top of page

दहावी नंतरची करिअर क्षेत्रे

 

 

 

दहावी अतिशय महत्वाचे वर्ष. त्यंच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष. आता तुम्हाला महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या करिअरची दिशा ठरवायची आहे. कदाचित तुम्ही ती ठरवली असेल, किंवा तुम्ही खूप गोंधळलेले असाल. जर तुमचा गोंधळ अजूनही असेल तर तुम्हाला मदत करण्यासाठी हा लेख. तुम्ही तुमचे करिअर ठरवलेले असेल तरी ते का याची चाचपणी सुद्धा तुम्ही करा.

करिअर कसे निवडावे:
दहावी नंतरच्या विविध पर्यायांचा विचार करण्यापूर्वी तुम्ही तुमचे करिअर कसे निवडावे याचे काही ठोकताळे आहेत, ते आपण पाहू.

१.आवड: तुमच्या निर्णयाचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तुमची आवड. तुम्हाला काय आवडते किंवा काय व्हावेसे वाटते? काहींना लहानपणापासून काही विशिष्ट करिअरने झपाटलेले असते. मला लहानपणासून क्रिकेटर व्हावेसे वाटे, अर्थात त्याचे कारण सचिन तेंडूलकर. मी त्यासाठी क्रिकेट कोचिंग ला प्रवेश सुद्धा घेतला होता. पुढे मला असे वाटले, कि वाचन आणि अभ्यास हा माझा आवडीचा भाग आहे. आणि क्रिकेट मागे पडले. तसे काही तुमच्या बाबतीत आहे का? अनेकदा तुमचा छंद हेच तुमचे करिअर होते. आणि तेच अधिक योग्य आहे. असे म्हणतात, कि करिअर असे असावे जे तुम्हाला आवडते. बर्याच माणसांच्या बाबतीत हे घडते, कि चाकोरीबद्ध  जगताना ते पैसे तर कमावतात पण आयुष्याला त्यांच्या काही अर्थ उरत नाही. फक्त जगरहाटी आहे म्हणून नोकरी व्यवसाय करतात. त्यामुळे हे लोक खुश नसतात. सुखी नसतात.
तुमच्या आवडीच्या गोष्टी काय आहेत हे पहा. म्हणजे खेळ- त्यात अनेक प्रकार, नाटक कला, चित्र किंवा दुसरे छंद, अभ्यास- त्यातही इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान- अगदी विज्ञानातही धुमकेतू, अंतराळ, ग्रह किंवा माणसाच्या शरीराची रचना या सगळ्या गोष्टी तुमचे करिअर काय असावे याचे द्योतक आहे. कारण तुमची आवड हेच तुमचे करिअर झाले तर तुम्ही सुखी होणार आहात.

 

व्यावहारिकता: दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे करिअर व्यावहारिक आहे का? व्यावहारिक चा अर्थ ते करिअर तुम्हाला जमणार आहे का आणि दुसरे म्हणजे आर्थिक दृष्ट्या ते किती योग्य आहे. याचा अर्थ हा नव्हे कि प्रत्येक करिअरचा निर्णय किती पैसे मिळतील हेपाहुनच करावा, नाहीतर सगळेच डॉक्टर होतील. पण तुमच्या आवडीला बाजारात किती मागणी आहे हेही पाहणे गरजेचे असते. अन्यथा, नंतर ते डोईजड जाते, उदाहर्नार्थ तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर तुम्ही त्यातच करिअर करू शकता, मात्र तुम्हाला हे समजणे आवश्यक आहे कि यात तुम्हाला कमी पैसे मिळतील.जर तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसेल तर मेडिकल सारख्या महागड्या पर्यायांचा विचार करणे सयुक्तिक नाही. तसेच तुम्हाला तुमच्या शारीरिक क्षमतांचा विचार करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला जहाजावर काम करायचे असेल तर महिनोन्महिने तुम्हाला घरापासून दूर राहायचे आहे ह्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. तुम्हाला सैन्यात जायचे असेल तर बर्याच गोष्टींचे त्याग तुम्हाला केले पाहिजेत.
 

उद्दिष्ट्य: तुमचे आयुष्याकडून उद्दिष्ट्य काय याच्यावरही तुमचा करिअरचा निर्णय अवलंबून आहे. उदाहरणार्थ पैसा हे तुमचे उद्दिष्ट्य असेल तर तुम्हाला लवकर करिअर करणाऱ्या आणि अप्लावधीत जास्त पगाराची नोकरी देणाऱ्या करिअरचा विचार करवा लागेल. उदाहरनार्थ इञ्जिनिअरिङ्ग, एमबीए. तुम्हाला आयुष्य उपभोगायला आवडत असेल तर पर्यटनासारखे करिअर नाही. तुम्हाला समाजासाठी वेळ द्यायचा असेल तर पत्रकारिता आणि सोशल वर्क पेक्षा वेगळे तुम्ही विचार करता उपयोग नाही. तुम्हाला व्यक्त होणे आवडत असेल किंवा संवाद साधे आवडत असेल तर तुम्ही पब्लिक रिलेशन अर्थात जनसंपर्क तुमचे करिअर म्हणून निवडा.
 

नाविन्य: तुमची नाविन्याची हौस किती आहे यावरही तुमचा करिअरचा निर्णय अवलंबून असतो.

इतर करतात त्यापेक्षा नवीन, नाविन्यपूर्ण करिअरचा विचार तुम्ही करत असाल तर नेनो तंत्रज्ञान, बायो तंत्रज्ञान, पुरातत्वशास्त्र हे करिअरचे पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत.

पालक: बर्याचदा पालक आपली आवड मुलांवर लादतात. तुमच्या बाबतीत असे होत असेल तर तुम्हाला हे पालकांना पटवून देणे गरजेचे आहे कि तुमच्या करिअर मध्ये काय वेगळे आहे. मुळात तुम्हाला तेच करिअर का करायचे आहे या बाबतीत तुम्ही स्वत: ठोस विचार करणे गरजेचे आहे.

आता तुम्हाला जे करिअर निवडायचे आहे त्याची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यासाठी वर्तमानपत्रात येणारी कात्रणे, इंटरनेट वरील माहिती, करिअर काय आहे, शिक्षण काय आणि कुठे, सर्वोच्च शिक्षण काय, विविध नोकरीच्या/व्यवसायाच्या संधी काय ह्याचा विचार करणे गरजेचे आहे.
 

अप्तीत्युड टेस्ट

बरेच विद्यार्थी आपली आवड, कल समजण्यासाठी चाचणी करतात. त्यानंतर तुमच्या बुद्ध्यान्काप्रमाणे योग्य निर्णय घेणे तुम्हाला जमते. अशा अनेक संस्था, मानसतज्ज्ञ उपलब्ध आहेत. अनेक शाळा सुद्धा हि सेवा पुरवतात. तुम्हाला योग्य वाटत असेल तर अशी टेस्ट तुम्ही  शकता.

मात्र वर नमूद केल्याप्रमाणे तुमचे निर्णय तुमच्या बुद्ध्यांकावर अवलंबून असतीलच असे नाही. याबरोबर तुमची आवड तुमचे करिअर ठरवण्याच्या कामात अधिक हातभार लावते.

 

बारावीनंतर दिशा ठरवताना काय पाहावे! 

बारावी हा आपल्या आयुष्यातील मधला टप्पा. यानंतर पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांना निवडायचे, नोकरी निवडायची, डिप्लोमा करायचा कि इंजिनीरिंग अशा अनेक संभ्रमात विद्यार्थी येउन उभा ठाकतो. या वळणावर त्याला पदवीनंतर काय संधी आहेत, नोकरी स्वयंरोजगार याची माहिती असणे आवश्यक आहे.त्यामुळे नक्की काय केले असता, आपल्याला मनाजोगे करिअर निवडता येईल याची जाणीव याच टप्प्यावर असणे गरजेचे आहे.तुम्ही पुढील करिअर कसे निवडल?१.आवड: सर्वात प्रथम पहिली पाहिजे तुमची आवड. आणि हि तुमची तुम्हाला कळू शकते. तुम्हाला गाड्यांच्या आणि इलेक्त्रीकाल वस्तूंच्या भागांशी खेळायला आवडत असेल इथपासून ते अगदी लहान पाणी खेळलेल्या "शिक्षकाच्या" खेळापर्यंत तुमची आवड तुमच्या करिअरची दिशा समजावू शकेल.उदाहरणार्थ दुर्वेश ला टिव्ही वरील फिल्म्स बघण्याचा शौक आहे. आता हा  तो व्यर्थ आहे असे तुमचे म्हणणे असेल. पण थांबा. त्याला फिल्म मधील प्रत्येक सीनचे शुटींग कसे केले आहे, मागे स्थळ काय आहे, रंग संगती काय आहे आणि दृश्य कुठून कसे चित्रित केले आहे हे पाहायला आवडते, किंवा त्याचा अभ्यास करायला आवडतो. इथेच त्याच्या संभाव्य करिअरचे मुळ आहे. त्याला चित्रपटांचा आर्ट डायरेक्टर होणे योग्य आहे. त्यामुळे त्याने मास मिडिया मध्ये प्रवेश घेतला पाहिजे हे उघड आहे.लतिकाला एखादा लोग बघून त्यातून अर्थ काय प्रतीत होतो हे पाहणे अभ्यासणे आवडते. तिचे करिअर आहे ब्रान्डींग या क्षेत्रात किंवा जाहिरात क्षेत्रात. 

 

वेळ: सर्वात अगोदर पाहावे लागेल तुमच्याकडे वेळ किती आहे? आर्थिक कारणांमुळे, घरच्या कारणामुळे जर तुमच्याकडे शिक्षणासाठी योग्य वेळ नसेल तर उपलब्ध पर्यायांमधून आणि तुमच्या आवडीप्रमाणे एखादा कोर्स करून तुमचे करिअर तुम्हाला सुरु करावे लागेल. त्यानंतर नोकरी सांभाळता सांभाळता दूरस्थ पद्धतीने शिक्षण पूर्ण करता येईल. अर्थात तुमचे करिअर सिए सिएस असे असेल किंवा इञ्जिनिअरिङ्ग असेल तर तुम्हाला तेवढा वेळ द्यावाच लागेल.
 

उद्दिष्ट्य: तुमचे आयुष्याकडून उद्दिष्ट्य काय याच्यावरही तुमचा करिअरचा निर्णय अवलंबून आहे. उदाहरणार्थ पैसा हे तुमचे उद्दिष्ट्य असेल तर तुम्हाला लवकर करिअर करणाऱ्या आणि अप्लावधीत जास्त पगाराची नोकरी देणाऱ्या करिअरचा विचार करवा लागेल. उदाहरनार्थ इञ्जिनिअरिङ्ग, एमबीए. तुम्हाला आयुष्य उपभोगायला आवडत असेल तर पर्यटनासारखे करिअर नाही. तुम्हाला समाजासाठी वेळ द्यायचा असेल तर पत्रकारिता आणि सोशल वर्क पेक्षा वेगळे तुम्ही विचार करता उपयोग नाही. तुम्हाला व्यक्त होणे आवडत असेल किंवा संवाद साधे आवडत असेल तर तुम्ही पब्लिक रिलेशन अर्थात जनसंपर्क तुमचे करिअर म्हणून निवडा.
 

नाविन्य: तुमची नाविन्याची हौस किती आहे यावरही तुमचा करिअरचा निर्णय अवलंबून असतो.

अनंत फांदी म्हणतात तास "धोपट मार्गा सोडू नको" असा तुमचा विचार असेल तर पाठ्दिमधील करिअर तुम्ही निवडावे. किंवा नाविन्यपूर्ण करिअरचा विचार करावा. उदाहरणार्थ नेनो तंत्रज्ञान, बायो तंत्रज्ञान, पुरातत्वशास्त्र हे करिअरचे पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत.
 

आता दहावी नंतर काय काय पर्याय उपलब्ध आहेत याचा आपण विचार करू.

साधारणतः तीन मुल पर्याय तुम्हाला उपलब्ध असतात. आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स. तुम्हाला इञ्जिनिअरिङ्ग करायचे असेल तर बारावी सायन्स न करता, दहावी नंतर डिप्लोमा करून इञ्जिनिअरिङ्ग करणे अधिक योग्य असते हे समजून घ्या. बर्याचदा बारावी नंतर सीईटी देऊन मुले इञ्जिनिअरिङ्ग ला जातात. त्यात तुमच्या समोरची स्पर्धा वाढते. त्यापेक्षा डिप्लोमा हा योग्य पर्याय असतो.
 

आर्ट्स: कला शाखा हि नाविन्याची शाखा आहे. माणसांच्या मनाशी, माणुसकीशी, त्यांची जडणघडण त्यांचे विचार यांच्याशी जवळीक साधणारी हि शाखा आहे. तुम्ही आर्ट्स कोलेज मध्ये प्रवेश घेऊन बारावी आणि त्यानंतर विशिष्ठ विषयात पदवी, पदव्युत्तर आणि पी एच डी असा साधारण प्रवास करता.
 

आर्ट्स मधील विविध शाखांचा आपण विचार करू:

इतिहास: माणसाल आपल्या इतिहासाची उत्सुकता असते. माणसाचा इतिहास हा अतिशय रंजक्तापूर्ण आणि अनेक न उलगडलेल्या घटनांनी भरलेला आहे. त्यामुळे इतिहास या क्षेत्रात एक अतिशय रंजक आणि आव्हानात्मक करिअर लपले आहे. विविध पुराव्यांच्या आधारे इतिहास शोधणार्यांसाठी पुरातत्व हे अजून एक करिअर आहे. तसेच म्युझीअम मध्ये वस्तूंचे संगोपन कसे करावे हे शिकवणारे म्युझीओलोजी हे अजून एक चांगले करिअर आहे.

यासाठी पदवी इतिहासात करून पदव्युत्तर पदवी करता येईल. त्यानंतर नेट-सेट करून किंवा पी एच डि करून प्राध्यापक-संशोधक होता येते किंवा शासकीय संस्थांमध्ये काम करता येते.
 

अर्थशास्त्र: अर्थशास्त्र हे माणसे, व्यापार आणि देशाच्या अर्थव्यवस्थेशी संधान असलेले एक अतिशय आव्हानात्मक क्षेत्र आहे. अर्थशास्त्रात खूप मोठ्या संधी उपलब्ध असतात. पदव्युत्तर पदवी नंतर प्राध्यापक संशोधक होण्याबरोबरच भारतीय अर्थ व सांख्य सेवेत जाऊन देशाच्या सेवेत जाता येते.
 

मानस शास्त्र: माणसाच्या मनाशी संबंध असणारे हे क्षेत्र. यात अनेक उपशाखा आहेत आणि यात करिअरची मोठी संधी उपलब्ध आहे.जर तुम्हाला दुसर्याला समजून घेणे, त्याच्या भावनांना जपणे आवडत असेल तर हे क्षेत्र तुमचे आहे.
 

राज्यशास्त्र: देशाच्या राज्य्कार्नाशी संबंध असलेले हे फार मोठे क्षेत्र आहे. यात सुद्धा करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. अनेक कॉलेजेस मध्ये प्राध्यापक म्हणून करिअर करता येते, याशिवाय अनेक राष्ट्रीय आणि अंतर राष्ट्रीय संस्थांमध्ये संशोधन करता येते.
 

कॉमर्स: व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित हि शाखा आहे.

अकाउनट: कॉमर्स मधील मोठे क्षेत्र म्हणजे अकौंट. विविध व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक संस्थांना आपल्या उत्पन्न- खर्चाचा ताळेबंद ठेवावा लागतो. यासाठी अकौंटन्ट ची गरज असते.

कॉमर्स मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी करून हे क्षेत्र करिअर म्हणून निवडता येते. यात अधिक पुढे जायचे असेल चार्टर्ड अकौंटन्ट हा कोर्स करता येतो.
 

व्यावसायिक परीक्षा: बारावी नंतर सीए प्रमाणे कंपनी कायद्यातील आणि इतर व्यावसायिक कायद्यातील अभ्यासासाठी सीएस  हा कोर्स उपलब्ध होतो. तीन वर्षे अभ्यास आणि दीड वर्षे  ट्रेनिंग असे कोर्स चे स्वरूप असते. दोन्ही कोर्सेससाठी इंस्तीत्युत असून त्या चर्चगेट ला आहेत.
 

व्यवस्थापन

व्यवसाय व्यवस्थापन हे फार मोठे क्षेत्र पदवी नंतर करता येते. बारावी नंतर बीएमएस हा कोर्स करून नंतर एमबीए करता येते. यात सुद्धा सर्वसाधारण व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन अश अनेक शाखा उपलब्ध आहेत.
 

विज्ञान

विज्ञान हे क्षेत्र फार विस्तीर्ण आहेच पण प्रत्येक उपशाखांमध्ये सुद्धा अनेक क्षेत्रे आहेत.

फिसिक्स, केमिस्ट्री आणि बायोलोजी हि तीन महत्वाची क्षेत्रे आहेत. बारावीमध्ये तुम्हाला जे क्षेत्र आवडते त्या क्षेत्रात पुढे करिअर करता येईल.

विशेष क्षेत्रे:

१. नानो तंत्रज्ञान: एका अनुचे अनेक भागात विभाजन करून त्याचे परिणाम शोधण्याचे क्षेत्र म्हणजे नेनो तंत्रज्ञान. हे क्षेत्र येणाऱ्या काळात विस्तारणार आहे.

२. अंतराळशास्त्र:  आपल्या देशाने अंतराळ शास्त्रात फार मोठी प्रगती केली आहे.नुकतेच चांद्रयान आणि मंगलयान पाठवून आपण विकसित देशांपेक्षा कमी नाही हे आपण दाखवून दिले आहे . त्यामुळे या क्षेत्रात फार मोठी संधी आहे. विक्रम साराभाई अंतराळ संशोधन, आयुका या भारतीय आणि नासा सारख्या आंतर राष्ट्रीय संस्थांमध्ये काम करता येईल.

३. बायोटेकनोलोजी: बायोलोजी आणि तंत्रज्ञान याचा समेळ होऊन बायो तंत्रज्ञान विकसित झाले आहे. हे क्षेत्र सुद्धा येणाऱ्या काळात फार मोठे होईल.
 

इञ्जिनिअरिङ्ग:

इञ्जिनिअरिङ्ग जरी बारावी नंतर करता येणार असले तरी, जर तुमचे नक्की असेल तर बारावी विज्ञान न करता वर नमूद केल्याप्रमाणे डिप्लोमा करणे अधिक योग्य आहे.
 

प्रवेश परीक्षा:

मेडिकल, इञ्जिनिअरिङ्ग, हॉटेल मेनेज्मेंत या क्षेत्रात प्रावेश घ्यायचा असेल तर महाराष्ट्र राज्य शासनाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे असते. या परीक्षेची तयारी बारावी बरोबरच करावि लागते. त्यामुळे तुम्ही या क्षेत्रात जाण्याचा विचार करीत असाल तर प्रवेश परीक्षेची सुद्धा माहिती काढून घ्या.
 

तर मग तुमच्या समोर आता आयुष्याचा महासागर उभा राहणार आहे. त्याची तयारी सुदू होऊ दे आणि मग या अथांग सागरात मनसोक्त डुम्ब्ण्यासाठी  सज्ज व्हा!

 

बारावी नंतर काय?

 

 

 

बारावीचा निकाल-अतिशय महत्वाचा दिवस.  यश, अपेक्षाभंग आणि अपयश!

 

वास्तविक,  कॉमर्स विज्ञान आणि आर्ट्स

विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेनंतरही पदवी परीक्षा देत आले असल्याने, इञ्जिनिअरिङ्ग, हॉटेल मेनेजमेंट, मेडिकल साठी  परीक्षांना  आल्याने बारावीच्या मार्काचे महत्व थोडे  कमी झाले आहे . मात्र , अनेक विद्यार्थ्यांना बारावीनंतर  आपले करिअर बदलावेसे वाटते. दुसरीकडे प्रवेश परीक्षा असल्या तरीही मूळ परीक्षेचे स्थान बारावीचे वादातीत आहे. 

बर्याच क्षेत्रामध्ये अनेक उपशाखा बारावीनंतर खुल्या होतात. त्यामुळे बारावीनंतर विद्यार्थाना योग्य दिशा निवडावी लागते. अगदी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सुद्धा पुढे काय करायचेय ठाऊक नसते. 

 

आता आपण काही ठळक अशा विविध पर्यायांचा विचार करू.
 

प्रशासकीय सेवा 

केंद्र शासन आणि राज्य शासन प्रशासकीय सेवांसाठी परीक्षा घेऊन निवड करते.अनुक्रमे युपीएससी आणि एमपीएससी ह्या परीक्षा घेते. या परीक्षांसाठी किमान पदवी हि पात्रता असते. अतिशय प्रतिष्ठित आणि जबाबदारीचे असे सक्षम करिअर प्रशासकीय सेवा आपल्याला देते. या परीक्षांना प्रुव आणि मुख्य अशा दोन लेखी आणि नंतर मुलाखत असे स्वरूप असते. परीक्षेची काठीण्य पातळी जास्त असते अन म्हणून अतिशय कठोर परिश्रमांची गरज असते.
 

मराठी मुले या परीक्षांना (विशेषतः युपीएससी) बसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज केंद्रात तोकडा पडतो. यासाठी प्रशासकीय सेवांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. देशाच्या आणि राज्याच्या निर्णय प्रक्रियेत तुम्हाला येणे आवडत असेल तर प्रशासकीय सेवा हे उत्तम दालन तुमच्यासाठी उघडू शकते.
 

बारावीनंतर याचा अभ्यास करणे सुरु करावे. रोज एक उत्तम मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्र वाचावे. एखादा उत्तम क्लास करू शकलात तर अधिक चांगले आहे कारण तिथे जाणकार तुम्हाला मार्गदर्शन करतात. मात्र, तीन वर्ष कसून अभ्यास करा. बरेच विद्यार्थी पदवीनंतर या परीक्षांचा विचार करतात. बाकी सगळे सांभाळून अभ्यास करू असा विचार करतात. ते शक्य नाही. तुम्ह्च्याकडे उत्तम वेळ आहे. तुम्ही आत्ताच प्रयत्न सुरु करा, जेणेकरून तुमचा नंतरचा मौल्यवान वेळ वाचेल.
 

विशिष्ट क्षेत्रातील प्रशासकीय सेवा:

याव्यतिरिक्त विशिष्ट क्षेत्रासाठी प्रशासकीय सेवा घेतल्या जातात. जसे इञ्जिनिअरिङ्ग सेवा, अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र सेवा, मेडिकल सेवा, कृषी सेवा. त्या त्या क्षेत्रातील पदवी नंतर ह्या सेवांच्या परीक्षा दिल्या जाऊ शकतात. परीक्षेचे स्वरूप वरीलप्रमाणेच असते मात्र प्रश्न त्या क्षेत्रातील पदवी पातळीचे असतात. या सेवांमध्ये जाऊनसुद्धा उच्चपदस्थ प्रशासकीय पदे मिळू शकतात.
 

सैन्य भरती:

सैन्य हे आपल्या संरक्षणाचे मध्यम आहे. महाराष्ट्र हा नेहमीच देशाच्या रक्षणासाठी  पुढे राहिला आहे. आपल्या सैन्यात मराठा बटालिअन नावाची एक वेगळी बटालिअन सुद्धा आहे. मात्र मराठी मुलांचे या क्षेत्रात प्रमाण नगण्य आहे.
 

प्रत्यक्ष फिल्ड (लढाई) वर  शिपायांची भरती आठवी पास विद्यार्थ्यांना सुरु होते. बारावी नंतर राष्ट्रीय सुरक्षा अकादमीत प्रवेश मिळतो. जानेवरी आणि जुलै अशा दोन सत्रात प्रवेश होतात. सैन्यात जाण्यासठी बारावी नंतर तर नौदल आणि वायुदलात जाण्यासाठी विज्ञानातील बारावी गरजेची असते. तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षनानातर सैन्यादालासाठी आयएमए चे एका वर्षाचे प्रशिक्षण तर नौदल आणि वायुदालासाठी त्या त्या प्रशिक्षण संस्थांमध्ये अनुक्रमे एक व दीड वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. यानंतर ऑफिसर पदावर नेमणूक होते आणि पुढे एक प्रतिष्टीत आणि अभिमानास्पद करिअर तुमची वाट पाहत उभे असते.
 

पोलिस भरती:

 पोलिस भरती तीन स्तरांवर होते. आपण सध्या बारावी नंतरचा विचार करू. राज्य स्तरावर पोलिस उप निरीक्षक आणि निरीक्षक पदासाठी एमपीएससी परीक्षा घेतली जाते. सदर परीक्षा पदवी नंतर देत येते. स्वरूप वर नमूद केल्या प्रमाणे असते. केंद्र स्तरावर प्रशासकीय सेवा परीक्षा देऊन आयपीएस निवडले असता पोलिस क्षेत्रात उच्च पदावर जाता येते.

 

बारावी नंतरचे तात्रिक शिक्षण

वास्तविक तांत्रिक क्षेत्रात जाण्यासाठी दहावी नंतर डिप्लोमा करणे अधिक सयुक्तिक आहे. मात्र दुर्दैवाने तुमची निवड चुकली असेल तर बारावीनंतर डिप्लोमा करून तुम्ही नोकरी सुरु करू शकता. किंवा त्यानंतर इञ्जिनिअरिङ्ग निवडू शकता.
 

डिप्लोमा किंवा आयटीआय

जर आर्थिक कारणांमुळे किंव इतर पुढील शिक्षण घेणे शक्य नसेल तर दोन वर्षांचा आयटीआय किंवा तीन वर्षांचा इञ्जिनिअरिङ्ग डिप्लोमा हा एक उत्तम पर्याय आहे. डिप्लोमा नंतर शासकीय संस्था, आस्थापने आणि खासगी कंपन्यांमध्ये अनेक संधी उपलब्ध होतात. रेल्वे आणि अनेक केंद्र शासकीय अस्थापान्नमधील संधील मराठी मुले घेत नाहीत. वास्तविक उत्तम करिअर आणि पैसा या नोकर्यांमध्ये मिळू शकतो तसेच अनुभावापरत्वे पुढे बढती मिळू शकतात.

 

कायदा

एका सुविद्य समाजाला उत्तम कायदा व्यवस्थेची आवश्यता असते. भारतासारख्या समंजस लोकशाहीत उत्तम कायदा व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे कायदा या विषयात चांगले करिअर करता येते.

कायद्यासाठी बारावी नंतर पाच वर्षे किंवा पदवी नंतर तीन वर्षांचा कोर्स आहे. बारावी नंतरचा अभ्यासक्रम अधिक दीर्घ आणि उत्तम मानला जातो. बर्याच ठिकाणी पाच वर्षांच्या अभ्यासक्रमात बी ए-एल एल बी अशा दोन पदव्या मिळतात.

संपर्क: गव्हर्मेन्ट कायदा कोलेज, चर्चगेट 

         न्यू लो कोलेज, माटुंगा

         सिद्धार्थ कायदा कोलेज, चर्चगेट

         रिझवी कायदा कोलेज, बांद्रा, मुंबई

         महात्मा गांधी कोलेज, बेलापूर

या पदवी बरोबर लेबर कायदा, बौद्धिक संपदा, कर कायदा, बँक कायदा, फायनान्स, सायबर कायदा असे अल्प मुदतीचे दूरस्थ शिक्षणाचे कोर्सेस पूर्ण करावेत.
 

गुंतवणूक सल्लागार

सर्टिफाईड फायनन्शिअल प्लेनर

आपल्या देशातील अर्थव्यवस्था, गुंतवणूक व्यवस्था आणि आर्थिक व्यवहार वाढत आहेत. सामान्य लोकांकडे अधिक पैसा येत आहे आणि त्यांची गुंतवणुकीबद्दलची आस्था आणि सजगता वाढत आहे.
 

अशा वेळेस गुंतवणूक सल्लागाराची गरज वाढत आहे, यासाठी एफपीएसबी या शासकीय संस्थेने सी एफ पी हा अभ्यासक्रम सुरु केला आहेय़त गुंतवणुकीच्या विविध माध्यमचे प्रशिक्षण दिले जाते. सर्व अभ्यासक्रम झाल्यावर सी एफ पी हि व्यावसायिक पदवी मिळते.
 

सी एफ पी हे स्वयंरोजगारासाठी एक उत्तम साधन आहे.
 

सिए/सिएस/आयसीडब्ल्यूए
कॉमर्स मधील विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर हे तीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अकोउन्त्स्मध्ये करिअर करायचे असेल तर चार्टर्ड अकौंटन्ट आणि कॉस्ट अकौंटन्ट हे दोन कोर्सेस आणि कंपनी कायद्यातील प्राविण्यासाठी कंपनी सेक्रेटरी हा कोर्स उपलब्ध आहे . बारावी नंतर साधारण पाच वर्षांमध्ये हे कोर्सेस पूर्ण करता येतात.

या कोर्सेस नंतर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात.

 

संपर्क:

सिए इंस्तीत्युत : कफ परेड, मुंबई

सिएस इंस्तीत्युत: नरिमन पोईंट, मुंबई
कॉस्ट अकौंटन्ट इंस्तीत्युत: फोर्ट, मुंबई

 

विज्ञान तंत्रज्ञान:

विज्ञानात विविध विषयात बी एस्सी आणि नंतर एम एस्सी कोर्सेस उपलब्ध आहेत. मुंबईच्या विविध कोलेजेस्मध्ये हे कोर्सेस शिकवले जातात.

मात्र याव्यतिरिक्त बर्याच ठिकाणी बीएस्सी, एमेस्सी किंवा बी टेक-एमटेक असा एकत्र कोर्स शिकवला जातो.
 

आय आय टी  पवई मुंबई

'आय आय टी' या तंत्रज्ञानातील संस्थेत बी टेक आणि पाच वर्षांचा इंटग्रेटेड एमएस्सी हा कोर्स उपलब्ध आहे. त्यासाठी अर्थात आय आय टी ची प्रवेश परीक्षा 'जेईई' ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

 

मुंबई विद्यापीठात बेसिक विज्ञान, बायोएनलिटीक्स, कोम्प्युटर सायन्स या विषयात पाच वर्षांचे इंटग्रेटेड एमएस्सी कोर्सेस उपलब्ध आहेत.

संपर्क: मुंबई विद्यापीठ
कालिना, सांताक्रूझ, मुंबई

 

विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील भविष्यातील क्षेत्रे

इतर प्रम्पारिक क्षेत्रांव्यतिरिक्त बायोटेक्नोलोजी, भूगार्भ्शाश्त्र, पर्यावरण तंत्रज्ञान समुद्र तंत्रज्ञान आणि नेनो टेक्नोलॉजि हि चार क्षेत्रे विकसित होत आहेत. भविष्यात त्यांना प्रचंड मागणी येणार आहे.
 

मुंबई विद्यापीठात समुद्र तंत्रज्ञान आणि विमान बांधणी तंत्रज्ञान या विषयावर बी एस्सी कोर्सेस उपलब्ध आहेत. या कोर्सेस नंतर नौदल आणि वायुदलात उत्तम संधी उपलब्ध होतात.

 

याव्यतिरिक्त आर्किटेक हे एक उत्तम क्षेत्र उपलब्ध आहे. या क्षेत्रानंतर नगर विकास विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम करून उत्तम करिअर करता येते.
इञ्जिनिअरिङ्ग केल्यानंतर नोकरी, स्वयंरोजगार या व्यतिरिक्त सरकारी कंत्राटदार म्हणूनही लायसन्स घेत येते.

 

व्यवस्थापनशास्त्र

व्यवसाय क्षेत्रात व्यवस्थापन शास्त्र हा परवलीचा शब्द झाला आहे. सध्या खूप संस्था या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम देत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रम अर्थात एम बी ए कोर्स साठी किमान पदवी असणे गरजेचे आहे. त्याच बरोबर प्रवेश परीक्षा देणे गरजेचे आहे, मात्र या विषयात पुढे करिअर करायचे असेल तर बीएमएस हा कोर्स करता येऊ शकतो.
 

बँक आणि विमा

भारतातील बँकिंग आणि आर्थिक व्यवहार क्षेत्र प्रचंड वाढत आहे. भारतातील बांका सक्षम आहेत आणि बँकिंग व्यवस्था विकसित आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअरला खूप वाव आहे.
 

मुंबई विद्यापीठाने बँकिंग आणि विमा  मध्ये पदवी अभ्यासक्रम सुरु केला असून तो अनेक विद्यापीठात उपलब्ध आहे. तसेच आर्थिक सेवा क्षेत्र या विषयात देखील पदवी अभ्यासक्रम नव्याने सुरु केला आहे.
 

सामाजिक शास्त्रे

तुम्ही आर्ट्स ला असाल तर इतिहास, पुरातत्व, राज्यशास्त्र अर्थशास्त्र, तत्वज्ञान या विषयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यास पूर्ण करून नंतर प्रोफेसर पदासाठी उत्तम संधी उपलब्ध होते. अर्थशास्त्र संख्याशास्त्र करून भारतीय अर्थ सेवा आणि संख्यासेवांमध्ये उत्तम संधी उपलब्ध होते.

 

मास मिडिया

तुम्हाला व्यक्त होण्याची संवाद साधण्याची आवड असेल मास मिडिया हे उत्तम करिअर उपलब्ध आहे. तुम्ही बी एम एम हा हॉर्स करून पुढे पत्रकारितेचा पद्युत्तर अभ्यासक्रम किंवा इव्हेंट व्यवस्थापनातील एम बी ए हा कोर्स करू शकता. या क्षेत्रामध्ये अपरिमित संधी उपलब्ध आहेत.

 

मेडिकल

मेडिकल क्षेत्र हे फार विस्तृत आहे. यात एम्बिबिएस करून जनरल डॉक्टर होता येते. बारावी नंतर प्रवेश परीक्षा देऊन मेडिकल ला प्रवेश मिळतो.याव्यतिरिक्त दंत वैद्यक शास्त्र हे विकसित होत असलेले शास्त्र आहे. त्यासाठी बी डी एस हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

नर्सिंग आणि मेडिकल लेबोरेटरी या विषयातील पदवी अभ्यास्क्रमसुद्धा उपलब्ध आहेत.
 

खेळ

तुम्हाला मैदानी खेळात  रस असेल तर मुंबई विद्यापीठात खेळ व्यवस्थापन या क्षेत्रातील बी एस्सी हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या नंतर याच विषयातील एम बी ए काही विद्यापीठात उपलब्ध होतो.

या शिवाय फिसिकल एद्युकेशन अर्थात शारीरिक शिक्षण विषयातील पदवी उपलब्ध आहे.

खेळातील फिसिकल ट्रेनर किंवा व्यायामशाळेतील फिटनेस ट्रेनर म्हणून करिअर करता येईल.

 

हॉटेल मनेजमेंट

ज्यांना हॉटेल मध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हॉटेल मेनेज्मेंत हे फार विस्तीर्ण करिअर उभे आहे. यात प्रतिष्ठा आणि पैसा प्रचंड आहे. फक्त खूप कस्त करण्याची गरज आहे. हॉटेल मेनेज्मेंत मध्ये पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. तसेच अनेक अल्प मुदतीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

 

संपर्क: कोहिनूर इंस्तीत्युत, सेनापती बापट मार्ग,दादर, मुंबई         इंस्तीत्युत ऑफ हॉटेल मेनेज्मेंत, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई

 

समाज सेवा

तुम्हाला समाजसेवा विषयात रस असेल तर मुंबई विद्यापीठ या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर कोर्सेस प्रदान करते.

संपर्क: निर्मल निकेतन, न्यू मरीन लाइन्स, मुंबई        

टाटा सोशल सायन्स इंस्तीत्युत, देवनार, मुंबई

 

त्यामुळे तुमच्यासमोर करिअरचा महासागर आहे. त्यातून तुम्ही जे निवडल ते कमी. मात्र तुमची आवड, बौद्धिक क्षमता आणि वेळ यांचा योग्य परामर्श घालून निर्णय घ्या.यशस्वी व्हा!

अधिक मार्गदर्शनासाठी आम्ही आहोतच.
 

प्रबोधक

१/४ शंकर निवास, बांद्रेकरवाडी, जोगेश्वरी पूर्व मुंबई ४०००६०

हर्षद माने ९९६७७०६१५०

 

आणि निकालासाठी हार्दिक शुभेच्छा!

दहावी/बारावीतअनुत्तीर्ण/कमी गुण मिळालेल्यांसाठी

 

चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांबारोबरच  कमी गुण मिळालेल्या आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुद्धा करिअर च्या संधींचा विचार केला पाहिजे. त्यासाठी हा लेख

.

दहावी अनुत्तीर्ण- एटीकेटी ची सुविधा

दहावी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेज प्रमाणे एटीकेटी चा फायदा घेत येऊ शकतो. म्हणजेच दहावीत अनुत्तीर्ण झाल्यानंतरही ती परीक्षा पुन्हा देताना, कोलेज मध्ये सुद्धा अकरावीस प्रवेश घेत येईल. जास्तीत जास्त दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटी वापरता येणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे १ वर्ष वाचणार आहे.
 

दहावीत कमी गुण मिळाल्यानंतरच्या संधी:

१. तांत्रिक शिक्षण:

तांत्रिक शिक्षण हे दहावीनंतर खूप मोठी संधीची क्षेत्रे उघडते. तांत्रिक शिक्षण अप्रेन्तिन्शीप सर्तीफिकेत, आयटीआय आणि डिप्लोमा अशा तीन प्रकारात घेता येते.
 

अप्रेन्तिन्शीप सेर्तीफिकेत घेऊन मुंबई पोर्ट ट्रस्ट, माझगाव डॉक, कारखाने अशा अनेक आस्थापनामध्ये नोकरीच्या संधी उघडतात. आय टी आय, तांत्रिक प्रशिक्षण संस्था यात हे सर्तीफिकेट कोर्सेस उपलब्ध असतात. सहा महिने ते चार वर्ष अशा कालावधीचे कोर्सेस उपलब्ध असतात.
 

संपर्क:

रिजनल डीरेक्टरेट ऑफ अप्रेन्तिन्शीप ट्रेनिंग

व्ही एन पुरव मार्ग, चुनाभट्टी, सायन पश्चिम.

आयटीआयतुम्ही दोन वर्षांचा आयटीआय चा कोर्स करू शकता. आयटीआय महाराष्ट्रभर पसरलेले आहेत.आय टी आय मध्ये एक वर्ष दोन वर्ष आणि तीन वर्ष अशा प्रकारचे कोर्सेस उपलबद्ध असतात.

डीझेल मेकानिक, वेल्डर, कार्पेंटर, प्लंबर हे  इञ्जिनेअरिङ्ग विभागात तर कोम्प्युतर, टेलरिंग, स्टेनो आणि हेअर व स्किन केअर हे इतर विभागात एका वर्षाचे अभ्यासक्रम उपलब्ध होतील.

दोन वर्षासाठी, ड्राफ्टमन (सिव्हिल, मेकानिकल, इलेक्ट्रोनिक्स, इन्स्तृमेंतल, इलेक्त्रिशन, फिटर, टर्नर,वायरमन, रबर इ. कोर्सेस उपलब्ध आहेत.

तीन वर्षांसाठी टूल व डाय मेकिंग आणि मशीन टूल मेंटेनन्स इ. कोर्सेस उपलब्ध होतात.  
 

नोकरी/व्यवसाय

आय टीआय नंतर शाशकीय आस्थापनांमध्ये जसे रेल्वे, कारखाने, वर्कशोप्स येथे वर्षभर खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतात. मात्र, बर्याचदा आम्हाला त्याची माहितीच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे हजारोंनी जागा आणि नोकरीच्या संधी मराठी मुले घेऊ शकत नसल्याचे दिसून येते.
 

अनेक खासगी कंपन्या, फेक्टरी, कारखाने यांच्यामध्ये सुद्धा आय टीआय साठी अनेक संधी असतात.

या व्यतिरिक्त वायरमन, हेअर स्किन टेक्निशन हे स्वयंरोजगार सुद्ध असुरू करू शकतात ज्याला प्रचंड मागणी आहे.

मुंबई- ठाणे मधील आयटीआय:

खार रोड (पश्चिम)कल्याण बदलापूर रोड पश्चिम कोकण भवन बेलापूरभिवंडी ठाणेबोरीवलीदादर पश्चीमडोंगरी तलसरी ठाणेविद्याविहार पश्चिमजव्हार ठाणेउल्हासनगर, कल्याणकोरेगाव ठाणेलोअर परेल, मुंबईमोखाडा ठाणेमिठागर रोड,मुलुंड पूर्व

 महापालिका मार्, मेट्रो थिएतर

एमआयडीसी कुडवली, मुरबाड, ठाणे

शहापूर, ठाणे

विक्रमगड, ठाणे

वाडा, ठाणे.
 

डिप्लोमा

दहावी नंतर डिप्लोमा केला तर अभियांत्रिकीस प्रवेश मिळणे सोपे जाते. प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही आणि एक वर्षही कमी होते.

डिप्लोमा नंतर नोकरीच्या संधी सुद्धा उपलब्ध होतात.
 

संगणक, मोबाईल रिपेरिंग
शासकीय तंत्र निकेतन संस्थेत आणि इतर अनेक खासगी संस्थांमध्ये संगणक मोबाईल रिपेरिंग असे कोर्सेस उपलब्ध असतात. याव्यतिरिक्त इतर अनेक संस्था संगणक क्षेत्रात कोर्सेस देतात. यामध्ये हार्डवेअर, टेली, वेबसाईट डिझाईन अशा कोर्सेस नंतर नोकरी आणि स्वयंरोज गराच्या संधी उपलब्ध होतात.

 

२. स्टेनो

शासकीय आणि खासगी कंपन्यांना लिपिक पदाची गरज मोठ्या प्रमाणात असते. विशेषतः शासकीय नोकरीच्या संधी वर्षभर उपलब्ध होत असतात. काही ठिकाणी दहावी नंतर स्टेनो पदासाठी अर्ज करता येतो. यासाठी एखाद्या चांगल्या संस्थेतून मराठी व इंग्रजी टायपिंग चा शासनमान्य प्रमाणपत्र कोर्स करून घ्यावा. मराठी ३०शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी ४० शब्द प्रती मिनिट असा वेग हवा असतो.

तसेच शासनमान्य एम एस सी आय टी हा संगणक ज्ञानाचा कोर्स करून घ्यावा.

टायपिंग चा सतत अभ्यास ठेवावा जेणे करून प्रात्यक्षिकाच्या वेळेस त्रास पडत नाही.

 

 

३. हॉटेलिंग

दहावीनंतर हॉटेल व्यवस्थापनातील लहान कोर्सेस करून नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. मुंबईत आय एच एम मध्ये तसेच इतर अनेक खासगी संश्तांमध्ये सुद्धा हे कोर्सेस उप्लाभ्द असतात.

संपर्क: वीर सावरकर मार्ग, मुंबई.

होम सायन्स

मुलींसाठी होम सायन्स हा एक उत्तम पर्याय आहे. होम सायन्स नंतर तुम्हाला हॉटेल मेनेजमेंट मध्ये करिअर करता येते. अनेक  व्यवसाय प्रशिक्षण संस्थांमध्ये हा कोर्स उपलब्ध असतो.

४. परदेशी भाषा

दहावीनंतर परदेशी भाषांचे अभ्यासक्रम उपलब्ध असतात. पारंपारिक अभ्यास करताना हे कोर्सेस करता येतात. यानंतर भाषांतरकार म्हणून एक चांगले करिअर तयार होऊ शकते.

 

सैन्य भरती

सातवी आठवी उत्तीर्ण पासून सैन्यात भरती सुरु होते. हे प्रत्यक्ष लढणारे सैनिक असतात. तुमची शारीरिक क्षमता चांगली असेल आणि कठीण परिस्थितीमध्ये जगण्याची तयारी असेल तर देशप्रेमाचे हे सर्वोत्तम करिअर तुमची वाट पाहते आहे.
 

या व्यतिरिक्त अतिरिक्त पोलिस बळ, सैन्य दलातील इतर शाखा यांचे फोर्म गरजेनुसार निघत असतात, त्यातही चांगली संधी आहे.
 

स्वयंरोजगार

स्वयरोजगाराच्या अनेक संधी दहावी नंतर घेता येतील. याबाबतीत उत्तम मार्गदर्शन घेऊन पुढे एखादा स्वयंरोजगार सुरु करता येईल:
 

अधिक संपर्क: मिटकॉन- कुबेर चेम्बर्स, शिवाजी नगर, पुणे

 

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पुणे

 

बारावीत कमी मार्क्स मिळालेत मिळाले?

बारावीत ४०-५०% मिळाले किंवा बारावीनंतर शिक्षण सुरु ठेवणे शक्य नसेल अशा वेळेस काही पर्यायांचा विचार करावा ज्यातून लगेच नोकरी किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.


पोलिस भरती

बारावी  उत्तीर्ण झाल्यानंतर पोलिस भरतीस उतरता येते. यासाठी काही खासगी संस्था प्रशिक्षण घेतात. मागासवर्गीय विद्यार्थाय्साठी पोलिस भरती प्रशिक्षण कार्यक्रम असतो.

नुकतीच एक पोलीस भरती येऊन गेली आहे. या वर्षाखेरीस पुन्हा येण्याची शक्यता आहे.

 

होम सायन्स

मुलींसाठी होम सायन्स हा एक उत्तम पर्याय आहे. होम सायन्स नंतर तुम्हाला हॉटेल मेनेजमेंट मध्ये करिअर करता येते. अनेक  व्यवसाय प्रशिक्षण संस्थांमध्ये हा कोर्स उपलब्ध असतो.
 

हॉटेलिंग

बारावीनंतर चांगले गुण असतील तर या  अभ्यासक्रम उपलब्ध आहे. मात्र, बारावीत कमी गुण मिळाले तरीही, इन्स्तीत्युत ऑफ हॉटेल मेनेजमेंट मध्ये या विषयातील अल्प मुदतीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
 

संपर्क: वीर सावरकर मार्ग, मुंबई
 

रेल्वे

रेल्वे मध्ये दहावी-बारावी नंतर सी व डी ग्रुप मध्ये बर्याच व्हेकन्सी असतात. तिकीट तपासनीस, स्टेशन मास्तर, क्लार्क, कमर्शिअल अप्रेन्तीस या पोस्त बिगर आय टी आय न उपलब्ध असतात, तर आय टी आय आणि इञ्जिनिअरिङ्गन विविध  तांत्रिक पदांसाठी योग्य असतात.
 

व्यवसाय आणि कॉमर्स:

कॉमर्स विभागात अनेक अल्प मुदतीचे अभ्यासक्रम करून नोकरी आणि स्वयंरोजगार सुरु करता येऊ शकतो .

 

बारावी नंतर अल्प मुदतीचे अभ्यासक्रम:

बारावी नंतर पुढे शिकणे शक्य नसल्यास तसेच तुमचे शिक्षण घेत असताना अनेक अल्प मुदतीचे अभ्यासक्रम करता येतात;

१. एमएससीआयटी

२. टेली

३. सायबर कायदा

४. रिटेल मेनेज्मेंट

५. कर व्यवस्थापन (मुंबई विद्यापीठ, भारती विद्यापीठ, वेलिंगकर)

६. पत्रकारिता (मुंबई मराठी पत्रकार संघ, दादर)

७. आयात निर्यात व्यवस्थापन (वेलिंगकर, इंडिअन मर्चंट चेंबर)

८. फायनान्स व्यवस्थापन

९. बौद्धिक संपदा व्यवस्थापन

१०. जेम्स आणि ज्वेलरी

११. पर्यटन व्यवस्थापन

 

गरवारे करिअर मार्गदर्शन संस्था, मुंबई विद्यापीठ

 

या संस्थेत बारावी नंतर आणि पदवी नंतरचे पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे . काही पूर्ण वेळ आहेत. बारावी नंतर हे कोर्सेस करून नोकरी किंवा स्वयंरोजगाराच्या संधी मिळवता येतात.

(केवळ बारावी नंतरचेच अभ्यासक्रम विचारात घेतले आहेत)

 वेळ :

१. कोम्प्युटर एप्लीकेशन

२. इन्तेरिअर डिझाईन (डेकोरेशन)

३. रिटेल

४. पेंट तंत्रज्ञान

५. पर्यटन

६. ज्वेलरी डिझाईन
 

अर्धवेळ अभ्यासक्रम

१. कस्टम क्लिअरन्स आणि फ्रेट फोर्वर्डींग (आयात आणि निर्यात व्यवस्थापनातील एक महत्वाचा भाग)

२. फोरेन ट्रेड व्यवस्थापन

३. पर्यटन व्यवस्थापन
 

सर्तीफिकेट अभ्यासक्रम

१. पर्यावरण तंत्रज्ञान

२. मेडिकल ट्रान्सक्रीप्शन

या प्रत्येक अभ्यासक्रमानंतर लहान पदांवरून नोकरी सुरु करता येऊ शकते.

 

 

प्रबोधक: १/४ शंकर निवास, बांद्रेकरवाडी, जोगेश्वरी पूर्व, मुंबई ४०००६०

 
bottom of page