



कंपनी सेक्रेटरी
कॉमर्स क्षेत्रात व्यवसायाच्या अनंत संधी उपलब्ध आहेत. मुळात व्यवसाय आणि उद्योग हे क्षेत्रच अनंत संधींचे आहे. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे कायदे. व्यवसाय सांभाळताना अनेक कायद्यांचे बडगे सुद्धा सांभाळावे लागतात. अर्थात, हे कायदे उद्योग अधिकाधिक पारदर्शक आणि स्वच्छ असावेत यासाठी आहेत. मात्र हे कायदे सांभाळताना वाय्व्सायीकांची त्रेधा तिरपिट उडते. त्यामुळे अशा व्यावसायिकांची गरज भासते ज्यांनी कायदा आणि विशेषतः व्यावसायिक कायद्यांमध्ये नैपुण्य प्राप्त केले आहे. इथेच जन्म होतो कंपनी सेक्रेटरी व्यवसायाचा.
सध्याच्या जगात उद्योग फार गुंतागुंतीचा आणि किचकट होतो आहे. विविध प्रकारचे कायदे आणि त्यांचे कडक नियम, आणि कायदे मोडल्यानंतर असणारी कडक कायदे सल्लागारांना फार महत्व प्राप्त होत आहे. कंपनी सेक्रेटरी हा व्यावसायिक कायद्यातील निष्णात असतो. कंपनी साठी लागणाऱ्या कायदेशीर नियमांचे पालन करण्याची जबाबदारी त्याची असते. त्यामुळे दिवसेंदिवस कंपनी सेक्रेटरींची गरज वाढणार आहे.
कोणत्या ंकंपन्यांना कंपनी सेक्रेटरी ठेवणे बंधनकारक आहे
कंपनी कायदा २०१३ नुसार ज्या कंपन्यांचे भाग भांडवल ५ कोटींहून अधिक असेल अशा सर्व कंपन्यांना आणि शेअर बाजारात नोंदणीकृत असणार्या सर्व कंपन्यांना पूर्ण वेळ कंपनी सेक्रेटरी ठेवणे गरजेचे आहे. हा कंपनी सेक्रेटरी काम्पी सेक्रेटरी इंस्तीत्युटचा सदस्य असणे गरजेचे असते.
कंपनी सेक्रेटरी कोर्स:
बारावीनंतर तीन टप्प्यात आणि पदवी नंतर दोन टप्प्यात हा कोर्स केला जातो. बारावीनंतर प्रवेश घेतल्यास कोर्स लौकर पूर्ण होतो.
बारावी नंतर कोर्सचे तीन टप्पे असतात. पदवी नंतर एक्झिक्युटिव ने सुरुवात करता येते.
१. फौंडेशन
२. एक्झिक्युटिव
मोड्यूल १
१. कंपनी कायदा
२. कोस्ट अकौन्तिंग
३. व्यावसायिक आणि आर्थिक कायदे
४. कर कायदा
मोड्यूल २:
१ कंपनी अकौंटस आणि ऑडिट
२ भांडवली बाजार आणि कायदे
३. उद्योग, कामगार आणि इतर कायदे
प्रोफेशनल
मोड्यूल १
१. प्रगत कंपनी कायदा
२. सेक्रेटरिअल ऑडिट
३. कोर्पोरेट रीस्त्रकचरिंग आणि इंसोल्व्हन्सी
मोड्यूल २:
१. माहिती तंत्रज्ञान
२. आर्थिक व्यवस्थापन
३. एथिक्स
मोड्यूल ३
१. प्रगत कर कायदा
२. ड्राफटिंग
३. कोणताही एक-
अ) बँकिंग कायदे
ब) भांडवली, वायदा आणि आर्थिक बाजार
क) इन्सुरन्स कायदे
ड ) बौद्धिक संपदा कायदा
इ) आंतरराष्ट्रीय व्यापार कायदे
कालावधी: साधारणतः संपूर्ण कोर्स करण्यासाठी तीन वर्षे लागतात. मात्र काठीण्यपातलीमुळे सर्व अभ्यासक्रम एकाच वेळेस पूर्ण करणे शक्य नसते. त्यामुळे एकाच वर्षासाठी एका पेक्षा अधिक वेळा बसणे भाग पडते. मात्र चिकाटीने अभ्यास करणे हा एकमेव मार्ग असतो. कारण हि व्यावसायिक परीक्षा आहे आणि त्यामुळे अपयश हा त्याचा एक अविभाज्य घटक असतो. त्याने खचून जाण्याची गरज नसते. किंबहुना खूप कमी असे विद्यार्थी असावेत जे सर्व परीक्षा एकाच प्रयत्नात यशस्वीपणे पार करू शकतात.
व्यावसायिक प्रशिक्षण: या अभ्यासक्रमात पंधरा महिन्यांचे व्यावसायिक प्रशिक्षण अनिर्वार्य असते. ते एखाद्या कंपनीत किंवा व्यावसायिक कंपनी सेक्रेटरीकडे करता येते.एक्झिक्युटिव पूर्ण झाल्यावर ते सुरु करता येते.
त्यांची यादी इंस्तीत्युत कडे उपलब्ध असते.
अंतिम परीक्षा पार केल्यावर आठ दिवसांचे एक प्रशिक्षण आणि पंधरा दिवसांचा एक प्रसिख्सन कार्यक्रम पूर्ण करावा लागतो. त्यानंतर इंस्तीत्युत कडे सदस्यत्वासाठी अर्ज करू शकतो. पहिल्या पाच वर्षांसाठी "असोसिएट" आणि नंतर "फेलो" सदस्यत्व मिळते.
नोकरीच्या संधी
वर नमूद केल्याप्रमाणे नोकरीच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत आणि त्या वाढत जाणार आहेत. कंपनी कायद्यातील एका बदलामुळे मध्यंतरी थोडेसे अनिश्चिततेचे सवत आले होते मात्र आता ते दुर झाले आहे.
अनेक कंपन्या मुख्य कंपनी सचिव बरोबर सहाय्यक सचिव सुद्धा ठेवतात. अनेक शासकीय कंपन्यांमध्ये तसेच एस बी आय सारख्या बँकांमध्ये सुद्धा कंपनी सेक्रेटरी पास केलेल्यांना विशेष अधिउकरि म्हणून नोकर्या मिळू लागल्या आहेत.
स्वयंरोजगाराच्या संधी
अनेक लहान कंपन्यांना पूर्णवेळ कंपनी सचिव ठेवणे जमत नाही. अशा वेळेस व्यावसायिक कंपनी सचिव (कंपनी सेक्रेटरी इन प्रेकटीस)त्यांच्या मदतीला येतात. कंपनी सचिव म्हणून स्वयाम्रोज्गाराच्याही खूप संधी आहेत, त्यासाठी सदस्यांनी वेगळा अर्ज इंस्तीत्युत कडे करायचा असतो. मात्र एकदा प्रेक्तीस चे सर्तीफिकेत आल्यानंतर नोकरी करता येत नाही.
जागतिक कोर्स:
भारतातील हा कोर्स केल्यानंतर दोन वर्षे अनुभव असलेल्या व्यक्तीस लंडन चा चार्टर्ड सेक्रेटरी हा प्रख्यात कोर्स केवळ दोन अधिक पेपर देऊन पूर्ण करता येतो. ते केल्यानंतर ८० देशांमध्ये कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करता येते.
संपर्क:
इंस्तीत्युत ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया
नवी दिल्ली
मुंबई
जॉली मेकर चेंबर, नरिमन पोइंत मुंबई
तेंव्हा सज्ज व्हा एका अतिशय प्रतिष्टीत करिअर साठी. आणि करा हे जग तुमच्या मुठीत!
सनदी लेखापाल( चार्टर्ड अकौन्टन्ट)
प्रत्येक व्यक्ती, संस्था, व्यवसाय, व्यावसायिक यांना स्वतःच्या आर्थिक व्यवहारांचा चोख हिशोब ठेवणे आवश्यक असते. त्यांच्या आर्थिक आरोग्यासाठी हे गरजेचे असते. यासाठीच एक तज्ज्ञ करिअरची निर्मिती करण्यात आली आहे. अतिशय प्रतिष्ठित आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न असे हे करिअर सनदी लेख्पाल, किंवा तुम्हा आम्हाला परिचित चार्टर्ड अकौन्टन्ट.
चार्टर्ड अकौन्टन्ट चे काम काय?
चार्टर्ड अकौन्टन्ट हा हिशोब किंवा लेखापाल विभागातील तज्ज्ञ असतो.सर्व प्रकारच्या अकौंउट चे त्याला ज्ञान असते. त्यामुळे किचकट हिशोब ठेवण्याचे काम त्याला जमते. तसेच तो करविषयक तज्ज्ञ असतो. आपल्या देशात करांचे एक मोठे जाळे आहे. त्यात व्यक्तिगत उत्पन्न कर हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. परंतु, त्याचबरोबर, सेवा कर, मुल्यवर्धित कर, उत्पादन कर असे व्यवसायाशी संबंधित अनेक कर लागू होतात. या सर्व करांचे नियम इतके क्लिष्ट आहेत कि त्यासाठी एका तज्ज्ञाची गरज लागतेच. त्यामुळे साधारणतः उद्योजक हे काम स्वतःच्या अंगावर न घेत सनदी लेखापालाची मदत घेणे इष्ट समजतो.
माणूस जसा जसा उत्पन्नाच्या पातळीवर जातो तशी तशी त्याची आर्थिक घडी किचकट होते. त्यामुळे अशा वेळेस सनदी लेखापालाचे काम अधिक निकडीचे होते.
त्यामुळे ह्या कामाचे आपन खालील प्रमाणे विभाजन करू शकतो:
१. लेखे ठेवणे
अनेक कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी सनदी लेखापालांना उपलब्ध असतात. कंपनीच्या लेख्यांची संपूर्ण जबाबदारी सनदी लेखापालावर असते. स्वयंरोजगार कार्नाराल्यासुद्धा हे काम मिळते.
२. लेखापरीक्षण
सनदी लेखापालाचे मुख्य काम लेखापरीक्षण (ऑडिट) हे असते. स्वयंरोजगार असेल ऑडिट ची कामे सनदी लेखापाल घेतात. कंपनी कायद्याप्रमाणे ऑडिटर नेमणे कंपनीला बंधनकारक असते. यात सर्व प्रकारच्या आणि आकाराच्या कंपन्यांना सनदी लेखापाल नेमणे गरजेचे असते.
३. कर
अगोदर उल्लेखल्या प्रमाणे करविषयक सल्ला फार महत्वाचा भाग आहे. काही सनदी लेखापाल फक्त याच विषयात तज्ज्ञ असतात. भारतात अनेक प्रकारचे कर आणि त्याचे कायदे आहेत. त्यामुळे लेखापालांना उत्तम व्यवसाय तसेच नोकरीतही उत्तम संधी उपलब्ध होतात.
यात उत्तम अनुभव घेतल्यानंतर करविषयक कायदेशीर केसेस सनदी लेखापाल हाती घेऊ शकतो. यात उत्तम पैसा आहे.
४. विदेशी चलन
विदेशी चलनाच्या बाबतीत भारतातील कायदा (फेमा) अतिशय कडक आहे. त्यामुळे त्याचे काटेकोर पालन केले गेले नाही तर फार मोठी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सनदी लेखापालानाहि फार चांगली संधी उपलब्ध झाली आहे. केवळ याच विषयात व्यवसाय करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.
शिक्षण
संधीप्रमाणे या विषयातील शिक्षणही कठीण आहे. भारतातील कठीण परीक्षातील एक म्हणून या परीक्षेचा समावेश होतो.
सिएस सारखेच बारावी नंतर आणि पदवी नंतर असे दोन प्रकार यात आहेत.
बारावी नंतर सिपिटी हि प्रवेश परीक्षा द्यावी लागते. पदवीनंतर ती द्यावी लागत नाही. त्यानंतर इंटरमिजिएत (आयपीसीसी) आणि फायनल असे दन टप्पे असतात. सिपिटी बरोबर आठ महिन्यांचे आणि इंटरमिजिएट नंतर फायनल परीक्षा देण्याअगोदर प्रेक्टीसिंग चार्टर्ड अकौन्तंत कडे तीन वर्षांचे व्यावसायिक प्रशिक्षण घ्यावे लागते.
इंटरमिजिएत (आयपीसीसी)
ग्रुप १:
१. अकॊउन्त्स
२. व्यावसायिक कायदा, एथिक्स आणि कम्युनिकेशन
३. कोस्ट अकोउन्त आणि आर्थिक व्यवस्थापन
४. कर
ग्रुप २:
५. प्रगत अकॊउन्त्स
६. ऑडिट
७. माहिती तंत्रज्ञान आणि स्ट्रेटेजीक व्यवस्थापन
फायनल:
ग्रुप १:
१. फायनन्शिअल रिपोर्टिंग
२. स्ट्रेटेजीक आर्थिक व्यवस्थापन
३. प्रगत ऑडिटिंग आणि व्यावसायिक एथिक्स
४. व्यावसायिक व इतर कायदे
ग्रुप २.
५. प्रगत व्यवस्थापकीय अकोउन्तिङ्ग
६. इन्फोर्मेशन सिस्टीम कंट्रोल आणि ऑडिट
७. डायरेक्ट कर कायदा
८. इनडायरेक्ट कर कायदा
संधी
भारतातील बदलते अर्थकारण, क्लिष्ट होत जाणारे आर्थिक कायदे आणि कर व्यवस्था, गुंताव्निकीसाठी परदेशी कंपन्यांचा वाढणारा ओढा आणि एकंदरीत भारतातील वाढते उद्योजकीय वातावरण यामुळे चार्टर्ड अकौंटन्ट व्यवसायाला मरण नाही हे नक्की. उलट एखाद्या विशिष्ट विषयात अधिक तज्ज्ञ होऊन आपण भरभराटीचे दरवाजे अजून उघडू शकतो.
तेंव्हा सीए च्या तयारीला लागा!
कोस्ट अकौन्टन्ट
व्यापार म्हटला कि खर्च येतोच. खर्चाचा उत्पन्नाशी ताळमेळ न बसल्याने भल्याभल्या उद्योग्धन्द्यांची भंबेरी उडते. त्यामुळे उद्योगांना खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यकअसत. या बाबतीत मदत करतात कोस्ट अकौन्टन्ट.
सी एस, सी ए प्रमाणे सी डब्ल्यू ए हा वाय्वासायिक असतो ज्याचे सपेशलायझेशन खर्च लेख हे असते.
इंस्तीत्युत ऑफ कॉस्त अकौन्तन्त ऑफ इंडिया हि केंद्र प्रशासित संस्था हा कोर्स घेते.
सी एस, सी ए प्रमाणे बारावी नंतर तीन वर्षांचा आणि पदवी नंतर वर्षांचा हा कोर्स आहे .
स्वरूप
इंटरमिजिएट
ग्रुप १
१. फ़िनन्शिअल अकओन्तिंग
२. कायदा
३ डायरेक्ट कर कायदा
४. कोस्त अकोउन्तिङ्ग
ग्रुप २
१. ऑपरेशन व्यवस्थापन
२. कोस्त व्यवस्थापकीय अकोउन्तिङ्ग
३. इन डायरेक्ट कर
४. कंपनी अकोउन्त्स
फायनल
कोस्त अकोउन्तिङ्ग
प्रगत फ़य्नन्शिअल व्यवस्थापन
स्त्रेताजिक व्यवस्थापन
कर व्यवस्थापन
पर्फोर्मंस व्यवस्थापन
फ़य्नन्शिअल रेपोर्तिंग
कोस्त ऑडिट
फ़य्नन्शिअल अनालिसिस
संधी
एकंदरीत व्यवस्थापनाला निर्णय करणारे हे क्षेत्र आहे . त्यामुळे प्रत्येक कंपनीला असतेच, विशेषतः उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना कोस्त लेखाकारांची आवश्यकता असते. त्यामुळे कंपनीच्या लेख विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
स्वयाम्रोज्गारामध्येही पुष्कळ संधी आहेत. नवीन कंपनी कायद्याप्रमाणे इंटरनल ऑडिटर नेमणे बंधनकारक आहे. त्यामुळे या संधी वाढल्या आहेत.
तर मग उद्योगांना खर्च कमी करण्यास मदत करणाऱ्या या करिअर करा