



गुंतवणूक सल्लागार - भारतीय शिक्षण
मागील आठवड्यात आपण गुंतवणूक सल्लागार होण्यासाठी उपलब्ध असलेल्या सीएफए आंतराष्ट्रीय पदवीबद्दल माहिती घेतली होती. मात्र प्रत्येकाला इतक्या खर्चिक शिक्षणाचा पर्याय परवडेल असे नाही. यासाठी भारतात उपलब्ध असलेल्या शिक्षणाविषयी आपण माहिती करून घेऊ.
सीएफपी (सर्तीफाइड लफ़ायनान्शिअ प्लानर ) - प्रमाणित आर्थिक नियोजनकार
फायनान्शिअल प्लानिंग स्टानडर्ड बोर्ड (एफपीएसबी) या संस्थेतर्फे सीएफपी हा कोर्स घेतला जातो. मागील काही वर्षांपासून या कोर्सची मागणी वाढत आहे. याचे कारण प्रमाणित आणि शिक्षित आर्थिक नियोजान्कारांकडे जाणार्या लोकांचे प्रमाण वाढत आहे.
सीएफपी हि पदवी पदवीधारकांना इतर नियोजान्कारांपासून वेगळे करते. त्यामुळे पदवीधारकांना आपल्या व्यवसायात किंवा नोकरीत अधिक सन्मान आणि संधी प्राप्त होतात.
अभ्यासक्रम
मोड्यूल १- आर्थिक नियोजन सुरुवात
मोड्यूल २- धोका व्यवस्थापन आणि विमा नियोजन
मोड्यूल ३- रिटायरमेंट नियोजन आणि नोकरदार फायदे
मोड्यूल ४- गुंतवणूक नियोजन
मोड्यूल ५- कर नियोजन आणि मालमत्ता नियोजन
मोड्यूल ६- प्रगत आर्थिक नियोजन
या सर्व मोड्यूल्स ला पाच परीक्षांमध्ये विभागले गेले आहे.
परीक्षा १- धोका व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन सुरुवात - २ तास
परीक्षा २- रिटायरमेंट नियोजन आणि नोकरदार फायदे आणि आर्थिक नियोजन सुरुवात- २ तास
परीक्षा ३- गुंतवणूक नियोजन आणि आर्थिक नियोजन सुरुवात- २ तास
परीक्षा ४- कर नियोजन आणि मालमत्ता नियोजन आणि आर्थिक नियोजन सुरुवात- २ तास
परीक्षा ५- प्रगत आर्थिक नियोजन - ४ तास
अनुभव:
पाचवी परीक्षा दिल्यानंतर सीएफपी पद्वि मिळण्याअगोदर गुंतवणूकव्यतिरिक्त पाच वर्षांचा आणि आर्थिक क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव मिळवणे आवश्यक आहे.
असोसिएट परीक्षा
या व्यतिरिक्त प्रत्येक विशिष्ट क्षेत्रात असोसिएट पदवी मिळवता येते.
विमा, कर व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात या असोसिएट पदवी देता येते.
प्रवेश:
या परीक्षेसाठी नेशनल शेअर बाजार द्वारे एनसीएफएम प्रमाणपत्र संस्थेत प्रवेश घेता येतो.
अधिक माहितीसाठी: http://www.nseindia.com/
आर्थिक नियोजन क्षेत्राचे इतर कोर्सेस
मुंबई शेअर बाजार- ट्रेनिंग इंस्तीत्युत
मुंबई शेअर बाजाराचे प्रशिक्षण केंद्र शेअर बाजाराशी संबंधित अनेक लहान, दीर्घ मुदतीचे आणी पदव्युत्तर पदविकेचे अभ्यासक्रम देते.
यात आर्थिक नियोजन आणी संपत्ती व्यवस्थापन या विषयावर लहान मुदतीचा कोर्स उपलब्ध आहे.
याचप्रमाणे गुंतवणूक व्यवस्थापन या विषयातील पूर्णवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रम सुद्धा उप्लाभ्द आहे.
संपर्क: बीएससी ट्रेनिंग इंस्तीत्युत
पी. जे. टॉवर, दलाल स्ट्रीट मुंबई
www.bseindia.com
नेशनल इंस्तीतुत ऑफ सिक्युरिटी मार्केट
केंद्र शासनाची हि संस्था गुंतवणुकीशी संबंधित विविध विषयांवर कोर्सेस घेते. यात सेक्युरिटी कायदा,कायदा, आर्थिक अभियांत्रिकी हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच .
अधिक माहितीसाठी:
एनआयएसएम , वाशी
www.nism.ac.in/
चार्टर्ड इस्न्तीट्युट ऑफ सिक्युरिटीस इन्वेस्त्मेन्त
हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र बीएसइ देते. यासाठी वर नमूद केलेल्या बीएसइ इंस्तीत्युत वर संपर्क साधावा.
याशिवाय मुंबईतील एनएमआयएमएस या संस्थेत आर्थिक नियोजन या विषयावर एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
हे लक्षात आले असेल, कि गुंतवणूक या विषयावर अभ्यास आणि करिअर यांच्या खूप संधी उपलब्ध आहेत. या मध्ये लहान आणि दीर्घ मुदतीचे दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
चला तर मग, गुंतवणूक सल्लागार होऊन भारताला गुंतवणुकीची सवय लाऊया आणि श्रीमंत बनवूया.
आर्थिक सल्लागार- एक प्रतिष्ठित क्षेत्र:- आंतरराष्ट्रीय सीएफए
आर्थिक नियोजन क्षेत्रातील करिअर हे फार प्रतिष्ठित आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे. या विषयात करिअर करण्यासाठी सीएफए हा कोर्स उपलब्ध आहे. भारतातील हैद्राबाद येथील आयसीएफएआय विद्यापीठ तसेच अमेरिकेतील सिएफ़ए इंस्तीतुत दोघांकडे सीएफए पदवी घेंता येते. आंतरराष्ट्रीय पदवी अधिक मान्यतेची आणि संधी देणारी आहे. येथे आपण आंतरराष्ट्रीय पदवी बद्दल माहिती घेणार आहोत.
आर्थिक विश्लेषण
सामान्य माणूस असो व श्रीमंत असामी आणि व्यक्ती असो व कंपनी, आर्थिक व्यवस्थापन हा उत्तम भविष्याचा कणा असतो. येणार्या पैशाचे मार्ग कुठून वाढू शकतात, तो कसा साठू शकतो, गुंताव्नुकीद्वारे कसा वाढू शकतो आणि असा वाढलेला पैसा नक्की कसा खर्च करावा या सरावाचे व्यवस्थापन म्हणजे गुंतवणुकीचे आर्थिक व्यवस्थापन अशी आपण थोडक्यात व्याख्या करू शकतो.
या व्यवस्थापनातील भाग म्हणजे तज्ज्ञ व्यक्तीकडून ते करून घेणे, यासाठीच फायनन्शिअल प्लानर या व्यक्तीला महत्व प्राप्त होते. व्यवसायाचे आर्थिक व्यवस्थापन (फायनन्शिअल मेनेजमेंट) आणि गुंतवणुकीचे आर्थिक विश्लेषण यात मुलभूत फरक आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
अशा आर्थिक व्यवस्थापनात करिअर करायचे असेल तर तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध होतात.
सीएफए हा आंतरराष्ट्रीय कोर्स आणि सीएफपी हा भारतातील आयएफएसबी या संस्थेचा कोर्स. यातील सीएफपी या कोर्सची माहिती आपण पुढील भागात घेऊ.
आंतरराष्ट्रीय सीएफए कोर्स
सीएफ़ए हा तीन पायर्यांचा (लेव्हल्स) कोर्स आहे. या तिन्ही परीक्षा एकामागून एक अशा घेतल्या जातात. एका वेळेस एका परीक्षेसाठी अर्ज भरता येतो. लेवल १ ची परीक्षा जुन मध्ये होते तर लेवल २ आणि लेवल ३ या परीक्षा जुने मध्ये होतात. यामुळे हा कोर्स तीन वर्षात पूर्ण करता येऊ शकतो. (अर्थात कोर्स ची काठीण्यापातळी जात आहे.)
या कोर्स मध्ये तुम्हाला आर्थिक विश्लेषणासाठी आवश्यक अशा सर्व घटकांचे ज्ञान जाते. सद्यस्थिती १४५ देशांमध्ये या कोर्स चे सव्वा लाख सदस्य विखुरलेले आहेत.
अभ्यासक्रम:
लेवल १
हि परीक्षा एकूण २४० वस्तुनिष्ठ प्रश्नांची (तीन पर्याय) असून १२० प्रश्न सकाळच्या सत्रात तर १२० प्रश्न दुपारच्या सत्रात विचारले जातात. प्रत्येक सत्र ३ तासांचे असते.
लेवल २
१२० प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला ३ गुण (पोईंट) असतात.
हि परीक्षाही सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात विभागली असून यातील प्रश्न केस पद्धतीचे असतात आणि प्रत्येक केस वर ६ प्रश्न येतात. अशा २० केसेस विचारल्या जातात.
यामध्ये अभ्यासण्यात येणारे विषय:
१. एथिक्स आणि प्रोफेशनल
एका व्यावसायिक व्यक्तीला कुठल्या गोष्ठी करणे गरजेचे आहे आणि कुठल्या टाळणे गरजेचे आहे, आपले काम नैतिकतेच्या पातळीवर कसे करावे, आपल्या क्लायंट ची काळजी कशी घ्यावी हे सर्व या विषयात शिकवले जाते.
लेवल १ परीक्षेत याला १५% महत्व असते.
लेवल २ परीक्षेत याला १०-१५% महत्व असते.
२. संख्याशास्र
आर्थिक नियोजनाचा मुल पैसा अर्थात अंक असल्याने संख्याशास्त्र आणि त्यावरून होणारा अभ्यास महत्वाचा ठरतो. यात आजच्या पैशाची भविष्यातील किंमत, वेळेनुसार बदलणारी किंमत (टाइम सिरीज), शक्यता (प्रोबेबिलीटी) अशा घटकांचा अभ्यास होतो.
लेवल १ परीक्षेत याला १२% महत्व असते.
लेवल २ परीक्षेत याला ५-१०% महत्व असते.
३. अर्थशास्त्र
मार्केट मधील अर्थशास्त्रातील घटकांचा अभ्यास या विषयात होतो. अर्थशास्त्र हा आर्थिक विषयातील मुलभूत विषय आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास महत्वाचा ठरतो.यात गुंतवणूक, बाजार, मागणी पुरवठा, महागाई, आर्थिक विकास या बाबींचा समावेश होतो.
लेवल १ परीक्षेत याला १०% महत्व असते.
लेवल २ परीक्षेत याला ५-१०% महत्व असते.
४. फायनान्शिअल रिपोर्टिंग
यामध्ये विविध कंपन्यांच्या आर्थिक ताळेबंद, घोषणा, आर्थिक घडामोडी यांचा अर्थ कसा लावावा, त्यातून अर्थ कसा समजून घ्यावा या विषयाचे ज्ञान या घटकात घेतले जाते.
लेवल १ परीक्षेत याला २०% महत्व असते.
लेवल २ परीक्षेत याला १५-२०% महत्व असते.
५. कोर्पोरेट फायनान्स
आर्थिक नियोजनासाठी आर्थिक व्यवस्थापन गरजेचे असते. त्यामुळे कंपनीच्या आर्थिक व्यवस्थापनाचे ज्ञान आर्थिक नियोजाकाला असणे गरजेचे आहे
लेवल १ परीक्षेत याला ७ % महत्व असते.
लेवल २ परीक्षेत याला ५-१५% महत्व असते.
६. इक्विटी गुंतवणूक
इक्विटी अर्थात ज्यात धोका आहे अशी गुंतवणूक . या मध्ये गुंतवणूक कशी करावी, ज्या विविध घटकांचा गुंतवणुकीवर परिणाम पडतो त्याला मुलभूत आणि तांत्रिक अशा दोन बाबींमध्ये विभागले जाते, त्याचा अभ्यास केला जातो.
लेवल १ परीक्षेत याला १० % महत्व असते.
लेवल २ परीक्षेत याला १५-२५% महत्व असते.
७. फिक्स्ड इन्कम गुंतवणूक
धोकाविरहित गुंतवणूक जसे सरकारी रोखे अशांचा अभ्यास या विषयात केला जातो.
लेवल १ परीक्षेत याला १० % महत्व असते.
लेवल २ परीक्षेत याला १५-२०% महत्व असते.
८. डेरीव्हेटीव्ज
बाजारातील गुंताव्नुकीमध्ये हे नवीन साधन आहे. यात शेअर आणि कमोडीटी बाजारामध्ये कमी पैशात अधिक गुंतवणूक करण्याचे साधन उपलब्ध होते. अर्थात त्यात धोका वेगळा आहे. या सर्वांचा अभ्यास या विषयात होतो.
लेवल १ परीक्षेत याला ५ % महत्व असते.
लेवल २ परीक्षेत याला ५-१५% महत्व असते.
९. इतर गुंतवणूक
बाजाराव्यातिरिक्त, स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक, प्रायव्हेट वेंचर अशा इतर गुंतवणूक साधनांचा अभ्यास या विषयात केला जातो.
लेवल १ परीक्षेत याला ४ % महत्व असते.
लेवल २ परीक्षेत याला ५-१०% महत्व असते.
१०. पोर्टफ़ोलिओ व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन
आणि एकूण सर्व गुंतवणूक साधने, आपले आयुष्याचे नियोजन इत्यादींचा अभ्यास पोर्त्फ़ोलिओ व्यास्थापन या विषयात होतो.
लेवल १ परीक्षेत याला ७ % महत्व असते.
लेवल २ परीक्षेत याला ५-१०% महत्व असते.
लेवल ३
या परीक्षेतील प्रश्न दीर्घ उत्तराचे असतात.
अभ्यासक्रम:
१. एथिक्स आणि प्रोफेशनल स्टेन्डर्ड
२. बिहेविअरल फायनान्स आणि व्यक्ती ग संस्थात्मक गुंतवणूकदार
३. केपिटल मार्केट
४. असेट एलोकेशन
५. इक्विटी व फिक्स्ड इन्कम गुंतवणूक
६. इतर गुंतवणूक, डेरीव्हेटीव्ह आणि धोका व्यवस्थापन
७. पोर्टफ़ोलिओ आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक
कोण परिक्षा देऊ शकते?
किमान पदवी किंवा चार वर्षांचा अनुभव (गुंतवणूक क्षेत्रात नसला तरी चालेल).
भारतातील परीक्षा केंद्रे:
भारतात बंगलोर, कोलकाता , मुंबई आणि आणि नवी दिल्ली येथे चार सेन्टर्स आहेत.
२०१५ साठी पुणे आणि अहमदाबाद येथे अधिक केंद्रे सुरु होणार आहेत.
फी
या कोर्स साठी ४५० अमेरिकन डॉलर्स हि प्रवेश फी आहे आणि याव्यतिरिक्त प्रत्येक लेवल ला परीक्षा फी अमेरिकन डॉलर्स मध्ये द्यावी लागते. जून २०१५ हच्या परीक्षेसाठी सप्टेंबर फेब्रुवारी आणि मार्च पर्यंत प्रवेश घेणाऱ्यासाठी हि फी वाढत जाणार आहे.
कोर्स साठी प्रवेश ऑनलाईन घायचा अस्तून फी सुद्धा ऑनलाईन भरायची असते.
अधिक माहितीसाठी:: www.cfainstitute.org
मुंबईमध्ये अनेक संस्था या कोर्स साठी कोचिंग सुद्धा देतात. इंटरनेट वर अधिक माहिती मिळू शकेल.
संधी:
अंतरराष्ट्रीय पदवीचे महत्व वादातीत आहे. मार दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेतले असल्यास हे महत्व कमी होते. आंतरराष्ट्रीय सीएफए परीक्षेचे मात्र तसे नाही. त्यामुळे आर्थिक नियोजन या क्षेत्रात काम करायचे असल्यास हि पदवी हे उत्तम मध्यम आहे. येणाऱ्या काळात भारतात आणि जगातही गुंतवणूक सल्लागारांना सुगीचे दिवस येणार आहेत. भारतातील उत्पन्नाची वाढणारी पातळी आणि जागतिक दर्जाच्या सुविधांकडे भारतीयांचा झुकणारा कल यामुळे हा कोर्स नक्कीच एक उत्तम गुंतवणूक ठरू शकतो.
तेंव्हा सज्ज व्हा, आंतरराष्ट्रीय पदवी घेऊन आपली किंमत वाढवण्यासाठी!
अवकाशशास्त्र क्षेत्रातील संधी
भारताने मागच्या दहा वर्षात चंद्रावर आणि मागील वर्षीच मंगळावर यान पाठवले आणि अवघ्या भारतीयांची मन गर्वाने उंचावली. मंगलयान हा बर्ताच्या अवकाश शास्त्राच्या प्रगतीतील मैलाचा दगड. याव्यातीतीक्त अनेक उपग्रह काही देशी काही परदेशी बनावटीचे भारत अवकाशात सोडत असतो. इस्त्रो भारताच्या अवकाश करते. हे अवकाश शास्त्र नेमके आहे काय? एखाद्या गोष्टीचे अथांगपण दर्शवण्यासाठी आपण अवकाश हि संज्ञा वापरतो. या क्षेत्रातील करिअर संधी आणि वैज्ञानिकांची गरज खरच या क्षेत्राएवढीच अथांग आहे. त्याची हि ओळख.
अवकाश शास्त्र (एस्त्रोनोमि) म्हणजे काय?
अवकाश तंत्रज्ञान अवकाशातील घटना आणि पदार्थ यांचा अभ्यास करण्याचे शास्त्र. यात त्यांची हालचाल, चलनवलन (मोशन), त्यामागील तत्व, त्यांचे गुणधर्म, भौतिक गुण यांचा सर्वांचा अभ्यास यामध्ये होतो. आणि त्यातून भविष्यात घडणाऱ्या घटना, अवकाशात होणार्या उलथापालथी आणि त्याहून एवढ्या अथांग अवकाशाचा विस्तार शोधण्याचा प्रयत्न केला जातो.
अवकाश तंत्रज्ञान हे त्यामुळे निरीक्षणाचे शास्त्र आहे, प्रयोगाचे नाही. निरीक्षण हे आधुनिक गणिताची सांगड घालून अधिक काटेकोरपणे केले जाते. याहून अधिक अवकाशातील घटनांचा अभ्यास करण्यासाठी सदृश परिस्थिती निर्माण करून प्रयोगशाळा बनवल्या जातात.
अवकाश तंत्रज्ञान
अवकाश आणि त्यातील ग्रह तारे सूर्य आकाशगंगा यांची मानवाला नेहमीच उत्सुकता आहे. चंद्र, ग्रहणे, उल्कापात, धुमकेतू या गोष्टीबद्दल अगोदरच्या काळात असणारी भीती आणि अंधश्रद्धा याची जागा नंतर त्यांच्यावर झालेल्या वैज्ञानिक शोधामुळे उत्सुकतेने घेतली. अवकाशातील असंख्य विवरांपैकी मिल्की वे या छोट्याश्या आकाशगंगेचा पृथ्वी हा भाग आहे. त्यामुळे अवकाश क्षेत्रात संशोधनाला किती प्रचंड वाव आहे याची कल्पना यावी.
अगदी आपल्या सुर्यमण्डळापैकी फक्त दहा ग्रहांचा शोध लागला आहे. चंद्र मंगळ या ग्रहांवर जाण्याचे प्रयत्न अनेक देश करीत आहेत. त्यापैकी भारताचाही नंबर लागला आहे. आता सूर्यावर जाण्याच्या योजना बांधल्या जात आहेत. त्यामुळे हे क्षेत्र खूप मोठी संधी घेऊन उभी आहे. येणाऱ्या काळात अधिकाधिक उपग्रह, अवकाशयाने अवकाशात सोडली जातील. चंद्र मंगळावर राहण्यासाठी योग्य वातावरण आहे का याची चाचपणी सुरु आहे, येत्या काळात कदाचित अवकाश सफर सुद्धा सुरु होईल. भारताकडे येत्या काळातील विश्वाशक्ती म्हणून पहिले जात आहे. त्यामुळे भारताकडून अधिकाधिक महत्वाकांक्षी मोहिमा आखल्या जातील.
अवकाश शास्त्रातील करिअर संधी
१. अवकाश वैज्ञानिक
अवकाश तंत्रज्ञान आणि मोहिमांमध्ये तज्ज्ञांची आवश्यकता असते. या विषयाला संबंधित तज्न्यांची आवश्यकता असते. यात मोहीम चालवण्यापासून (डायरेक्टर) अनेक विविध पदांची गरज असते. या विषयात पदव्युत्तर पदवी आणि पी एच डी केल्यानंतर अर्ज करता येतो.
२. संशोधक
अंतराळ विज्ञान मध्ये संशोधनाचा विस्तार फार मोठा आहे. यात शोध लागलेल्या ग्रहांच्या अभ्यासापासून ते उत्तम उपग्रह बनवण्याच्या तंत्रज्ञानापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो. इस्त्रो, विविध विद्यापीठे, शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये संशोधक म्हणून वाव मिळू शकतो.
३. संरक्षण सेवा
या व्यतिरिक्त संरक्षण सेवांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. यात रेडीओ टेक्नोलॉजी,रडार यांचा अभ्यास अधिक महत्वाचा असतो.
भारतातील अवकाश संशोधन केंद्रे:
भारताचे राष्ट्रीय अवकाश केंद्र 'इंडिअन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन' अर्थात 'इस्रो' भारताच्या अवकाश मोहिमा हातात घेते. देशभरात इस्रोची अनेक केंद्रे आहेत.
इस्त्रो मध्ये अवकाश वैज्ञानिकापासून ते माहिती संकलक पर्यंत अनेक भरती दरवर्षी केल्या जातात.
संपर्क: इस्रो-
अंतरीक्ष भवन,
बंगलोर- ५६०२३१
अस्त्रोलोजीकल असोसिएशन ऑफ इंडिया
या संस्थेत अवकाश शास्त्र विषयातील संशोधन केले जाते. संशोधकांना या संस्थेत चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
रमण रिसर्च इंस्तीत्युत
या संस्थेत अवकाश शास्त्र विषयातील संशोधन केले जाते. पी एच डी, त्यापुढील संशोधन यासाठी संस्थेत संधी उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक पदांसाठी भरती उपलब्ध आहेत.
संपर्क:
रमण रिसर्च इन्स्तिट्युट
सदाशिवनगर
बंगलोर
इंडिअन इंस्तीत्युत ऑफ अस्त्रोफिसिक्स
या संस्थेत अवकाश भौतिक या विषयातील पदवी पासून पी एच डी पर्यंत कोर्सेस शिकवले जातात तसेच त्यानंतर संशोधन केले जाते.
संपर्क: इंडिअन इंस्तीत्युत ऑफ अस्त्रोफिसिक्स
कोरामंडलम , बंगलोर
शिक्षण
इंडिअन इंस्तीत्युत ऑफ अस्त्रोफिसिक्स
वर उल्लेखलेल्याप्रमाणे या संस्थेत अवकाश भौतिक या विषयातील पदवी पासून पी एच डी पर्यंत कोर्सेस शिकवले जातात.
इंटर युनिव्हरसीटी सेंटर ऑफ अस्त्रोफिसिक्स
गणेशखिंड, पुणे विद्यापीठ केम्पस, पुणे ४११००७
टाटा इंस्ती त्युत ऑफ फंडामेंटल रिसर्च
अस्त्रोनोमी आणि अस्त्रोफिसिक्स दिपार्तमेंट
डॉ होमिभाभा रोड, कुलाबा मुंबई
भारताला येणाऱ्या काळात अवकाश शास्त्रज्ञांची प्रचंड आवश्यकता भासणार आहे. तेंव्हा सज्ज व्हा, अंतराळात भरारी घेण्यासाठी!