top of page

 

नाट्यक्षेत्रातील करिअर

 

 

 

मराठी माणूस नाटकाशिवाय जगू शकत नाही. नाटक हे मराठी माणसाचे जगण्याचे साधन. नाटक हे महाराष्ट्रातील कित्येक पिढ्यांचे व्यक्त होण्याचे माध्यम राहिले आहे आणि, मराठी मनाच्या प्रबोधनाचे एक सक्षम अस्त्र! महाराष्ट्र कित्येक पिढ्यांपासून या नाटकांवर जगत आला आहे. त्यामुळे नाटक हा महाराष्ट्राचा जीव कि प्राण! पूर्वी एक काळ होता जेंव्हा नाटकात काम करणे खालच्या दर्जाचे मानले जायचे. त्यानंतर परिस्थिती सुधारली. शिक्षित माणसे या क्षेत्रात उतरली. त्यानंतर या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यानंतर मराठी रंगभूमीचा अश्व चौफेर धावू लागला. 

 

आज आपण  नाट्यक्षेत्रातील करिअर विषयी माहिती घेऊ. 

 

महाराष्ट्रातील नाटक 

महाराष्ट्र नाट्यसंस्कृती बाबतीत फार श्रीमंत आहे. संगीत नाटकांचा सुवर्णकाळ महाराष्ट्राने पहिला आहे. त्याकाळी रात्र रात्र भर संगीत नाटके चालत आणि लोक ती पाहत, त्याच्या आस्वाद घेत. दिनानाथ मंगेशकरांनी त्यावेळी  गाजवली. 

 

हळू हळू संगीत नाटकांचा काळ ओसरला. तीन अंकी नाटके दोन अंकी झाली आणि अडीच तासांमध्ये होऊ लागली. काशिनाथ घाणेकर,  पणशीकर, डॉ लागू, विक्रम गोखले  असे अनेकानेक ताकदीचे नट आणि विजय मेहता, लालन सारंग, रीमा लागू, सई परांजपे, रोहिणी हट्टंगडी अशा अनेक स्त्रियांनी आपला ठसा रंगभूमीवर उमटवला आहे. 

 

याचबरोबर विविध चळवळी सुद्धा रंगमंचावर सातत्याने होत आहेत. अविष्कार, ललित, बालनाट्यचळवळी, पृथ्वी यासारख्या उपक्रमांनी सातत्याने मराठी रंगभूमीला समृद्ध केले आहे, उत्तम कलाकार प्रदान केले आहेत. 

 

मराठी नाटक या अर्थाने फार श्रीमंत आहेच. याचबरोबर सुयोग, अथर्व, भद्रकाली, चतुरंग अशी अनेक नाट्य निर्माते मंडळी मराठी रंगभूमीवर यशस्वीपणे कार्यरत आहेत. विविध चांगले विषय रंगभूमीवर सातत्याने येत आहेत. एकंदरीत मराठी रंगभूमीला आर्थिक बळही प्राप्त झाले आहे. 

 

त्यामुळे मराठी रंगभूमी पुन्हा एकदा आपल्या सुवर्णकाळाकडे जाण्यास सज्ज आहे. आणि यासाठी तुमच्यासारख्या हूरहुन्नरी कलाकारांना नाट्यक्षेत्रात येण्यासाठी हा चांगला कालावधी आहे. 

 

कोणते गुण वाढीस लावावेत?

उत्तम कान आणि डोळे 

नाट्य किंवा कुठलीही कला हि जास्त ऐकण्याने वाढीस लागते. जे जे चांगले काम रंगमंचावर होत आहे, रंगमंचाच्या बाबतीती जेजे काही चांगेल होत आहे, ते जास्तीत जास्त ऐकले पाहिजे, पहिले पाहिजे. त्यासाठी सतत विविध कार्यक्रम हुडकून त्यामध्ये सहभागी होण्यासाठी धडपड करावी. 

 

निरीक्षण 

आजू बाजूच्या गोष्टींचे आकलन करून, विचार करून सतत निरीक्षण आणि त्यावर आपली मते बनवण्याची आणि व्यक्त करण्याची सवय लावावी. 

 

विचार

निबंध, वक्तृत्व यासारख्या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा. यामुळे बोलण्याची आणि विचार करण्याची सवय लागते. तसेच मनातले विचार योग्य पद्धतीने व्यकट करण्याची सवय लागते. 

 

 

प्रशिक्षण 

वास्तविक नाट्यक्षेत्रात येण्यासाठी पूर्वी पारंपारिक शिक्षण उपलब्ध नव्हते. पण आता विविध माध्यमातून प्रशिक्षण घेता येते. 

 

१. मुंबई विद्यापीठ 

मुंबई विद्यापीठ वामन केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यक्षेत्रासाठी पदव्युत्तर कोर्स चालवते. त्यामुळे नाट्य क्षेत्राशी स्माबंधित चांगले प्रशिक्षण, दिग्गजांची व्याख्याने, विविध माध्यमामध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. 

 

कुठल्याही विषयातील पदवीधर या कोर्स साठी अर्ज करू शकतो . 

 

अधिक संपर्क :

थिएटर आर्ट्स एकेडमी 

मुंबई विद्यापीठ, आंबेडकर भवन, कालिना सांताक्रूझ 

 

२. राष्ट्रीय नाट्य विद्यालय

येथे तीन वर्षांचा पूर्णवेळ पदविका कोर्स राबवला जातो. या कोर्सला देशभरात प्रचंड मान्यता आहे. इथून उत्तीर्ण होणार्या पदविका विद्यार्थ्यांना या क्षेत्रात सन्मानाने पाहिले जाते. 

 

संपर्क:

 राष्ट्रीय नाट्य विद्यालय, 

बहावल्पूर हाउस, भगवानदास रोड , नवी दिल्ली- ११०००१

 

३. कला अकादमी, गोवा 

गोव्यातील कला क्षेत्रातील एक महत्वाची संस्था म्हणजे कला अकादमी गोवा. येथे नाट्य आणि  संगीत  या विषयांवरील कोर्सेस उपलब्ध आहेत. यापैकी नाट्य क्षेत्रात दोन वर्षांचा पदविका कोर्स उपलब्ध आहे. यामध्ये अभिनय किंवा निर्मिती या विषयात प्राविण्य मिळवता येते. तसेच सर्टीफिकेट कोर्स उपलब्ध आहे. 

 

४.  पुणे विद्यापीठ 

पुणे विद्यापीठामध्ये थिएटर या विषयात पदवी (बिए) आणि पदव्युतर पदवी (एमए) उपलब्ध आहे. 

संपर्क: ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ, गणेश खिंड पुणे

 

या व्यतिरिक्त विविध चळवळींशी तुम्ही स्वतःला जोडून घेऊ शकता:

 

अनेक नाट्यप्रशिक्षण संस्था या विषयात लहान मोठे कोर्सेस देतात. 

 

नाट्यक्षेत्रात येण्यासाठी अधिक माहितीसाठी

प्रबोधक: हर्षद माने ९९६७७०६१५०

 

जर तुम्हाला या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर एक उत्तम व्यावसायिक करिअर तुमची वाट पाहत आहे. तेंव्हा या या एका विशाल, व्यापक आणि अतिशय श्रीमंत क्षेत्रात. 

 

 

मोबाइलएप  डेव्हलपमेंट 

 

 

सध्या स्मार्त फोन ची  चलती आहे. तरुणाईच्या आणि प्रौढ माणसांच्या हातीसुद्धा स्मार्ट  खुळखुळू लागले आहेत. एनड्रोइड फोन्स आणि त्यातील विविध एप्लिकेशन्स तर प्रत्येकाच्या बोलण्यातील विषय बनले आहेत. वोट्स एप जगण्यातील महत्वाचे अंग बनले आहे. त्यामुळे स्मार्ट फोन्सच्या बरोबरीनेच हे मोबाइल एप्लिकेशन बनवणार्या डेव्हलपर्स हे करिअर सध्या चलतीत आहे. नोकरी आणि फ्री लान्सिंग अशा दोन्ही प्रकारे करू शकणार्या या स्मार्ट करिअर विषयी :-

 

मोबाइल डेव्हलपमेंट 

 

पूर्वी मोबाइल  म्हटले कि  कोल उचलता येणे आणि कोल करता येणे, फार फार तर मेसेज करता येणे एवढाच उद्देश असे. आत्ता मात्र, एकाच मोबाइल फोन मधून  करता येणे  झाले आहे. अने प्रकारच्या सुविधा तुम्हाला प्राप्त होतात. आणि महत्वाचे म्हणजे यातील बहुतांशी सुविधा मोफत उपलब्ध आहेत.एकमेकांना मेसेज पाठवणे पूर्वी पैसे देऊनच शक्य होत असे, आता मोफत मेसेज पाठवणे शक्य झाले आहे.  मोठमोठ्या फ़ाइल्स, विदिओज पाठवणे शक्य होत आहे.  याच बरोबर रेल्वे,बस वेळापत्रक यांची माहिती ,  रस्त्याचे नेव्हिगेशन यांची माहिती विविध एप मधून आपल्याला मिळते. 

 

हे सर्व एप मोफत उपलब्ध होतात. याचे कारण  जाहिरातीतून त्यांना पैसा मिळतो. हे एप बनवणार्या कंपन्यांना कल्पक सोफ़्त्वेअर डेव्हलपर्स ची नितांत आवश्यकता असते. 

 

जावा

एन्द्रोइद हे ऑपरेटिंग सोफ़्त्वेअर जावा या संगणकीय भाषेत बनलेले आहे. त्यामुळे या ऑपरेटिंग सिस्टीम वर एप बनवण्यासाठी जावा भाषा  फार गरजेचे आहे. 

 

विंडोस 

याच प्रमाणे नोकिआ किंवा आत्ताची माय्क्रोसोफ्त सी भाषेमध्ये लिहिली गेली आहे. त्यामुळे सी भाषा आणि  प्रकार अवगत असणे आवश्यक आहे. 

 

झेमारिंग 

हे नवे सोफ़्त्वेअर कुठल्याही प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम साठी मोबाइल एप्लिकेशन बनवण्यासाठी   उपयुक्त आहे. 

 

पात्रता: 

मोबाइल एप डेव्हलपर म्हणून करिअर करण्यासाठी संगणक विज्ञानात किंवा माहिती तंत्राद्नाय्नात पदवीधर असणे गरजेचे आहे. मात्र बहुतांशी पदवीधरांना एन्द्रोइद किंवा इतर भाषांची माहिती नसते. याच साठी काही संस्थांनी कोर्सेस  केले आहेत. 

 

प्रशिक्षण           

एन्द्रोइद प्रशिक्षण काही खासगी सास्न्थांमध्ये दिले जाते:

सीड इन्फोटेक 

सुवेना  कंसल्टंट 

 

करिअर संधी:

बर्याच एप डेव्ह्लेप्मेट आणि गेमिंग कंपन्यांना जावा आणि एन्द्रोइद शिकलेल्या तरुणांची आवश्यकता असते. तुम्ही स्वतः सुद्धा बरेच एप्लिकेशन बनवून बाजारामध्ये आणू शकता, खासगी कामे घेऊ शकता. तुम्ही स्वतःची कंपनीही सुरु करू शकता. डिजिटल मार्केटिंग मध्येही खूप मागणी उपलब्ध  होऊ शकते. 

 

तुमच्याकडे तांत्रिक शिक्षणा बरोबरच कल्पकता असणे गरजेचे आहे. 

 

अगदी  प्रशिक्षणात आणि  भांडवलात सुरु करण्यासाठ्खे हे करिअर आहे. अर्थाने स्मार्ट करिअर. तर सज्ज व्हा जनरेशन नेक्स्ट चे करिअर नेक्स्ट सुरु करण्यासाठी!


 

 

संस्कृत मधील करिअर संधी

 

 

भारताच्या प्राचीन इतिहासाचा सुवर्णमयी वारसा, देवांची भाषा असा नावलौकिक मिळालेली गीर्वाण भारती संस्कृत आपल्या सर्व भारतीय भाषांची आद्य भाषा आहे.  संस्कृएखाद्या भरजरी राणीप्रमाणे त ची गर्भश्रीमंती सध्या ओसरली असली तरी तिचा अभ्यास आणि संशोधन चालू आहे, आणि काही प्रमाणात वापरही. त्यामुळे संस्कृत शिकलेल्यांना मरण नाही. मात्र , हि आपली भाषा असल्याने ती टिकवणे वाढवणे आणि पसरवणे हेही आपलेच काम आहे. या कर्तव्य भावनेतून एक  क्षमता संस्कृत मध्ये आहे. त्यामुळे संस्कृत मधील करिअर म्हणजे "केल्याने होत आहे रे " असे आहे. 

 

भाषेची श्रीमंती 

संस्कृत  हि अतिशय श्रीमंत भाषा. तिचे अलंकार तिची रूपे, प्रत्यय आणि व्याकरणाचे साज शृंगार  लेऊन भरजरी राणीप्रमाणे समोर येते. संस्कृत हि आपली बोलीभाषा होती, राजभाषा होती आणि साहित्याची भाषा होती. भारतातील सर्वोत्तम असे साहित्य संस्कृत भाषेत निर्माण झाले. कौटिल्य अर्थशास्त्र  सारखे राजनीती आणि अर्थकारणातील लिखाण संस्कृत मध्ये झाले. कालिदास दंडी सारखे कवी संस्कृत भाषेत होऊन गेले. आपले धर्मग्रंथ वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता संस्कृत मध्ये लिहिले गेले. संस्कृत मध्ये साहित्य अपरिमित आहे. त्यामुळे त्याच्या कक्षा प्रचंड विस्तीर्ण आहेत. संस्कृत चे साहित्य एकत्र केले तर कदाचित जगातील सर्वोत्तम आणि सर्वाधिक साहित्यातून एक भरेल. 

 

संस्कृत मधील संधी

वर म्हटल्याप्रमाणे संस्कृत हि आपली भाषा असल्याने त्याच्या विस्ताराच्या कक्षा, आपले करिअर आणि आपले काम हे आपणच आपण ठरवायचे आहे. आपण नेऊ तिथपर्यंत आपली करिअरचा विस्तार वाढू शकतो. संस्कृतच्या विविधान्गाचा अभ्यास करणे, एखाद्या क्षेत्राचा सखोल अभ्यास करून पांडित्य घेणे, संस्कृत शिकवणे,संस्कृतमध्ये  संशोधन करणे, पुस्तके लिहिणे अश्या अनेक मार्गांनी तुम्ही संस्कृतमढील आपले करिअर सजवू शकता.  

 

संस्कृत मधील करिअर

संस्कृत मध्ये अनेकांगी करिअर होऊ शकते. 

 

अध्यापन 

संस्कृत मध्ये सर्वाधिक प्रामाण्य करिअर म्हणजे अध्यापन. संस्कृत मध्ये बीए आणि एमए करून तुम्ही बीएड करू शकता आणि त्यानंतर शाळांमध्ये संस्कृत शिकवू शकता. संस्कृत हि विशेष भाषा असल्याने त्यातील शिक्षकांचे प्रमाण तुलनेत कमी आहे. आणि म्हणून  शिक्षकी पेशा फार छान आहे. 

 

कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी एमए नंतर नेट-सेट देऊन प्रोफेसर म्हणून लागता येईल. बीए आणि एमए शिकवणाऱ्या कॉलेजेस मध्ये, विद्यापीठांमध्ये शिकवण्यासाठी संधी मिळू शकते. 

 

संशोधन

संस्कृत मधील विविध क्षेत्रांमध्ये, विशेषतः साहित्य क्षेत्रामध्ये संशोधनाची प्रचंड आवश्यकता आहे. कॉलेजमध्ये शिकवताना किंवा विद्यापीठामध्ये शिकवताना संशोधन कार्य करता येईल. त्याचप्रमाणे विविध संस्था वेद, उपनिषदे, प्राचीन साहित्य, प्राचीन शिलालेख इत्यादी विषयांवर  संशोधन करीत असतात. इतिहास या क्षेत्रात संस्कृत च्या अभ्यासकांना विशेष महत्व आहे. त्यामुळे या विषयात संशोधन करण्यासाठी प्रचंड संधी आहे. 

 

इंडोलॉजि, वेदान्ता

स्वामी विवेकानंदांनी वेदांत हा विषय परदेशामध्ये लोकप्रिय केला. आजही वेदांताविषयी लोकांची उत्सुकता कायम आहे. त्यामुळे संस्कृत चा अभ्यास केलेल्यांना या विषयातील संशोधनामध्ये आणि अध्यापनामध्ये विशेष संधी उपलब्ध आहेत. 

 

महाराष्ट्रात पुणे नाशिक , मुंबई नागपूर येथे संस्था आणि विद्यापीठांमध्ये फार चांगले काम चालते. 

१. मुंबई विद्यापीठ 

२. पुणे विद्यापीठ 

३. कालिदास विद्यापीठ, नागपूर 

४. भांडारकर प्राच्यविद्या इंस्तीत्युत, पुणे  

५. गामा ओरिएन्तल रिसर्च इंस्तीत्युत 

६. डेक्कन कॉलेज, पुणे 

७. सुगम संस्कृतंम, नाशिक 

 

क्लासेस

संस्कृत च्या विद्यार्थ्यांना क्लासेस मध्ये शिकवणे हे सुद्धा एक उत्तम करिअर आहे. विशेषतः दहावीचं विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्यांची आवश्यकता असते. 

 

शासकीय संधी 

आर्किओलोजी मध्ये संस्कृत जाणकारांना चांगल्या संधी उपलब्ध होतात. वेळोवेळी त्या जाहिराती वर्तमानपत्रात येत असतात. 

 

शिक्षण

एमए संस्कृत-

१. मुंबई विद्यापीठात पूर्णवेळ आणि शनिवार- रविवार असे दोन एमए कोर्सेस चालवले जातात. 

मुंबई विद्यापीठ,संस्कृत डिपार्टमेंट, कालिना सांताक्रूझ. 

२. कालिदास विद्यापीठ- नागपूर 

३. डेक्कन विद्यापीठ, पुणे 

४. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

एमफिल-पीएचडी 

पदव्युत्तर पदवी केलेल्यांना एमफिल आणि पीएच डी साठी प्रवेश मिळतो. 

मुंबई विद्यापीठ 

पुणे विद्यापीठ 

कालिदास विद्यापीठ 

याशिवाय मुंबई विद्यापीठ संस्कृत मध्ये सर्तीफिकेत आणि डिप्लोमा कोर्सेस चालवते.  

 

राष्ट्रीय संस्कृत संस्थान 

केंद्र शासन राष्ट्रीय संस्कृत संस्था हे संस्कृत साठी विशेष स्वायत्त विद्यापीठ चालवते. याचे कोर्सेस अतिशय प्रसिद्ध आहेत. संस्कृत बेसिक पासून पीएचडी पर्यंत कोर्सेस इथे चालतात. संस्कृत मध्ये बीएड आणि एम एड कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत. दूरस्थ पद्धतीनेही शिक्षण येथे उपलब्ध आहे. 

 

ज्यांना संस्कृत केवळ हौस म्हणून शिकायचे आहे त्यांच्यासाठी सुद्धा फार चांगले कोर्सेस इथे उप्लाभ्द आहेत. 

 

संपर्क: राष्ट्रीय संस्कृत संस्था, जनकपुरी, नवी दिल्ली. 

 

तेंव्हा भारताची प्राचीन भाषा शिका आणि सज्ज व्हा एक सु'संस्कृत' करिअर करण्यासाठी. 

bottom of page