

उद्योग मार्गदर्शक व्हा…
आज महाराष्ट्रात उद्योजकता वाढण्याची नितांत गरज आहे, आणि या साठी महाराष्ट्राला उत्तम उद्योग मार्गदर्शकांची गरज आहे. पाश्चात्य जगतामध्ये त्यांना मेंटर असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये उद्योगाची भाषा समजू असे उद्योग मार्गदर्शक हवे आहेत. तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल, दुसर्याला प्रेरणा आणि योग्य सल्ला क्षमता असेल आणि उत्साह असेल तर तुम्ही एक उत्तम उद्योग मार्गदर्शक होऊ शकता. हे एक उत्तम स्वयंरोजगार क्षेत्र आहे. महाराष्ट्रामध्ये कानाकोपर्यात पसरलेले कित्येक नव उद्योजक अशा उत्तम मार्गदर्शनाच्या शोधामध्ये आहेत. त्यामुळे या व्यवसायाला प्रचंड मार्केट आहे.
उद्योग मार्गदर्शक कोण?
उद्योग हि एक उर्मि आहे. साचेबद्ध १०-६ नोकरी करून मासिक ठराविक वेतन घरी घेऊन जाण्यापेक्षा स्वतःच्या क्षमतेवर स्वतःच्या पायावर क्षमता असणारेच उद्योगात पाउल ठेवतात. त्यामुळे उद्योग सुरु करणाऱ्या उद्योजकाला केवळ तांत्रिक गोष्टींची जाणीव असते, आर्थिक आणि उद्योगाच्या बारकाव्यांची त्याला जाणीव नसते. त्यामुळे अशा गोष्टींवर योग्य मार्गदर्शनाची गरज असते. उद्योग चालू कसा करावा, ग्राहक, मार्केटचा अभ्यास कसा करावा, उत्पादन सेवा याची गुणवत्ता कशी वाढवावी याची माहिती असणे गरजेचे आहे.
अशी सर्व माहिती देणारा हा मार्गदर्शक उद्योजकाचा मित्र आणि तत्वज्ञ म्हणून काम करतो (फ्रेंड फिलोसोफ्र फ्रेंड).
तुम्हाला उद्योग मार्गदर्शक व्हायचंय का?
तुम्हाला उद्योग मार्गदर्शक व्हायचं असेक तर तुम्हाला कॉमर्स किंवा वाणिज्य शाखेची थोडीफार माहिती असणे आवश्यक आहे. बिझनेस मेंटर आणि व्यवस्थापन तज्ज्ञ यातील फरक लक्षात घेणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे हे म्हटले जाते कि उत्तम जाणकार उत्तम असेच शिक्षक असतोच असे नाही त्याचप्रमाणे उद्योग व्यवस्थापन तज्ज्ञ उत्तम मार्गदर्शक होऊ शकेलच असे नाही.
उद्योग मार्गदर्शनातील विविध पैलू
उद्योग व्यवस्थापनाची जाणीव
उद्योग व्यवस्थापनात उद्योगासाठी उपयुक्त विविध गोष्टींचा समावेश होतो.
वित्त: उद्योगासाठी वित्त कसे उभे करावे , त्याचे विविध मार्ग, त्यासाठी काय खर्च येतो (कॉस्ट टू केपिटल), गुंतवणुकीचा परतावा ज्ञान असणे आवश्यक आहे.
मनुष्यबळ:
उद्योगासाठी मनुष्यबळ गरजेचे असते. मात्र त्यांची संख्या कामाच्या तुलनेत असावी. अन्यथा त्याचा खर्च अधिक होतो. त्यामुळे योग्य प्रमाण, त्यांचे वेतन या मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
उत्पादन: उत्पादनामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये मशिनरी, जागा, उत्पादन खर्च, प्रोजेक्ट व्यवस्थापन, सप्लायर, उत्पादनाच्या विविध पद्धती, खर्च, कर यांचे आवश्यक असते.
गुणवत्ता: उत्पादन किंवा सेवा उत्तम गुणवत्तेचे असणे आवश्यक आहे. मागील वर्षी उत्तम गुणवत्ता नसण्यामुळे आंबा मधून परत आला. त्यामुळे उत्तम गुणवत्तेची मानके मार्गदर्शकाला माहित असणे आवश्यक असते.
तांत्रिक माहिती: प्रत्येक व्यवसाय, उत्प्पादन आणि सेवा वेगवेगळी असते. त्यामुळे मार्गदर्शकाला सर्वच तांत्रिक माहिती असणे आवश्यक नाही. मात्र जुजबी गोष्टींची माहिती मार्गदर्शकाने ठेवावी, विशेषतः एखादा उद्योजक तुमच्याकडे आल्यावर त्याच्या व्यवसायाची जुजबी माहिती ठेवावी.
कायद्याची माहिती: विविध कायदे विविध उद्योगांना लागू पडतात. शासनाकडे नोंदण्या करणे आवश्यक असते. कंपनी म्हणून नोंदणी असेल तर त्याची पद्धती आहे, ती पार पडणे आवश्यक असते. या सर्व बाबींची पूर्ण माहिती उद्योग मार्गदर्शकाला असणे आवश्यक आहे.
मानवी गुण:
याव्यतिरिक्त विशेष गुण मार्गदर्शकाकडे असणे आवश्यक आहे.
सल्ला देणारा: मार्गदर्शक हा उत्तम सल्लागार असणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याला स्वतःकडे शांत व मृदू बोलणे, समजावण्याची कला, कठीण गोष्ट सोप्पी करण्याची कला असणे आवश्यक आहे.
चौफेर ज्ञान: मार्गदर्शकाला विविध चौफेर ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी वाचन, लोकांमध्ये मिसळणे. विविध तज्ज्ञांशी संवाद, विविध सेमिनार्स न न उपस्थिती यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
उत्साह: उद्योग सुरु उत्साही उद्योगाचा विचार करु शकतो. त्यामुळे मार्गदर्शक सुद्धा उत्साही असावा. नवनवीन गोष्टी शिकण्याची, कठीण काळातही नाउमेद न होण्याची त्याची वृत्ती पाहिजे. उद्योगात अपयशाच्या वेळा येतात. अ वेळेस उद्योजकाला सतत उत्साही ठेवण्याची जबाबदारी उद्योजकाची आहे.
प्रशिक्षण
उद्योग सल्लागारासाठी कुठचाही पारंपारिक को उद्योजर्स नाही. साधारणतः एन्टरप्र्युनार्शीप व्यवस्थापन या विषयातील पदविका करता येऊ शकते. मात्र यात वर नमूद सर्व विषय समाविष्ट होत नाहीत.
या विषयावरील प्रशिक्षण आणि अधिक माहिती :
प्रबोधक उद्योजकता विकास केंद्र
९९६७७०६१५०
तुम्हाला लोकांना घडवणे आवडत असे तर उद्योग सल्लागार हे एक उत्तम करिअर आहे. तुम्हाला आवड असेल तर तुमच्या पुढे क्षितीज विस्तीर्ण आहे!

डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर
तरुण पिढी सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे हे उघड आहे. कुठल्याही तंत्रज्ञानाचा अतिरेक झाला कि त्याचे दुष्परिणाम होतात. मात्र तोपर्यंत त्यातून अनेकविध चांगले परिणाम निर्माण होत असतात. अनेक संधीसुद्धा यातून निर्माण होतात. फेसबुक लिंकडीन मुळे खूप तरुणांशी अत्यंत कमी खर्चात संवाद साधता येतो. पोहोचता येत. यातूनच निर्माण होते संधी मार्केटिंग ची त्याचे नाव डिजिटल मार्केटिंग.
आयटीच्या बाबतीत भारत फार पुढे आहे. इंटरनेट च्या वापराबाब्तीत भारत वेगाने प्रगती . पंतप्रधानांनी डिजिटल भारताची संकप्लना मांडली आहे. यातून भारतात डिजिटल युगाची भरभराट होणार हे नक्की! याचा घरबसल्या व्यावसायिक फायदा कसा करून घेता येईल हे आपल्याला पहिले पाहिजे.
डिजिटल मार्केटिंग चे आपण तीन मुख्य भाग करू शकतो.
१. इंटरनेट मार्केटिंग - इंटरनेट चा विविध गोष्टींसाठी वापर केला जातो. हि सर्व वेबसाईट मार्फत होतात. अशा असंख्य वेबसाईट महाजालात आहेत. त्यांचे आपण ठळक शकतो. कंपन्यांच्या/व्यावसायिक वेबसाईट. नोकरीच्या वेबसाईट, सोशल मिडिया, मीडियाच्या वेबसाईट, सर्च इंजिन्स, सेवाभावी संस्थांच्या किंवा सेवाभावी संकल्पनाच्या वेबसाईट.
या सर्व वेबसाईट वर जाहिराती टाकल्यास खूप लोकांपर्यंत स्वस्तात पोहोचता येते. मात्र आपले प्रोडक्ट किंवा सेवा आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी कुठे अधिक सक्षमपणे पोहोचवल्या जाऊ शकतात ह्याचे भान मार्केटिंग सल्लागाराला असणे आवश्यक आहे.
२. सोशल मिडिया मार्केटिंग: फेसबुक ट्वीटर, लिंकडीन या सारख्या सोशल मिडीया कडे तरुण पिढी आकर्षित झालेली आहे. ह्यापैकी फेसबुक वर पुष्कळ तरुण पिढी आणि माणसे आहे . ट्विटर हे अधिक ओप्चारिक आणि म्हणून अधिक सक्षम मध्यम आहे. लिंकडीन वर अधिक व्यावसायिक लोकांचा भरणा आहे. त्यामुळे ह्यापैकी कुठल्या माध्यमाला अधिक जास्त टार्गेट करायच हे तुम्हाला समजले पाहिजे.
३. मोबाईल मार्केटिंग:
मोबाईल जवळ जवळ प्रत्येकाच्या हाती स्थिरावला आहे आणि स्मार्ट फोन जवळजवळ घराघरात पोहोचला आहे. अशा वेळेस मोबिल माध्यम हे मार्केटिंग साठी प्रभावी माध्यम न बनले तर नवल! अगोदर केवळ फोन कॉल्स हे माध्यम होते, नंतर एसएमएस आता वोट्स एप वरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते.
मार्केटिंग म्हणजे काय?
आपले प्रोडक्ट किंवा सेवा अधिकाधिक माणसांपर्यंत ग्राहक मिळवून देणे. यासाठी आपण ज्यांच्यापर्यंत फोहोच्तो आहोत त्यापैकी आपले भावी ग्राहक (पोतेन्शिअल कस्टमर) कोण हे पाहून त्यांच्यापर्यंत अधिक प्रभावी पद्धतीने जाहिरात पोहोचवणे आणि होण्यासाठी आकर्षित करणे हे डिजिटल मार्केटर चे काम आहे.
यामध्ये तुमच्या ग्राहकाच्या ब्रेंड चा लोगो कसा असावा, कुठले रंग वापरावेत इथपासून विविध वेबसाईट वर कुठे मार्केटिंग करावे, सोशल मिडिया मध्ये लोकांच्या नजरेत भरण्यासाठी काय करावे, आपली जाहिरात कशी करावी, गुगल एडवर्डस सारख्या गोष्टींचा कसा वापर करावा या सारख्या विषयांवर तुमचा सल्ला तुम्ही देता.
कोणकोणत्या गुणांची आवश्यकता आहे?
तुम्ही स्वतः सोशल आणि टेक्नोसेव्ही असणे आवश्यक आहे. हे काही कठीण नाही. तुम्हाला रुची असली, आणि तटस्थपणे गोष्टी पाहण्याची आणि त्याचे मुलांकन करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही ह्या व्यवसायात आपली छाप पडू शकता.
तुमच्याकडे एक वा दोन स्मार्ट फोन त्यात इंटरनेट कनेक्शन, एक उत्तम पीसी किंवा लेप्तोप, इंटरनेट डोंगल ह्या जीवावर तुम्ही हा बिझनेस सुरु करू शकता.
शिक्षण:
वास्तविक ह्या विषयात शिक्षणापेक्षा अधिक अनुभव गरजेचा आहे. मात्र गरजेप्रमाणे या क्षेत्रात कोर्सेस तयार झाले आहेत.
१. तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी नसेल तरी मार्केटिंग विषयातील एखादा लहानसा डिप्लोमा तुम्ही केल्यास तुमच्या ग्राहकांवर त्याची छाप पडतेच पण तुमच्या विचारांमध्येही त्याची झलक दिसते.
अधिक नैपुण्यासाठी वेलिंगकर किंवा इतर काही संस्थाचा इ बिजनेस या विषयावरील पदविका किंवा पदव्युत्तर पदविका कोर्स तुम्ही करू शकता.
२. खादी आणि ग्रामोद्योग केंद्राचा डिजिटल मार्केटिंग विषयावर एका दिवसाचा लहान कोर्स उपलब्ध आहे.
संपर्क: खादी ग्रामोद्योग, बोरीवली.
३. एन आय आय टी या संस्थेमध्ये डिजिटल मार्केटिंग, सोप्साल मिडिया मार्केटिंग या विषयांवरील लहान कोर्सेस उपलब्ध आहेत.
संपर्क: डेक्कन जिमखाना, पुणे.
४. आयएएमएआय या सस्थेतही या विषयावरील लहान कोर्सेस उपलब्ध आहेत.
संपर्क: एनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई .
५. डॉन बोस्को, कुर्ला पश्चिम.
अधिक माहितीसाठी:- प्रबोधक उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जोगेश्वरी पूर्व, मुंबई ९९६७७०६१५०
काळाच्या वेगाने चालणार्या या क्षेत्रात नाविन्यपूर्ण उद्योजकतेची फार मोठी संधी दडलेली आहे.
त्यामुळे तुमच्या कल्पकतेला वाव द्या आणि अगदी नाममात्र गुंतवणुकीत सुरु होऊ शकणार्या या क्षेत्रात उद्योजकता सुरु करा.

ऑपरेशन व्यवस्थापनातील करिअर
पंतप्रधानांनी देशाला उत्पादन क्षेत्रात प्राविण्य मिळवण्याची हाक दिली. परकीयांनाही त्यांनी भारतात उत्पादन क्षेत्रात ;गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. उत्पादन क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेतील वाटा २२% आहे भारताचा २७% कामगार करतो. त्यामुळे उत्पादन क्षेत्राच्या वाढीने भारताला प्रचंड फायदा शकेल. या वाढीमध्ये तुम्हालाही सहभागी व्हायचे असेल त्यासाठी उत्पादन व्यवस्थापनात करिअर करणे गरजेचे आहे. यालाच म्हणतात ओपेरेशन मेनेजमेंट.
उत्पादन व्यवस्थापनातील विविध विषय:
उत्पादन क्षेत्र हे फार विशेष प्राविण्याचे क्षेत्र आहे. यात गुंतवणूक जास्त आवश्यक असते. उत्पादन करण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते. त्यासाठी मशीन किंवा हस्तमागाची गरज असते. अर्थातच त्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यामुळे उत्पादन क्षेत्रात खर्च किंवा कॉस्टिंग विषयाला महत्व आले आहे.
उत्पादन म्हटले कि सर्व साधन्सपत्तींचा योग्य आणि पूर्ण वापर आवश्यक असतो. याचे ज्ञान ऑपरेशन व्यवस्थापन शास्त्रात दिले जाते.
उत्पादन म्हटले कि दर्जा आला. आपल्या उत्पादाची गुणवत्ता असेल तर त्याची मागणी वाढते. त्यामुळे गुणवत्ता वाढीसाठी लागणाऱ्या विविध तंत्रांचा वापर गुणवत्ता व्यवस्थापन होतो.
याव्यतिरिक्त उत्पादन आणि त्यातील साधनसंपत्तीच्या व्यवस्थापनातील तंत्र उत्पादन काढण्यासाठी वापरली जातात
.
प्रशिक्षण
१. ओपेरेशन व्यवस्थापन
या विषयात पदव्युत्तर पदविका तसेच एमबीए उपलब्ध आहेत.
अ) मुंबई विद्यापीठ :
दूरस्थ शिक्षण, कालिना सांताक्रूझ.
येथे वर्षाचा पदव्युत्तर पदविका कोर्स उपलब्ध आहे. यात उत्पादन क्षेत्राशी संबंधित विषयांचा समावेश होतो.
ब) वेलिंगकर इंस्तीत्युत
येथे दोन वर्षाचा कोर्स उपलब्ध आहे. यात अधिक विस्ताराने प्रशिक्षण दिले जाते. हासुद्धा दूरस्थ पद्धतीचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये इतर विषयान्समवेत टोटल क्वालिटी व्यवस्थापन सिक्स सिग्मा यांचे प्रशिक्षण दिले जाते.
क) सिम्बोईसीस, पुणे
येथेही दोन वर्षांचा दूरस्थ शिक्षण पद्धतीने पूर्ण करण्यासारखा बिझनेस मेनेज्मेंत मध्ये पदव्युत्तर पदविका कोर्स उपलब्ध आहे. यात ऑपरेशन व्यवस्थापन हा प्राविण्य कोर्स घेत येतो.
याशिवाय अनेक व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांमध्ये पूर्णवेळ व दूरस्थ दोन्ही पद्धतीनी ऑपेरेशन व्यवस्थापनातील कोर्स उपलब्ध असतात. तसेच अनेक व्यवसाय व्यवस्थापन कोर्सेस मध्ये ऑपरेशन हा प्राविण्य कोर्स असतो. तसेच .सप्लाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका हा सुद्धा कोर्स उपलब्ध आहे. संस्थांप्रमाणे एक व दोन वर्षांचे कोर्सेस असतात.
१. वेलिंगकर विद्यापीठ, माटुंगा
२. मुंबई विद्यापीठ, कालिना
३. गरवारे इंस्त्त्युत कालिना
४. लाला लजपतराय इंस्तीतुत
५. सिम्बोइसिस, पुणे
६. एस पी जैन इंस्तीतुत
२. गुणवत्ता व्यवस्थापन
केवळ गुणवत्ता व्यवस्थापनात करिअर करायचे असेल तर अनेक संस्था विशेष कोर्सेस देतात.
सिक्स सिग्मा :
१. सिक्स सिग्मा गुणवत्ता मापनाची पद्धती आहे. यात ग्रीन आणि ब्लेक असे दोन टप्पे असतात. साधारणतः पाच ते दहा दिवसांचा एक कोर्स असतो.
मुंबई ठाण्यात अनेक संस्था प्रशिक्षण आयोजित करतात.
१. केपीएमजी: संपर्क: राहुल अगरवाल: Email: in-fmSixSigma@kpmg.com
२. सिक्स सिग्मा मुंबई: विक्रोळी, मुंबई: संपर्क: sixsigmamumbai.in
3. बेंचमार्क सिक्स सिग्मा: बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स
२. लीन व कायझेन व्यवस्थापन
ह्या दोन्ही जापनीस गुणवत्ता पद्धती आहेत. जितक्या प्रमाणात जापनीस कंपन्यांचे येथे साम्राज्य वाढेल तितकी या कोर्स केलेल्यांची मागणी वाढत जाईल.
लीन व्यवस्थापन प्रशिक्षण:
१. सिम्पली लर्न, कुर्ला मुंबई
२. टीयुव्ही नॉड :संपर्क :०२२- ६६४७७०००
उत्पादन क्षेत्राला दिवस येणार आहेत . केंद्रांने अधिक गांभीर्याने पाहिल्यामुळे भारतातून अधिकाधिक उत्पादन उद्योजक वाढीस लागतील. तसेच त्यांना लागणाऱ्या उत्पादक विशेषज्ञांची सुद्धा मागणी वाढेल. त्यामुळे या क्षेत्रात अधिकाधिक करिअरच्या संधी उपलब्ध होतील.
त्यामुळे मेक इन इंडिया क्रांतीचा भाग होण्यासाठी सज्ज व्हा!