top of page

 

 

भारताने २५ सप्टेंबर ला मंगळावर आपले यान पाठवले . मंगळाच्या कक्षेत ते स्थिरावले. पहिल्याच प्रयत्नात हे करू शकणारा भारत जगात पहिला देश  बनला आहे तर आशियाई देशात मंगळस्वारी करणारा पहिलाच देश. सर्व देशवासीयांसाठी हि अभिमानाची गोष्ट आहे. अवघ्या भारताची मान गर्वाने ताठ झाली.  सर्व भारतीयांनी त्या सकाळी जल्लोष केला. या मोहिमेचे सर्व श्रेय  भारतीय शासनाच्या अंतराळ विभागाच्या 'इस्रो' या संस्थेला  जाते. आता अधिकाधिक मराठी मुलांनी इस्रोत दाखल होण्याची स्वपने पहावीत, आणि इस्रोच्या यापुढील देशाची मन उंचावणाऱ्या मोहिमांमध्ये मराठी बुद्धिमत्ता असावी यासाठी हा लेखप्रपंच. 


इस्रो अर्थात इंडिअन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारताचं सर्व अंतराळ मोहिमा आखते. मागील वर्षी चांद्रयान हि चंद्रावरील मोहीम आपण फत्ते केली होती. या अगोदर अशी अनेक याने, उपग्रह क्षेपणास्त्र  इस्रोने यशस्वीरीत्या सोडलेली आहेत. प्रत्येक मोहीमेची आपण माहिती घेत नाही. मात्र मंगळयान हा मैलाचा दगड होता आणि म्हणून सर्व भारतानेच नाही जगानेही त्याची दाखल घेतली . त्यामुळे आता इस्रो म्हणजे नक्की काय प्रकरण आहे आणि आपलयाला इस्रोत नोकरी मिळू शकते का याविषयी भारतातील तरुण वर्गाची उत्सुकता वाढली आहे. इस्रोमध्ये मराठी तरुणांची संख्या फार नगण्य आहे. हुशारी आणि बुद्धिमत्तेत आपण कमी नाही,प्रश्न आहे तो संधी घेण्याचा. इस्रोला नेमक्या कुठल्या प्रकारच्या मनुष्यबळाची आणि बुद्धिमत्तेची आवश्यकता असते? त्यासाठी काय केले पाहिजे? मागील वर्षभरात इस्रोत आलेल्या विविध करिअर संधींच्या जाहिरातींवरून एक अभ्यास करून या विविध करिअरची माहिती तुमच्यासमोर ठेवत आहोत. 
 

इस्रो हि दिपार्त्मेंत ऑफ स्पेस या केंद्र शासनाच्या दिपार्त्मेंटची संस्था आहे. तिची विविध कार्यालये अहमदाबाद, बंगळूरू, हैद्राबाद, नवी दिल्ली, तिरुपती- आंध्रप्रदेश, श्रीहरीकोटा (उपग्रह उड्डाण केंद्र) आणि थिरुवनंथपुरम येथे आहेत. 

 

या सर्व ठिकाणी विविध प्रकारचे कार्य चालते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणची मनुष्यबळाची गरज वेगवेगळी आहे. 

इस्रोला लागणाऱ्या मनुष्यबळाचे तांत्रिक आणि अतांत्रिक असे दोन गट आपण पाडू शकतो. तांत्रिक मध्ये विविध तंत्रज्ञान क्षेत्रात  पीएचडी, पदव्युत्तर पदवी, पदवी, डिप्लोमा आणि आयटीआय केलेल्यांसाठी पदे उपलब्ध असतात. अ-तांत्रिक पदांमध्ये इतर विविध शिक्षण घेतलेल्यांसाठी जागा उपलब्ध होतात. 

अ) तांत्रिक मनुष्यबळ:

 

स्पेस अर्थात अंतराळ क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे विविध विषयातील इंजिनिअर्स ची मागणी बंगळूरू, थिरुव्नन्थ्पुरम आणि श्रीहरीकोटा ला जास्त असते.

मागील वर्षभरात आलेल्या पदांच्या जाहिरातींवरून इस्त्रोच्या विविध संस्थांना लागणाऱ्या तांत्रिक मनुष्यबळाचे आपण सहा पदांमध्ये विभाजन करू शकतो. १. वैज्ञानिक/ इंजिनिअर्स२. संशोधक३. रिसर्च असोसिएट४. तांत्रिक सहाय्यक 

५. तांत्रिक सहाय्यक- ब वर्ग 

६  इतर तांत्रिक भरती 
 

१. वैज्ञानिक/ इंजिनिअर्स

वैज्ञानिक/ इंजिनिअर्स पदांसाठी पदव्युत्तर तसेच पदवी दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांची भरती निघते. विविध संस्थांप्रमाणे

विषय शैक्षणिक पात्रता बदलते.

 

पदव्युत्तर पदवी  

 

१ इण्डस्ट्रीअल सेफ्टी

२ इण्डस्ट्रीअल

३ स्ट्रक्चरल इञ्जिनिअरिङ्ग 

४. केमिकल

 शैक्षणिक पात्रता: भौतिक शास्त्रात एमएस्सी/एमएस - सर्व सेमिस्टर मध्ये सरासरी६५% मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक

 

१. अप्लाइड मेकेनिक्स 

२. मशीन डिझाईन 

३ स्ट्रक्चरल इञ्जिनिअरिङ्ग 

 

 शैक्षणिक पात्रता: वरील विषयात  एमई/ एमटेक  आणि मेकानिकल इञ्जिनिअरिङ्ग, सिव्हिल, एरोनोतिक्ल, केमिकल, फायर सेफ्टी, मेटाल्युगरी या विषयात बी ई किंवा बी टेक   


वैज्ञानिक(एसडी) -  राष्ट्रीय वातावरण संशोधन केंद्र, तिरुपती, आंध्रप्रदेश येथे इस्रोचे वातावरण संशोधन केंद्र आहे. येथे वैज्ञानिक पदासाठी पुढील पात्रता आवश्यक आहे. भौतिक शास्त्रात एमएस्सी एमएस - सर्व सेमिस्टर मध्ये सरासरी६५% मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक तसेच पदवी सुद्धा सरासरी६५% मिळवून उत्तीर्ण आणि भौतिक/स्पेस फिसिक्स/वातावरण विज्ञान यामध्ये पीएचडी  आणि संशोधनाचा अनुभव. 

पर्यावरण, रडार तंत्रज्ञान, पर्यावरण बदल, सेटेलाईट माहिती व मोडेलिंग वरून ग्रहांवरील पर्यावरणाचा अभ्यास यात अनुभव असलेल्यांना  प्राधान्य दिले जाते. 

वयोमर्यादा- ४० वर्षे

 

 पदवीधर इंजिनिअर्स

१. सिव्हिल- सिव्हिल विषयात बीई किंवा बीटेक किंवा बीएस्सीइन इञ्जिनिअरिङ्ग. 

                  सर्व सेमिस्टर मध्ये सरासरी६५% मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक. 

२. इलेक्ट्रिकल: इलेक्ट्रिकल इञ्जिनिअरिङ्ग विषयात बीई किंवा बीटेक किंवा बीएस्सीइन इञ्जिनिअरिङ्ग. सर्व सेमिस्टर मध्ये सरासरी६५% मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक. 

३. मेकानिकल : मेकानिकल इञ्जिनिअरिङ्ग विषयात बीई किंवा बीटेक किंवा बीएस्सी इन इञ्जिनिअरिङ्ग. विशेष प्राविण्य एअर कंडीशन आणि रेफ्रिजरेशन. सर्व सेमिस्टर मध्ये सरासरी६५% मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक. 

४. कोम्प्युटर विज्ञान:   कोम्प्युतर मध्ये बीई किंवा बीटेक किंवा बीएस्सी. सर्व सेमिस्टर मध्ये सरासरी६५% मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक. 

वयोमर्यादा: पस्तीस वर्षे

 

२. संशोधक:

अहमदाबाद मध्ये इस्रोचे ' स्पेस एप्लिकेशन केंद्र" संशोधन केंद्र आहे. तिथे संशोधकांची गरज असते. इस्रोच्या मोहिमांमध्ये ह्या संशोधनाचा सिंहाचा वाटा असतो. ह्या संशोधकांना ज्युनिअर रिसर्च फेलो म्हणतात. 

 

विषय आणि शैक्षणिक पात्रता:

१. शेती-अग्रोमेटरोलोजी, एग्रोनोमि, मृदाविज्ञान, पिक भौतिक (क्रॉप फिजिओलोजि)

२. बॉटनी 

३. जिओइन्फ़ोर्मेटीक्स/जिओमेतिक्स 

४. जिओलोजि 

५. जिओफिसिक्स 

६. पर्यावरण विज्ञान

७. गणित 

८. मरीन बायोलोजी

९. भौतिकशास्त्र (फिसिक्स)

१०. फिसिकल ओशिओनोलोजि (समुद्र विज्ञान)-

११. इलेक्ट्रोनिक्स आणि इंस्त्र्यूमेंटेशन तंत्रज्ञान

१२. भौतिक, अप्लाईड फिजिक्स, 

१३. इलेक्ट्रोनिक्स 

१४. ओप्तीक्स/ अप्लाईड ओप्तीक्स

 

शैक्षणिक पात्रता- नमूद विषयामध्ये एमएस्सी/एमटेक सर्व सेमिस्टर मध्ये सरासरी६५% मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक. संशोधन करतानाच पीएचडी करता येते. 

राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र, हैद्राबाद येथे खालील विषयांसाठी संशोधक (जेआरएफ) जागा उपलब्ध होतात:

१. जलविज्ञान, हायड्रोलोजी, मृदा व जल संरक्षण, इरिगेशन, शेती अभियांत्रिकी, रिमोट सेन्सिंग या विषयात एमई किंवा एम टेक किंवा तत्सम आणि सिव्हिल, पर्यावरण किंवा  शेती अभियांत्रिकी मध्ये बीई किंवा बी टेक. 

२. जिओफिसिक्स, अप्लाईड  जिओफिसिक्स मध्ये एम टेक किंवा एम एस्सी (टेक) आणि पदवीला भौतिक हा विषय. 

३. केमिस्ट्री मध्ये एम एस्सी प्राविण्य विषय इनोर्र्गानिक किंवा अनालीतीकाल किंवा मरीन केमिस्ट्री

४. भौतिक किवा भौतिक समुद्र विज्ञान (फिसिकाल ओशिओनोग्राफी), समुद्र विज्ञान मध्ये एम एस्सी

५. जिओ-इंफोर्मेतीक्स मध्ये एम टेक
 

३. रिसर्च असोसिएट 

१. शेती-अग्रोमेटरोलोजी, एग्रोनोमि, मृदाविज्ञान, पिक भौतिक (क्रॉप फिजिओलोजि) 

२. पर्यावरण विज्ञान/ नैसर्गिक विज्ञान 

३. भौतिक

४. जिओलोजि 

५. जिओफिसिक्स 

६. बॉटनी 

७. मरीन बायोलोजी

८.  जिओइन्फ़ोर्मेटीक्स

 

शैक्षणिक पात्रता: फ्रेश पीएचडी किंवा नमूद विषयामध्ये एमएस्सी/एमटेक सर्व सेमिस्टर मध्ये सरासरी६५% मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आणि किमान ४ वर्षांचा संशोधनाचा अनुभव. 

 

सतीश धवन स्पेस सेंटर येथे मेटरोलोजी, विषयात एमेस्सी (६५%) किंवा वातावरण विज्ञानात एमटेक(६०%)   केलेल्यांसाठी रिसर्च असोसिएट म्हणून भरती निघते. 

 

स्पेस फिसिक्स लेबोरेतरी येथे भौतिक/वातावरण विज्ञान/ स्पेस फिसिक्स/मेतोरोलोजी/ ग्रह विज्ञान या क्षेत्रात पीएचडी  केलेल्यांसाठी रिसर्च असोसिएट म्हणून भरती निघते. 

 

४. तांत्रिक सहाय्यक

विविध विषयातील डीप्लोमाधारकांना 'तांत्रिक सहाय्यक' म्हणून जागा उपलब्ध होतात. 

विषय: 

१. मेकानिकल

२. इलेक्ट्रोनिक

३ संगणक विज्ञान

४. इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेन

५. केमिकल

६. सिव्हिल

७. ओटोमोबाईल  

 

शैक्षणिक पात्रता: वर नमूद केलेल्या  विषयांमध्ये फर्स्ट क्लास मिळवून किमान तीन वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

 

५. तांत्रिक सहाय्यक- ब वर्ग

ज्या मुलांनी/ मुलींनी आयटीआय पर्यंत  शिक्षण घेतले आहे त्यांच्या साठी सुद्धा "तांत्रिक सहाय्यक- ब वर्ग" यात करिअर संधी उपलब्ध होतात. 

विषय:

१. इलेक्ट्रोनिक

२. मेकेनिकल

३. एअर कंडीशनिंग व रेफ्रिजरेशन

४. वायरमन

५. कारपेंटर

६. प्लंबर 

७. पंप ऑपरेटर

८. मोटार व्हेइकल 

९. फोटोग्राफी 

१०. टर्नर 

११. ग्राईण्डर 

१२. सिव्हिल 

१३. नर्सिंग 

१४. इलेक्ट्रोप्लेटिंग

१५. फोर्जर आणि हिटर 

१६. फायबर री इंफिर्सड प्लास्टिक 

१७. इलेक्ट्रोप्लेटर

१८. इंस्त्र्यूमेंट मेकेनिक 

 

शैक्षणिक पात्रता: दहावी व नंतर वर नमूद विषयांमध्ये  आयटीआय प्रमाणपत्र.


६. इतर तांत्रिक 

लेबोरेटरी टेक्नीशिअन: या विषयातील स्टेट बोर्डाचा डिप्लोमा 

फायरमन- दहावी 

खानसामा- दहावी 

 

ब) अ- तांत्रिक  भरती 

इस्रो हि एक संस्था असल्यामुळे त्यांना इतर मनुष्यबळाची आवश्यकता असतेच. त्यामुळे, जर तुम्ही तांत्रिक शिक्षण घेत नसाल तरीही तुम्हाला इस्रो पाध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. नुकतीच इस्रोने सहाय्यक पदांसाठी भरती केली होती. कुठल्याही विषयातील पदवीधर यासाठी अर्ज करू शकत होता. अशा जागा इस्रोत पुढेही येऊ शकतील. 

 

त्याचप्रमाणे इस्रोला खालील मनुष्यबळाची आवश्यकता असते:

१. वैज्ञानिक( मनुष्यबळ)- बीई/ बीटेक आणि एमबीए (एच आर)

२. अडमिनिस्त्रेतीव्ह ऑफिसर: एमबीए किंवा पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षांचा अनुभव किंवा पदवी आणि ५ वर्षांचा अनुभव 

३. अकौन्त्स आणि फायनान्स- चार्टर्ड अकौन्तन्त किंवा  अक़्कोउन्तन्त किंवा एमबीए, एम कॉम, किंवा वाणिज्य पदवी आणि  वर्षांचा अनुभव  

४. परचेस आणि स्टोर्स व्यवस्थापक: मार्केटिंग किव्ना मटेरिअल व्यवस्थापनात एमबीए आणि १  किंवा मतेरिअल व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका आणि ३ वर्षांचा अनुभव 

५. मेडिकल ऑफिसर एस डी: एमडी 

    मेडिकल ऑफिसर एस सी- एम बी बी एस आणि स्त्रीरोगशास्त्रातीलपदविका 

६. केटरिंग सुपरवायझर- हॉटेल व्यवस्थापनातील पदवी किंवा केटरिंग मधील डिप्लोमा किंवा हॉटेल व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका. 

वरील सर्व जागा  ह्या इस्रोत मागील दोन वर्षात आलेल्या विविध जाहिरातींआधारे दिल्या आहे. या पुढे येणाऱ्या जाहिरातींमध्ये विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यांची आवश्यकता बदलू शकते, तसेच वर नमूद जागा इस्रोच्या कुठल्याही संस्थेत येऊ शकतात. साधारणतः  इस्रोला कुठल्या शैक्षणिक पात्रतेच्या मनुष्यबळाची  आवश्यकता असते याचे ढोबळ मार्गदर्शन व्हावे याकरिता हा लेख आहे. 

इस्रोमध्ये येणाऱ्या भरतीची माहिती इस्रोच्या वेबसाईट वर सातत्याने येत असते.

 

संपर्क: http://www.isro.org/

 

तेंव्हा इस्रोत जाण्याची आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातील विकासाचा भाग होण्याची तुमची इच्छा असेल तर  लागा तयारीला! 

इस्रो मध्ये जायचंय?

bottom of page