

सार्वजनिक आरोग्य आणि करिअर
माणसाचे आरोग्य हा त्याच्या जपवणुकीचा फार मोठा दागिना. माणसाचे शरीर फार काटक कसते. मात्र सध्याच्या धाकाधुकीच्या आणि कृत्रिम जगण्यात असे अनेक प्रश्न उद्भवतात ज्याला शरीर दाद देते. त्यामुळे आरोग्य जपण्यासाठी माणसाला पूर्वीपेक्षा अधिकच मेहनत करावी लागत आहे. त्यामुळेच सार्वजनिक यंत्रणांची जबाबदारी अधिकच वाढते. सार्वजनिक यंत्रणात प्रदेशाच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक विशेष अधिकारी असतो त्याला म्हणतात पब्लिक हेल्थ ऑफिसर. मेडिकल केलेल्यांसाठी नेहमीच्या वाटांपेक्षा वेगळी आणि सामाजिक जाणीव ठेवणारी हि वात आहे. मात्र इतर विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेल्यांनाही या क्षेत्रात करिअर करता येते. त्याच्या विषयी आज माहिती घेऊ.
पब्लिक हेल्थ म्हणजे काय?पब्लिक म्हणजे सार्वजनिक आरोग्य. याच्यामध्ये सार्वजनिक मलनि:सारण, रस्त्यावारिल कचरा. सार्वजनिक ठिकाणी होणारा कचरा, पसरणारे रोग, संसर्गजन्य रोग आणि चिकन पोक्स, इबोला यासारखे उद्भवणारे रोग यामुळे सार्वजनिक जीवनावर होणारा परिणाम या सर्वांचा समावेश पब्लिक हेल्थ मध्ये येतो. संधी:महाराष्ट्र राज्य- आरोग्यसेवा डिरेक्टोरेट केंद्र आणि राज्य शासन आपल्या या यंत्रणेमार्फत अनेक कार्यक्रम राबवते. यात मुख्यतः एड्स निवारण कार्यक्रम, अंधत्व निर्मुलन कार्यक्रम, ग्रामीण आरोग्य कार्यक्रम, गर्भधारणा आणि लहान बालकांच्या सुरक्षेचा कार्यक्रम, कुटुंब विकास कार्यक्रम,कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम, मानसिक विकार निर्मुलन कार्यक्रम, आयोडीन कमी निर्मुलन या कार्यक्रमांचा समावेश आहे. त्याच बरोबर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आहेत. शासनाच्या यंत्रणेद्वारे राज्याच्या नागरिकांची सेवा करण्याची हि फार मोठी संधी उपलब्ध आहे. पब्लिक हेल्थ
शिक्षण:
पब्लिक हेल्थ मध्ये कार्य करण्यासाठी या विषयात पदव्युत्तर पदवीची आवश्यकता असते. अनेक विद्यापीठे हे शिक्षण देतात. यात टाटा संस्थेतील कोर्स अधिक मान्यता प्राप्त आहे.
१. सार्वजनिक आरोग्य- सामाजिक संसर्गजन्य रोग पदव्युत्तर पदवी.
दोन वर्षांचा विशेष प्रविण्याचा हा कोर्स आहे. यात थेअरी आणि व्यावसायिक प्रशिक्षण यांचा समावेश असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्ही अनुभव मिळतात.
अभ्यासक्रम :
दोन वर्षात कंपल्सरी आणि निवड अशा दोन प्रकारचे अभ्यास विद्यार्थ्यांना करावे लागतात. संसर्गजन्य रोग, आरोग्य अर्थशास्त्र, संख्याशास्त्र, शेवटच्या वर्षाला प्रबंध सदर करावा लागतो.
अभ्यासक्रमात सामाजिक संस्थेबरोबर काम करण्याची तसेच संशोधनाची संधी मिळते.
२. सार्वजनिक आरोग्य- हेल्थ पोलिसी आणि अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी.
दोन वर्षात कंपल्सरी आणि निवड अशा दोन प्रकारचे अभ्यास विद्यार्थ्यांना करावे लागतात. यात भारतातील आरोग्य यंत्रणा, आपली हेल्थ पोलिसी, औषधोपचार अर्थशास्त्र, विविध विषयांचा अभ्यास यांचा समावेश होतो.
यात पाच महिन्यांची इन्तर्न्शिप, १६ आठवड्यांचे प्रशिक्षण आणि संशोधन याचा समावेश आहे.
३. हॉस्पिटल व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवीहॉस्पिटलच्या व्यवस्थापनासाठी असणारी व्यास्थापन कौशल्ये यातून शिकवलीजातात . दोन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे.
४. हेल्थ एडमिनिस्त्रेशन मधील पदव्युत्तर अभ्यासक्रम
दोन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम असून यात आरोग्य विषयक रिसर्च आणि व्यवस्थापन कौषये विकसित करण्यासाठी अभ्यासक्रम बांधलेला आहे.
संपर्क : टिस, सेंटर ऑफ पब्लिक हेल्थ देवनार, मुंबई
मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ देणाऱ्या इतर संस्था :
१. पुणे विद्यापीठ, गणेशखिंड पुणे
२. इंडिअन इंस्तीत्युत ऑफ पब्लिक हेल्थ, दिल्ली
३. सिम्बोइसिस, पुणे
संधी
वर नमूद केल्या प्रमाणे शासकीय संस्थांमध्ये जसे महाराष्ट्र राज्य- पब्लिक सर्विसेस, महानगरपालिका, पब्लीक हेल्थ अस्सोचिएशन ऑफ इंडिया यांमध्ये संधी उप्लाभ्द होतात. तसेच विविध हॉस्पिटल्स आणि आरोग्य विषयात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांमध्येही संधी उपलब्ध होतात.
पात्रता:
पात्रता विविध संस्थान्नुसार बदलते. साधारण मेडिकल क्षेत्रातील पदवी हा निकष असला तरी बर्याच संस्था इतर विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा पदवी असणार्यान पदव्युत्तर पदवीला प्रवेश देतात.
तेंव्हा चला, सामाजिक जबाबदारी जपणाऱ्या क्षेत्रात प्रवेश घ्या.

पर्यावरणातील करिअर
निसर्गाचा आणि माणसाचा घनिष्ट संबंध. माणूस हा निसर्गाचा घटक. या निसर्गातून त्याला अन्न मिळते, वस्त्र निवारा मिळतो. निसर्गातील घटकांचा साधन म्हणून सहस्त्र वर्षे माणूस वापर करता आला आहे. मात्र या विकासाच्या कालखंडात जपून वापरानाय्च्या नैसर्गिक साधन संपत्तीला त्याने कधी ओरबाडायला सुरुवात केली हे त्याला समजले नाही. आज त्याच संपत्तीचा ह्रास होऊ लागला. आणि हळू हळू याचे गंभीर दुष्परिणाम त्याला दिसू लागले. पूर, त्सुनामी, पाणी तुंबणे, समुद्राची वाढणारी पातळी यामुळे होणारी जीवितहानी आणि वित्त हानी यामुळे आपल्या स्वार्थी वागण्याचा माणसाला पश्चाताप होऊ घातला. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्याची गरज त्याला वाटू लागली. यातूनच पर्यावरण तज्न्यांची आवश्यकता निर्माण झाली आणि उभे राहिले एक हरित-करिअर!
पर्यावरण म्हणजे काय?अगदी शाळेपासून विचारला जाणारा हा प्रश्न वास्तवात, या क्षेत्रातील करिअरच्या संधींची व्याप्ती दाखवतो.तुमच्या आजुबाजूला जेजे काही आहे, ते सर्व पर्यावरणात मोडते. त्यात आजूबाजूचा समाज, माणसे , प्राणी, वनस्पती, डोंगर, नद्या, पाण्याचे स्त्रोत, माती सर्वांचा समावेश पर्यावरणात होतो.
त्यामुळे पर्यावरणातील करिअर मध्ये सामाजिक विकास तज्ज्ञ, वनस्पती तज्ज्ञ, प्राणी तज्ज्ञ, भूगर्भ तज्ज्ञ, प्रदूषण रक्षण तज्ज्ञ, जल संपदातज्ज्ञ, प्राणी तज्ज्ञ, सागरी जीव तज्ज्ञ या सर्वांचा समावेश होतो.
पर्यावरणातील शिक्षण:
पर्यावरणातील करिअर साठी या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त करणे गरजेचे आहे. यासाठी अनेक उपविभागांचा पर्याय उपलब्ध होतो.
पर्यावरण विज्ञान:
१. पुणे विद्यापीठ- गणेशखिंड पुणे- ०२०-२५६९११९५
२. मुंबई विद्यापीठ: कालिना, सांताक्रूझ
मिर्जोले, रत्नागिरी
३. एसएनडीटी- नवीन मरीन लाईन्स, मुंबई.
पदव्युत्तर पदवी:
४. एस आय इ एस: नेरूळ, नवी मुंबई-४००७०६
आय आय टी, पवई-पर्यावरण अभ्यास केंद्र
आय आय टी च्या या केंद्रात 'पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञानातील' बीटेक आणि एमटेक या पदव्या, एकत्रित अभ्यासक्रम आणि पीएचडी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
बारावीनंतर पर्यावरण अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
संपर्क :आय आय टी, पवई, मुंबई.
टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टिस)
टीस या प्रसिद्ध संस्थेत पर्यावरण विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत:
१. पर्यावरण बदल आणि संतुलित विकास
२. जलव्यवस्थापन
संपर्क: टीस, देवनार. मुंबई
नोकरी आणि स्वयंरोजगाराच्या संधी:
१. शिक्षक:
पर्यावरण क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रोफेसरशिप आणि रिसर्च च्या संधी उपलब्ध असतात. यासाठी पदव्युत्तर पदवीनंतर नेट सेट परीक्षा उत्तीर्ण करुन संधी मिळू शकतात.
२. पर्यावरण सल्लागार
औद्योगिक क्षेत्राला नवीन कारखाना टाकणे, करणे, या आधी पर्यावरण मंत्रालयाच्या परवानग्या आवश्यक असतात. त्याच प्रमाणे अनेक संस्था, उद्योग व्यवसाय यांना पर्यावरणाशी संबंधित तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची पृतता करण्यासाठी सल्लागाराची आवश्यकता असते. असे अनेक सल्लागार उपलब्ध आहे . या सर्वांकडे नोकरीच्या संधी उपलबद्ध असतात.
तसेच स्वयंरोजगाराची खूप मोठी संधी सुद्धा उपलब्ध आहे.
३. भारतीय प्रशासकीय सेवा
भारतीय वनसेवा आणि राज्य कृषी व वन सेवा या परीक्षा उत्तीर्ण होऊन केंद्र आणि राज्य प्रशासकीय सेवेच्या संधी उपलब्ध होतात. यासाठी पर्यावरण किंवा तत्सम विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण होणे गरजेचे असते.
४. पर्यावरण संरक्षण संस्था:
अनेक सामाजिक संस्था पर्यावरण संरक्षणात काम करीत आहेत. या संस्थांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
४. वन्यजीव संरक्षण
भारतातील अभयारण्ये आणि वनस्पती संरक्षण केंद्रांमध्ये पर्यावरण तज्ज्ञांची आवश्यकता असते. या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
५. जलव्यवस्थापन
याव्यतिरिक्त केवळ जलव्यवस्थापन या क्षेत्रात संधी उप्लाभ्द आहेत. पाणी वाचवणे, संगोपन, पावसाचे पाणी रक्षण करण्याच्या पद्धती, तसेच पाटबंधारे, धरणे आणि पाणी साठवण्याच्या इतर स्त्रोतांचे व्यवस्थापन या क्षेत्रात खुच मोठी नोकरी तसेच स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होते.
कासचे पठार युनोच्या संरक्षित क्षेत्रामध्ये गेल्यानंतर पर्यावरणाकडे अधिक लक्ष वेधले गेले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात पर्यावरण बदल आणि रक्षणासाठी विशेष केंद्राची स्थापना करण्याचे केंद्र शासनाने घोषित केले आहे. त्यामुळे या क्षेत्रात खासगी तसेच शासकीय नोक्रीच्याही अनेक संधी आहेत आणि उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात पैसा आहेच पण समाधान सुद्धा.
या व्यतिरिक्त या वसुंधरेच्या राक्षांची नैतिक जबाबदारी तुम्ही पेलता याबद्दल हि मानवजात तुमचे ऋणी असणार आहे, हे सुख वेगळेच!

रिटेल मार्केटिंग मधिल रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी
भारतासारख्या प्रचंड विस्तीर्ण आणि लोकसंख्या असलेल्या देशात वस्तू विक्री व्यवसायाला प्रचंड वाव असतो. हा वाव लोकसंख्या आणि लोकसंख्येची वस्तू खरेदी ची क्षमता दोघांवर अवलंबून असते. भारतामध्ये दोन्ही विपुल प्रमाणात आहेत. या जोडीलाच लोकसंख्येचे वर्गीकरण, प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये असलेली खरेदी क्षमता, वयोगटानुसार बदलणारी मागणी या सर्वांचा फायदा वस्तू विक्रेता व्यवसायाची होण्यासाठी होतो आहे. यामुळेच जगाचे लक्ष भारताकडे वेधले गेले आहे. इकडची लोकसंख्या आणि मागणी वर्षानुवर्षे वाढत जाणार आहे. वाल्मार्त, एमेझोन हे जागतिक रिटेल चे बलाढ्य भारतात शिरले आहेत. त्यांना प्रचंड संधी दिसते आहे म्हणूनच न! मग जगाला जे खूणावते आहे ती संधी आपल्या मुलांनी का उचलू नये? पाहूया रिटेल आणि होलसेल मार्केट मधील संधींविषयी
आपल्या मराठीत एक म्हण आहे… ओरड्नार्याचे दगडही विकले जातात. मार्केटिंग चे हे मुलभूत तत्व आहे.
आपल्याकडे मार्केतीन्ग्चे प्रकार पडतात
१ होलसेल मार्केटिंग
२ रिटेल मार्केटिंग
होलसेल
होलसेल मार्केटिंग प्रमणात एकाच वस्तूमध्ये विनिमय करणे. यात तुम्ही अनेक रिटेल म्हणजे किरकोळ व्यापारांशी . तुम्ही कंपनीकडून किंवा कंपनीच्या एजंट कडून थेट माल विकत घेता. त्य्व्मुळे तुम्हाला सर्व वस्तूंच्या विक्रीची चिंत्वव नसते. तुम्ही ज्या वस्तुचे होल्सेलर आहात त्याच वस्तूच्या विक्रेत्यांशी तुम्हाला जोडायचे असते. तुम्हाला मालहि थेट कंपनीकडून उत्पादकाकडून येतो. त्यामुळे तुम्हाला माल मिलव्न्य्स्चि काळजी नसते. कंपनी तुमच्या दारापर्यंत वस्तू पोहोचवते आणि विक्रेतेही तुमच्याकडून वस्तू घेऊन जातात. तुम्हाला लक्ष केंद्रित केवळ अधिकाधिक विक्रेते बांधण्यावर. अर्थात गोम इथेच आहे. कंपनीला तुम्हाला होल्सेलर नेमण्यासाठी उद्युक्त करणे त्यासाठी पुरेशी जागा भांडवल आणि मनुष्यबळ तुमच्या गाठीशी असावे लागते. हि गोष्ट महत्वाची आहे.
रिटेल
रिटेल म्हणजे किरकोळ व्यापारी. यात तुम्ही अनेक प्रकारच्या वस्तू एकत्र विकू शकता जसे किराणा किंवा एका विशिष्ट वस्तुत व्यापार करू शकता जसे कपडे. यातहि अजून प्राविण्य तुम्ही शकता उदाहरणार्थ लहान मुलांचे कपडे किंवा स्त्रियांचे कपडे. मार्केतीन्गच्या परिभाषेत याला सेगमेंटेशन म्हणतात. तुम्ही जसे अधिकाधिक लहान म्हणजे मायक्रो किंवा निषे मार्केटिंग मध्ये जाता तशी तुमची विक्रीची संख्या आणि यश वाढत जाते असे मार्केतीन्ग्चे तज्ज्ञ सांगतात.
या व्यतिरिक्त मार्केटचे अजून दोन प्रकार पडतात
एकाला म्हणतात बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस मार्केटिंग. यात तुमचे टार्गेट मार्केट फक्त इतर व्यावसायिक असतात. तुम्ही सामान्य ग्राहकाला वाटू विकत नाहीत. उदाहरणार्थ कंपन्यांना लागणारी स्टेशनरी किंवा कारखान्यांना लागणारे विविध टूल्स.
दुसरा प्रकार आहे बी टू सी अर्थात थेट सामान्य ग्राहकांना वस्तू देणे.
ऑनलाईन मार्केटिंग
या व्यतिरिक्त एक फार मोठी संधी मागील वर्षात आलेली आहे ती म्हणजे ओन्लाइन मार्केटिंग. एमेझोन किंवा फ्लीपकार्त या कंपन्या इंतार्नेत इंटरनेट द्वारे वस्तू विकट आहेत . भारतात संगणक वापरणारा युवा वर्ग जसा वाढत आहे तशी या वर्गाची ओन्लाइन मागणी वाढत जाणार आहे. अनेक लहान मोठ्या कंपन्या आपले पोर्टल उघडून या क्षेत्रात आल्या आहेत. त्यामुळे खूप मोठी संधी या क्षेत्रात खुणावते आहे.
तुमच्याकडे मार्केटिंग आहे का?
रिटेल आणि होलसेल मार्केट चा आवाका एवढा मोठा आहे कि नक्की त्यात हा प्रश्न पडू शकतो. अशा वेळी उत्तर तुमच्या आजूबाजूलाच असते. तुमच्या शेजारी काय विकले जात नाहीं ते विकण्याची संधी तुम्हाला आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला एका विशिष्ट वस्तुत रस असेल जसे गाड्या किंवा संगणक तर त्या वस्तूंचे मार्केटिंग तुम्ही चांगले करू शकता.
शिक्षण
रस्त्यावरचा मारवाडी बनिया कुठलेही शिक्षण न घेत वर्षानुवर्षे यशस्वीपणे धंदा करीत आहे. मात्र या क्षेत्राचे शास्त्रशुद्ध शिक्षण आज उपलब्ध आहे. अगदी लहान प्रमाणपत्र अभ्यासापासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंत या क्षेत्रात शिक्षण घेत येते.
रिटेल व्यवसायातील प्रमाणपत्र आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम
१. वेलिंगकर मध्ये अकरा महिन्याचे पूर्णवेळ प्रमाणपत्र आणि पदव्युत्तर पदविकेचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी वेलिंगकर व्यवस्थापन इंस्तीत्युत, माटुंगा
२. चेतना व्यवस्थापन इंस्तीत्युत, बांद्रा, मुंबई येथेही रिटेल मधील पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
३. के जे सोमैय्या इंस्टीट्युट, विद्याविहार, मुंबई
४. मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इंस्तीत्युत मध्ये रिटेल व्यवस्थापनावर पदव्युत्तर पदविका पदविका उपलब्ध आहेत.
संपर्क गरवारे इंस्टीट्युट ऑफ करिअर डेव्हलापमेंट
कालिना, सांताक्रूझ
ऑन लाईन बिझनेस
१. मुंबई विद्यापीठाची इ-कॉमर्स या विषयात पदव्यत्तर पदवी उपलब्ध आहे.
संपर्क वाणिज्य शाखा मुंबई विद्यापीठ कालिना सांताक्रूझ
२. इ बिझनेस वअनेस व्यवस्थापन कॉलेजेस इ बिझनेस या विषयात व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका देतात.
वेलिंगकर, माटुंगा
मुंबई एज्युकेशन एज्युकेशन ट्रस्ट इंस्तीत्युत, बांद्रा
मार्केटिंग
या व्यतिरिक्त सर्वच व्यवस्थापन शिक्षण संस्था मार्केटिंग या विषयात पदव्युत्तर पदविका तसेच एमबीए शिक्षण देतात.
तेंव्हा या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगार दोन्हींच्या फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जागतिक कंपन्या ज्या वेगाने या क्षेत्रात येत आहेत तसेच फ्युचर ग्रुप, बिर्ला, टाटा, रिलायन्स व्यवसाय या क्षेत्रात विस्तारत आहेत हे पाहून सर्वांनाच या संधींचे सुगावे लागले आहेत आणि या क्षेत्राच्या वाढीवर त्यांचा विश्वास आहे हे उघड आहे. मग आपणच का मागे राहावे? चला या विस्तीर्ण क्षेत्रात ठेऊया…