मराठी तरुणांनी एक येणे आहे...
अत्रेंचे एक वाक्य फार आठवणीत येते" हिंदीत बोलण्याची मराठी माणसाची घाणेरडी सवय एक दिवस त्याचा घात करेल"…वास्तविक आज घात वगैरे झाला अशी अवस्था नाही. पण आजच्या काळात हे वाक्य फार चुकीचे किंवा अतिशयोक्तीपूर्ण आहे असेही नाही.
मराठी माणसाला, मराठी भाषेला आणि अस्मितेला फार प्राचीन इतिहास आहे. प्राचीन आहे तितकाच श्रिमन्त. फक्त लौकिकार्थाने नाही, अगदी आर्थिक आणि राजकीय सुद्धा. आमच्या पूर्वजांनी जगातील सर्वोत्तम अशा पैकी साहित्य निर्माण केले, जगातील सर्वोत्तम अशा राजांपैकी एक जाणता राजा माझीच बोली बोलायचा, माझ्या पूर्वजांनी अटकेपार झेंडे रोवले, माझ्या पूर्वजांच्या रक्तामुळेच खैबर खिंडीतील आक्रमणे थांबली… धर्मवेड्या औरंग्याला तोडीस तोड उत्तर दिले माझ्या राजांनीच आणि मराठ्यांना संपवण्याची जिद्द घेऊन निघालेला त्याला याच मातीत गाडला, मराठ्यांनीच!… स्वराज्यापासून संयुक्त महाराष्ट्रापर्यंत आतील बाहेरील शत्रूंशी लढून खंबीरपणे उभा राहिला तो माझा मराठी माणूस। आपली संस्कृती, आपली भाषा आणि अभिमान जपला… जीवापाड अगदी प्रसंगी जीव देउन…त्यामुळे अगदी न्यूनगंड बाळगून जगावं, अस मराठी माणसाच्या बाबतीत काहीच नाही…तरीही तो आयुष्यभर गरिबीत जगतो, अमराठी लोकांसमोर दबून वागतो, इंग्लिशचे नाव काढले कि जपून बोलतो, प्रशासकीय सेवेत नगण्य दिसतो… राजकारणात विशेषतः राष्ट्रीय राजकारणात अभावानेच आढळतो… अगदी आपल्या मुंबईतही दाटीवाटीने राहतो। बाहेरून येउन लोक शिरजोरी करतात ती मुकाट्याने खपवून घेतो…सगळीकडे अशी अवस्था नाही…व्यवस्थापकीय पदांवर मराठी माणूस नाही असे नाही…व्यवसायात नाहीच असे नाही, प्रशासनात दिसतच नाही असेही नाही…ठाकरी भाषेत उलट उत्तर केली नाहीत असेही नाही… पण…अभावाने… अगदी अपवादात्मक। आणि माझे फक्त एवढेच म्हणणे आहे… कि … छत्रपती महाराजांच्या मातीत जन्मलेल्या, पानिपत पचवून दिल्लीवर चालून जाणार्या मराठ्याने अस दबून, घाबरून कचरून राहण्याला काय अर्थ आहे?इतका शौर्याचा इतिहास भारताच्या सर्वच प्रदेशांना नाही। मुसलमान आक्रमणाला पुरून उरून स्वतःचे राज्य निर्माण करून देशभरात पसरवणारे मराठ्यांनी आज सिन्हासारख जगायला हव होत… वाघासारख अवघ्या देशात हक्काने वावरायला हव होत… या वाघासमोर डोळे वर करून पाहण्याची हिम्मत कोणी करणार नाही अस स्थान भारतवर्षात आपण मिळवायला हव होत…ते नाहीच… आमच्या राज्यात आम्ही उपर्या सारखे जगतोय… बाहेरच्यांचे उन्माद सहन करतोय… वेळप्रसंगी मार खातोय। आमच्या स्मृतीस्थळांवर होणारे वार मुकाट्याने पह्तोय. राजकारण्यांकडून मतांसाठी होणार लालून चांगुन उघड्या डोळ्यांनी पाहतोय.। आमच्या तोंडाला पुसली जाणारी पानं मोजतोय।याच कारण आम्ही वाघ आहोत हे आम्हाला जाणवतच नाही। वास्तविक महाराजांच्या जाज्वल्य इतिहासानंतर मराठी माणसाचे मानसिक अध:पतन व्हायलाच नको होते। केवळ त्या पुण्याईवरच आज मराठी हि देशातील सर्वोत्तम, सर्वाधिक शक्तिशाली सत्ता व्हायला हवी होती… पण ती झाली नाही।इंग्लिशमध्ये एक म्हण आहे… जगाने तुम्हाला राजा म्हणायला हव असेल तर राजासारख वागायला शिका। आम्ही मुळात घाबरून वावरतो। निधडी छाती हा शब्दप्रयोग आम्ही विसरलोय का? महाराजांनी आम्हाला इतका मोठा वारसा दिला आहे, शिकवण दिली आहे ती आम्ही विसरतो। या जगाने आमची कीव करण हे मराठी माणसासाठी मेल्याहून मेल्यासारख आहे.
आज आम्हाला गरज आहे ती हे समजण्याची कि मराठी हि शक्ती अपरिमित आहे. हा स्वतःची ताकद विसरलेला हनुमंत आहे. पण जोपर्यंत त्याला हे समजत नाही कि तो उडू शकतो, लंकादहन करणार कसा? तुम्ही उडू शकता, अगदी पर्वत हातावर उचलू शकता। त्यामुळे संकुचित जगणे सोडून द्या… मनाची श्रीमंती हा फार मोठा दागिना आहे पण आर्थिक श्रीमंती वाईट नाही। मानाने संपन्न होणायेवढेच संपत्तीने संपन्न असणे गरजेचे आहे. राजकारण आणि प्रशासन ह्या देशाला चालवणाऱ्या दोन खांबामध्ये मराठी माणूस नगण्य आहे. हे पाह्ल्यांदा बदलले पहिजे. मराठी माणूस राष्ट्रीय राजकारणात गेला पाहिजे. त्याने प्रशासनात गेले पाहिजे. अगदी मुख्यमंत्र्याच्या सचिवापासून तहसिलदारापर्यंत आणि हवालदारापासून ते पोलिस आयुक्तांपर्यंत फक्त मराठी माणूसच असावा। निदान महाराष्ट्रात तरी? देशाच्या पन्तप्रधानापासून ते पक्षश्रेष्टींपर्यंत मराठी असावा. शिपाया पासून कमांडन्ट पर्यंत मराठी असावा. अकौंटन्टपासून ते व्यवस्थापकीय संचालकापर्यंत मराठी असावा.
तोपर्यंत मराठी माणसाला सन्मान मिळणारच नाही. भांडवलदार मराठी असला कि मराठी कामगार सुद्धा सुखी राहणारच कि!
पण अवघा मराठी यासाठी एक आला पहिजे.। सगळे जातभेद विसरून… सगळे भेदभाव भांडणे दूर सारून… आर्थिक सामाजिक राजकीय मराठी हि एक शक्ती झाली पहिजे…
आता हेच मागणे…. राजे, अवघा हलकल्लोळ करणे आहे… शक्ती द्या!!!
हर्षद माने प्रबोधक