

उद्योगाची नोंदणी कशी करावी ?
उद्योगाचे चार भागात वर्गीकरण होऊ शकते:
अ) एकल उद्योजक (सोल प्रोप्रायटर)
ब) भागीदारी (पार्टनरशिप)
क)सीमित दायित्व भागीदारी (लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप) आणि
ड) कंपनी
एकल उद्योजक
जेंव्हा एकटाच उद्योजक कुणाच्याही भागीदारीशिवाय आणि केल्याबिगर व्यवसाय तेंव्हा त्याला सोल प्रोप्रायटर शिप म्हणतात.
वैशिष्ट्ये:
अ) नोंदणीची आवश्यकता नाही
ब) महानगर पालिका, नगरपालिका यांच्या कडून गुमास्ता लायसन्स किंवा ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र
क) व्यवसायाचे उत्पन्न उद्योजकाच्या उत्पन्नात मिळून आयकर लागू
ड) कंपल्सरी ऑडिट ची आवश्यकता नाही
इ) सेवा किंवा विक्री कर त्या कायद्यांप्रमाणे लागू
भागीदारी (पार्टनरशिप)
दोन किंवा अधिक [जास्तीत जास्त १०/२०] भांडवल उभारून ठरवल्याप्रमाणे नफा आणि तोटा यांची विभागणी करून व्यवसाय करतात त्याला पार्टनर्शीप म्हणतात.
भागीदारीस कायद्याच्या दृष्टीने नसते. थोडक्यात भागीदारी व्यवसायाचे कर्ज भागीदारीस फेडता न आल्यास भागीदारांच्या वैयक्तिक जबाबदारी बनते. यालाच "असीमित दायित्व" असे म्हणतात.
पार्टनरशिप रजिस्ट्रार ऑफ पार्टनर्शीप कडे नोंदणीकृत करून घ्यावी लागते.
सीमित दायित्व भागीदारी (लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप)
भागीदारी आणि कंपनीच्या स्वतंत्र अस्तित्वाचा एकत्रित अविष्कार म्हणजे सीमित दायित्व भागीदारी (लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. येथे भागीदारांचे दायित्व मर्यादित ( गुंतावलेल्या भांडवला एवढे) असते .
नोंदणी:
१) किमान दोन भागीदार पैकी किमान एक मुख्य (डेझीग्नेटेड) भागीदार निश्चित करणे आवश्यक. सदर भागीदारांनी, संचालक ओळख क्रमांक (डिन )घेणे आवश्यक असते.
२) भागीदारी संस्थेचे नाव सुरक्षित करण्यासाठी कॉर्पोरेट मंत्रालयाकडे फॉर्म एलएलपी-१ मध्ये अर्ज करावा लागतो. कॉर्पोरेट मंत्रालयाने सदर नाव सुरक्षित केल्यावर संस्था नोंदणी साठी साठ दिवसात करणे आवश्यक असते.
३) संस्थेची विविध माहिती फॉर्म एलएलपी-२ मध्ये भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे लावून मंत्रालयात भरला जातो. यावेळी भागभांडवला नुसार योग्य ती नोंदणी फी भरावी. इथे संस्था नोंदणीकृत होते.
४) भागीदार आपापसात ‘भागीदारी करार’ करतात. नोंदणी झाल्याच्या तीस दिवसांच्या आत अर्ज-फॉर्म एलएलपी-३ कॉर्पोरेट मंत्रालयाकडे नोंदणीकृत केला जातो.
फॉर्म ओन्लाइन भरायचे असून त्यासाठी www.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असते.
कंपनी
कंपनी हा एक प्रतिष्ठित प्रकार आहे . कंपनीचे प्रायव्हेट आणि पब्लिक असे दोन प्रकार पडतात. प्रायव्हेट कंपनी साठी किमान २ भागधारक आणि किमान २ लागतात."एक माणूस कंपनी" हा एक नवीन प्रकार कंपनी कायदा २०१३ न्वयेउदयास केवळ १ संचालक आणि १ भागधारक पुरेसा आहे.
कंपनी कोर्पोरेट मंत्रालयाकडे नोंदणी करण्यासाठी फॉर्म २९ हा नवीन फॉर्म शासनाने उपलब्ध केला आहे. यामध्ये नावापासून सर्व माहिती भरली जाते. अन्यथा आएन सी १ मध्ये नंतर विविध फॉर्मस भरावे लागतात.
इतर नोंदणी
१) आयकर PAN
२) आयकर TAN
३) सेवा कर
४) वस्तू विक्री (व्हेट- महाराष्ट्रांतर्गत/ सीएसटी- महाराष्ट्राबाहेर)
५) कारखाना मंजुरी (उत्पादक)
६) एक्साइज (उत्पादक)
७) अन्न व औषधे नोंदणी (उत्पादक व विक्रेता तसेच हॉटेल किंवा खाद्य गृह, खाद्य विक्रेता)
लघु उद्योग नोंदणी
लघु उद्योग नोंदणी उद्योजकाच्या आधार कार्ड द्वारे केली जाते. यासाठी www.udyamregistration.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.