

राजकारण- तरुणांसाठी सर्वोत्तम करिअर संधी
भारतात सध्याच्या राजकारणामुळे राजकारण या शबदला मागच्या दोन दशकापासून फार नकारात्मक आयाम मिळाला आहे. राजकारण म्हणजे बाहूशक्ती, पैशाची शक्ती, आणि यात फक्त चुकीच्या मार्गाने सत्ता पिपंसू वृत्ती भागवली जाते, जनतेच्या तोंडाला पाने पुसली जातात हाच विचार रुजला आहे. केवळ श्रीमंत आणि चुकीच्या मार्गाने पैसा कमावणार्या, फसवणाऱ्या लोकांचे राजकारण हे स्थान आहे असे मानले गेले आहे. एवढेच काय, पण ऑफिसमध्ये कोणी आपल्या फायद्यासाठी दुसर्याला फसवले तरी त्याला ऑफिस मधले पोलिटीक्स असे म्हणतात. त्यामुळे राजकारणाकडे फिरकणाऱ्या सामान्य माणसांची वानवा आहे. याही पलीकडे जाऊन पूर्णवेळ करिअर म्हणून विचार करावा असा विचार महाराष्ट्राच्या तरुणांना आणि त्यांच्या पालकांना येणारच नाहि. मात्र हाच विचार खोडून काढण्यासाठी हा लेखप्रपंच! राजकारण हे राष्ट्रप्रेमाचे करिअरमध्ये रुपांतर करणारे एक उत्तम साधन आहे!
राजकारण हा विषय महाराष्ट्राला नवीन नाही. अनेक पट्टीचे राजकारणी महाराष्ट्राने पहिले आहेत. अगदी गावातील पंचायतीपासून ते राज्याच्या विधानसभा गाजवणारे अनेक राजकारणी महाराष्ट्राची माती मागील पन्नास वर्षापासून जन्मास घालते आहे. राजकारण आले कि सत्तेसाठी प्रयत्न करणे आले. त्यामुळे स्पर्धा आली आणि खेचाखेच आली. कालांतराने या स्पर्धेमध्ये भांडणे आली, सत्ता काही हि करून मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले, पैसा लागू लागला आणि मग त्यात बडे उद्योगपती त्यांची लॉबी, भ्रष्टाचार आला, आणि आपल्या सर्व विरोधकांना काबूत ठेवण्यासाठी गुंडगिरी आली.
मात्र मूळ राजकारण या क्षेत्रात यापैकी कशाचीच आवश्यकता नाही. सध्या राजकारणात जे दिसते आहे ते राजकारणाच्या मूळ क्षेत्रापेक्षा फार वेगळे आहे, आणि ते का आले आहे ते गरजेचे आहे. राजकारणामध्ये भ्रष्टाचार, गुंडगिरी, लॉबी आली कारण अभ्यासू, विचारवंत, सामाजिक मुल्ये जपणाऱ्या राजकारणी लोकांची वानवा राजकारणात जाणवू लागली. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने संसद गाजवतील, लोकांना काही उत्तम विचार देतील अशा राजकारण्यांना महाराष्ट्र मुक्त आला आहे. काही अपवाद वगळता महाराष्ट्रामध्ये अशा राजकारणी लोकांची कमी आहे.
त्यामुळेच आज हि नितांत आवश्यकता आहे कि सुशिक्षित तरुणांनी राजकारणाकडे एक गंभीर करिअर पर्याय म्हणून पहिले पाहिजे. केवळ सुशिक्षितच नाही तर राजकारणासाठी आवश्यक असलेले योग्य ते शिक्षण घेऊन हि नवीन पिढी राजकारणात उतरली पाहिजे. या नवीन सुशिक्षित तरुणांकडे केवळ शिक्षणच नव्हे तर उत्तम मुल्ये उत्तम विचार आणि उत्तम आचार असले पाहिजेत.
राजकारण आणि उत्तम मुल्ये
प्लेटो या प्रसिद्ध ग्रीक तत्ववेत्त्याचे म्हणणे असे होते कि राजाने उत्तम तत्वज्ञ असणे गरजेचे आहे. त्याकाळी ग्रीक राज्यात तत्व्शास्त्राला फार महत्व होते. तो काळ एरिस्तोतल, प्लेटो अशा तत्वाज्ञांचा होता. त्यामुळे राज्यसत्तेवरही तत्त्वज्ञांची पकड असणे स्वाभाविक होते. मात्र, राजकारण हे सामाजिक अंग आहे. त्यामुळे राजकारण हे समाज केंद्रस्थानी ठेऊनच केले गेले पाहिजे. हे वाक्य दाम्भिकपणे नसून, राजकारणाला एक सामाजिक जबाबदारी म्हणून पाहणारी आणि त्यासाठी काम करणारी एक पिढी तयार होणे गरजेचे आहे. अए झाले तरच वर उल्लेखलेले दांभिक, गुंडप्रवृत्तीचे, पैशाचे राजकारण जाऊन तिथे सुशासन, पारदर्शक आणि लोककल्याणाचे राजकारण तयार होऊ शकेल.
आपल्या देशातही होऊन गेलेल्या चाणक्यांनी सुद्धा अर्थशास्त्र या आपल्या ग्रंथात हेच सांगितले आहे. राज्यस्य मुलं धर्मः म्हणजे योग्य पद्धतीने केलेले जरी बजावलेले कर्तव्यच राजकारणात महत्वाचे आहे.
प्राचीन राज्याशास्त्राचा अभ्यास
आपल्या प्राचीन भारतात राजकारण या विषयावर विचारवंतांनी चांगले ग्रंथ लिहून ठेवले आहेत. आपल्या देशात प्राचीन काळापासून राजकारणाचा चांगला विकास राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या भारतीय युवांनी आपल्या प्राचीन राज्यशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
यामध्ये भगवद्गीतेतील शान्तिपार्वाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. चाणक्यांचा अर्थशास्त्र, शुक्राचार्यांची शुक्रनीती यांचा अभ्यास केला जाऊ शकतो. चाणक्यांचा अर्थशास्तराचा अभ्यास करणे तर अतिशय महत्वाचे आहे. अर्थशास्त्रामध्ये राज्य कसे चालवावे, राज्याची वीव्ह्द अंगे, परराष्ट्रीय संबंध, राजा कसा असावा, युवराज कसा असावा, अमात्य सेनापती प्रधान कसे असावेत, विविध अधिकाऱ्यांची कामे यावर विस्तृत विश्लेषण केले आहे.
शिवछत्रपती हे महाराष्ट्राचे दैवत आणि महाराष्ट्राने पाहिलेला सर्वात सक्षम राजा. महाराजांच्या राज्यशास्त्राचे विवेचन त्यांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी "आज्ञापत्र" या पुस्तकात फार छान केले. महाराष्ट्रातील राज्कारात येऊ इच्छिणाऱ्या होतकरूंनी अज्ञापात्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
अर्थार्जन
तुम्ही जोपर्यंत शासनात बसत नाही तोपर्यंत संविधानाने नमूद केलेला पगार तुम्हाला मिळत नाही. यासाठी तुमहाला तुमच्या अर्थार्जनाचा प्रश्न सोडवायचा असतो. यासाठी अर्थातच तुम्हाला व्यवसाय उभारणे गरजेचे आहे.
व्यवसायातून तुम्हाला तुमच्या रोजच्या खर्चाचे तसेच तुमच्या राजकारण विषयक खर्चाचे जसे पुस्तके नियतकालिके, तुमच्या सहाय्यक, सचिव यांचा खर्च तुमच्या कार्य्कार्य्त्यांचा खर्च भागवायचा आहे. त्यामुळे तुमचा व्यवसायाचा पाया चांगला असणे गरजेचे आहे.
राजकारणासाठी प्रशिक्षण:
१. पदव्युत्तर पदवी:
राजकारणात येण्यासाठी राज्यशास्त्र, सार्वजनिक प्रशासन, अर्थशास्त्र किंवा समाजशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी असल्यास उत्तम. तसेच तत्वज्ञान या विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असल्यास उत्तम.
मुंबई विद्यापीठामध्ये हे सर्व कोर्सेस उपलब्ध आहेत. पूर्णवेळ किंवा दूरस्थ पद्धतीने शिकता येतात.
प्रत्येक विषयाचा स्वतंत्र विभाग आहे.
संपर्क:
राज्यशास्त्र विभाग
मुंबई विद्यापीठ कालिना,सांताक्रूझ, मुंबई
पुण्यातील गोखले इंस्तीत्युत सुद्धा राज्यशास्त्र आणि अर्थ्शास्त्रासाठी प्रसिद्ध आहे.
२. पदव्युत्तर पदविका
पब्लिक पॉलिसी या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात एका वर्षाचा पदव्युत्तर कोर्स उपलब्ध आहे.
३. आंतरराष्ट्रीय राजकारण
आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयामध्ये अन्नामलाई विद्यापीठ, तमिळ नाडू यांचा दूरस्थ पद्धतीने पदव्युत्तर पदवी कोर्स उपलब्ध आहे.
अन्नामलाई विद्यापीठाचे भांडूप येथे ऑफिस आहे.
४. राजकारण विषयात पदवी
पुण्याच्या एमआयटी संस्थेमध्ये प्रशासन म्हणजे गव्हर्नन्स या विषयावर एका वर्षाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
संपर्क: १२४, पौड रोड, कोथरूड, पुणे
५. चाणक्य राज्यशास्त्र
मुंबई विद्यापीठाचे तत्वज्ञान डिपार्टमेंट आणि चाणक्य पब्लिक लीडरशिप सेमिनार यांच्या संयुक्त विद्यमाने
"चाणक्य राज्यशास्त्र" या विषयावर सहा महिन्यांचा पूर्णवेळ निवासी असा विनामूल्य कोर्स घेतला जातो.
संपर्क: सीआयपीएल, तत्वज्ञान विभाग, मुंबई विद्यापीठ
६. आंतरराष्ट्रीय कोर्सेस
जर तुमच्या महत्वाकांक्षा उत्तुंग असतील आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय कोर्स करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासमोर खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत .
जॉर्ज केनेडी स्कूल (हार्वर्ड केनेडी स्कूल) ऑफ गव्हर्नमेंट, अमेरिका हे सर्वोत्तम मानले जाते. http://www.hks.harvard.edu/
तसेच इंग्लंड मध्ये लंडन स्कूल ऑफ इकोनोमिक्स आणि पोलिटिक्स हि संस्था अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासासाठी अतिशय प्रतिष्ठित आहे.
सार्क या देशांचे विद्यापीठ सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणात चांगले कोर्सेस देते . http://www.sau.ac.in/
हे विद्यापीठ नवी दिल्ली येथे आहे.
जॉर्ज वॉशिंगटन स्कूल ऑफ गव्हर्नमेंट हे देखील राज्याशास्त्रासाठी चांगले आहे. gspm.gwu.edu
तुम्हाला राजकारण या विषयात करिअर करायचे असल्यास
संपर्क साधा:
प्रबोधक, जोगेश्वरी पूर्व मुंबई
हर्षद माने ९९६७७०६१५०
स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे कि भारत येणाऱ्या काळात या विश्वाचे नेतृत्व करणार आहे. यासाठी भारतातील तरुणाने नेतृत्व करण्यास सिद्ध झाले पाहिजे, आणि या नेतृत्वात महाराष्ट्राचा महत्वाचा वाट असायला हवा.
तेंव्हा सज्ज व्हा २१ व्या शतकात तुमच्या या प्रिय महाराष्ट्राचे आणि देशाचे नेतृत्व करायला!