

स्टाफ सिलेक्शन कमिशन- देशाच्या यंत्रणेत महत्वाचा भाग
बर्याचदा आपल्याला वाटत कि प्रशासकीय सेवांमध्ये येण्यासाठी केवळ केंद्र किंवा राज्य लोकसेवा आयोगामार्फतच जाता येते. त्यामुळे त्याशिवाय होणार्या कित्येक परीक्षांकडे आपले दुर्लक्ष होते. लोकसेवा आयोग अ गटातील पदांसाठी परीक्षा घेते. याव्यतिरिक्त ब गटातील अनेक भरण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन या संस्थेमार्फत परीक्षा घेण्यात येते.
स्टाफ सिलेक्शन कमिशन केंद्र सरकारच्या अखत्यारीत पदांसाठी १२ परीक्षा घेते.
१ सामायिक पदवी परीक्षा- सहकारी, सेन्ट्रल एक्साईज, पोस्ट यातील इन्स्पेक्टर, सीबीआय चा सब इन्स्पेक्टर, डिविजनल अकौंटन्ट आणि ऑडिट या पदांसाठी हि परीक्षा घेण्यात येते.
२. कर सहाय्यक - आयकर आणि अप्रत्यक्ष कर सेवांमध्ये सहाय्यक म्हणून पदांसाठी
३. सांख्यिकी संशोधक ग्रेड ४: सांख्यिकी डिपार्टमेंट मध्ये
४. ज्युनिअर अभियांत्रिकी (सिव्हिल व इलेकट्रीकल)
५. ज्युनिअर भाषांतरकार
७. सेक्शन ऑफिसर (कमर्शिअल ऑडिट)
८. डेटा एन्ट्री ऑपरेटर
९. सेन्ट्रल पोलिस मध्ये सब इन्स्पेक्टर
१०. सेक्शन ऑफिसर (ओडीट)
११. सामायिक मेट्रिक लेवल परीक्षा)
१२. सेक्शन ऑफिसर अकौंटस
एकंदरीत पदवी, दहावी, बारावी आणि अभियांत्रिकी या चारही पात्रतेनंतर विविध पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा घेते.
सामायिक पदवी परीक्षा:
हि परीक्षा फार मोठ्या पदांसाठी घेण्यात येते , त्यामुळे आपण या परीक्षेसाठीच अधिक विचार करू.
पात्रता: कुठल्याही विषयातील पदवी
परीक्षेचे स्वरूप:
परीक्षा तीन लेवल मध्ये घेतली जाते:-
१. टायर I - प्रिलिम - बहुपर्यायी प्रश्न
२. टायर II- बहुपर्यायी प्रश्न
३. मुलाखत
टायर I :
लॉजिक, सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि सामान्य गणित- (बारावी लेवल) - २००
दोन तास
टायर II :
टायर I परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी टायर II परीक्षेसाठी पात्र होतात.
परीक्षेचे स्वरूप
सेन्ट्रल पोलिस परीक्षेसाठी:-
इंग्रजी कोम्प्रीहेन्शन २०० गुण
सांख्यिकी परीक्षेसाठी
सामान्य गणित २०० गुण
इंग्रजी २०० गुण आणि
कॉमर्स/गणित/अर्थशास्त्र २०० गुण
इतर पदांसाठी:
सामान्य गणित २०० गुण आणि
इंग्रजी २०० गुण
हि परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते.
सेन्ट्रल इण्डस्ट्रीअल सिक्युरिटी फोर्स- सब इन्स्पेक्टर
पात्रता : पदवी
टायर I :
लॉजिक, सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि सामान्य गणित- (बारावी लेवल) - २००
दोन तास
टायर II :
टायर I परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी टायर II परीक्षेसाठी पत्र होतात.
शारीरिक पात्रता:
पुरुष:
१०० मीटर धावणे (१६ सेकंद)
१.६ किमी ६. मिनिट्स
लांब उडी: ३.६ मीटर (३ चान्स)
उंच उडी: १.२ मीटर (३ चान्स)
महिला :
१०० मीटर धावणे (१८ सेकंद)
८०० मी ४. मिनिट्स
लांब उडी: २.७ मीटर (३ चान्स)
उंच उडी: ०.९ मीटर (३ चान्स)
या व्यतिरिक्त वर नमूद केलेल्या परीक्षांसाठी सामायिक पदवी परीक्षेसारखाच अभ्यासक्रम असून त्याची काठीण्य पातळी या परीक्षेहून कमी असते.
स्टेनोग्राफर परीक्षेसाठी वरील परीक्षेनंतर स्टेनोग्राफिची परीक्षा घेतली जाते.
ग्रेड सी व डी - इंग्रजी आणि हिंदी
त्यामुळे, लोकसेवा आयोगाच्या परीक्षांव्यातिरिक्त केंद्र शासनाच्या सेवेत जाण्यासाठी स्टाफ सिलेक्शन हा उत्तम पर्याय आहे. परीक्षेची काठीण्य पातळी लोकसेवा आयोगापेक्षा बरीच सोप्पी असते. मात्र अज्ञानापोटी परीक्षांना बसत नाहीत. उदाहरणार्थ सामायिक पदवी परीक्षेच्या २५,००० जागा दरवर्षी निघतात. मात्र त्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत.
आज हे अज्ञान सोडा, आणि स्टाफ सिलेक्शन वर पूर्ण लक्ष द्या.



