा विचारही करू शकता.
पुढील शिक्षण
अभियांत्रिकी पदवीनंतर तुम्हाला हॉस्पिटल व्यवस्थापनात एमबीए करता येईल. ज्या प्रमाणे बीई करून एमबीए करणार्यांना फार स्कोप असतो, त्याचप्रमाणे बायोमेडिकल करून एमबीए करणार्यांना चांगला स्कोप मिळू शकेल.
तसेच तुम्ही बायोटेक्नोलॉजी , नेनो टेक्नोलॉजी या विषयात सुद्धा अभियांत्रिकी पदव्युत्तर कोर्स करू शकता.भारतातील अनेक आयआयटी मध्ये तुम्हाला हा कोर्स करता येईल.
मास्टर्स नंतर पीएचडी करून या विषयात अध्यापक सुद्धा होऊ शकता. विषय नवीन असल्यामुळे या विषयात उत्तम शिक्षक होण्यातही फार स्कोप आहे.
थोडक्यात अभियांत्रिकी मधील या नवीन विषयात उतरायला काहीच हरकत नाही. अनेक जातात तिथे जाण्यात काय हशील आहे? जिथे नवीन आहे तिथेच जास्त संधी आहे, उत्तम करिअरची सुद्धा आणि स्वतःचा ठसा उमटवायची सुद्धा.
डेअरी तंत्रज्ञान
दुध हि जगातील सर्वाधिक सेवन केल्या जाणार्या गोष्टीतील एक आहे. भारतासारख्या अतिविशाल लोकसंख्येच्या देशातील दुधाची आवश्यकता आपण समजू शकतो. सकाळी दुध चहा, कॉफी किंवा इतर पद्धतीने प्यायले जातेच. पण याशिवाय, सुगंधी दुध, लस्सी, ताक अशा विविध पदार्थांमध्ये दुधाचे रूपांतरण केले जाते. दुधापासून पनीर, चीझ असे पदार्थ बनवले जाऊ शकतात.
त्यामुळे डेअरी तंत्रज्ञान हे एक प्रगल्भ क्षेत्र निर्माण झाले आहे. डेअरी तंत्रज्ञान हा जरी फूड टेक्नोलॉजी चाच भाग असला तरी दुग्ध तंत्रज्ञानाचा आपण वेगळा विचार करावा इतके हे क्षेत्र विकसित आहे.
भारताचा दुग्ध उत्पादनात पहिला क्रमांक आहे. आणि हे क्षेत्र विकसित होणार आहे. अगदी सहकारी तत्वावरील व्यवसायातून अमूल सारख्या मोठ्या कंपन्या निर्माण झाल्या आहेत, हे आपणा सर्वांच्या डोळ्यासमोरचे उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणे आहेतच, पण डेअरी तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि व्यवसायाच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत.
ग्रामीण भागात विशेषतः या क्षेत्रातून प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी फार
प्रशिक्षण
डिप्लोमा इन डेअरी टेक्नोलोजी (२ वर्षे)
डेअरी सायन्स इन्स्टीट्युट, अरे मिल्क कॉलनी, मुंबई
प्रवेश पात्रता: बारावी विज्ञान
०२२-२९२७२५२२ ०२२-२६८५८७३१
डेअरी फार्म मेनेजमेंट आणि एनिमल हसबंडरी (२ वर्षे)
दापचरी, डहाणू, ठाणे
पदवी
बीटेक (डेअरी टेक्नोलॉजी ४ वर्षे
कॉलेज ऑफ डेअरी टेक्नोलॉजी, उदगीर
०३२८५-२५४७५४ www.cdtudgir.in
कॉलेज ऑफ डेअरी टेक्नोलॉजी, वरुड, पुसद
०७२३३-२४८६९६ www.cdtpusad.in
सेठ एमसी कॉलेज ऑफ डेअरी सायन्स, आणंद, गुजरात
डेअरी सायन्स कॉलेज, नेशनल डेअरी रिसर्च इन्स्टीट्युट, कर्नल
ndri.res.in ०१८४२२५२८००
नेशनल डेअरी रिसर्च इन्स्टीट्युट बेंगलोर
बीएस्सी(डेअरी टेक्नोलॉजि)
शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, उस्मानाबाद
०२४७३२६२१४२ www.mohekarcollege.org
एमएससी/ एम टेक ,पीएचडी
सेठ एमसी कॉलेज ऑफ डेअरी सायन्स, आणंद, गुजरात
०२६९२ २६१०३० www.aau.in
डेअरी सायन्स कॉलेज, नेशनल डेअरी रिसर्च इन्स्टीट्युट, कर्नल
नेशनल डेअरी रिसर्च इन्स्टीट्युट बेंगलोर
पदव्युत्तर पदविका
नेशनल डेअरी रिसर्च इन्स्टीट्युट बेंगलोर
अल्पकालीन कोर्सेस
नेशनल डेअरी डेव्ह्लपमेंट बोर्ड
आणंद, गुजरात
डेअरी व्यवस्थापन, बारा आठवडे
मिटकॉन, पुणे
८ आठवडे ०२०-६६२८९५०२